भारताने चेस ऑलिम्पियाड २०२४ मध्ये इतिहास रचला आहे. भारताने ९७ वर्षांच्या इतिहासात महिला आणि पुरुष टीमने पहिल्यांदाच गोल्ड मेडल जिंकलं आहे. १९२७ पासून सुरू झालेल्या या चेस ऑलिम्पियाडमध्ये अनेक देशांनी स्वत:च वर्चस्व गाजवलं होतं, पण भारताला कधीच या स्तरावर यश मिळालं नाही. त्यामुळे हा विजय भारतीय चेससाठी एक महत्त्वाचा टप्पा आहे. ही विक्रमी कामगिरी भारताने कशी केली? जाणून घेऊया.
चेस या खेळाचा शोध भारतात ६ व्या शतकात लागला. चतुरंग नावाच्या खेळातून चेस हा खेळ तयार झाला आहे. चतुरंग हा एक रणनीतिक खेळ होता आणि चेस सुद्धा थोड्या प्रमाणात तसाच आहे. चेस हा खेळ भारतात निर्माण झाला असला तरी एखाद्या भारतीयाला चेस रॅंकींग म्हणजे IM इंटरनॅशनल मास्टर आणि GM म्हणजे ग्रँड मास्टर ही रॅंकींग मिळण्यासाठी बरीच वाट पहावी लागली. १९६१ साली मैनूअल अॅरोन हे भारताचे पहिले इंटरनॅशनल मास्टर चेस खेळाडू बनले आणि नंतर १९८८ साली विश्वनाथण आनंद हे भारताचे पहिले ग्रँड मास्टर बनले. हळू हळू भारतात चेस या खेळाची लोकप्रियात वाढली आणि भारतात अनेक नवनवीन खेळाडू तयार झाले. आता तर भारत चेस या खेळात जगात वर्चस्व गाजवताना दिसतोय. चेस ऑलिम्पियाड २०२४ चा निकाल याचाच पुरावा आहे. खुल्या गटात भारताला विजय मिळवून देणारे खेळाडू होते डी गुकेश, आर. प्रज्ञानंद, अर्जुन इरीगेसी, विदित गुजराथी. तर महिला संघात खेळाडू होते दिव्या देशमुख, वंतिका अग्रवाल, आर. वैशाली आणि हरिका डी. (Chess Olympiad)
भारतीय पुरुष संघाने एकही सामना न हारता जेतेपद आपल्या नावावर केलं. पहिल्या लढतीत मोरोक्कोवर विजय मिळवल्यानंतर भारत एकाही सामन्यात पराभूत झाला नाही. फक्त नवव्या सामन्यात उझ्बेकिस्तानविरुद्ध भारतात 2 -2 अशा बरोबरीत समाधान मानावं लागलं. पण स्लोवेनियाविरुद्धच्या शेवटच्या सामन्यात डी.गुकेश, आर.प्रज्ञानंद आणि अर्जुन इरीगेसी यांनी विजय मिळवला, तर विदीत गुजराथीला मॅच ड्रॉवर समाधान मानावं लागलं. महिला गटात भारतीय महिला खेळाडूंनी अकरापैकी नऊ सामन्यांमध्ये विजय मिळवला. पोलंडविरुद्धच्या सामन्यात त्यांना पराभव पत्करावा लागला होता, तर अमेरिकन संघाविरुद्धच्या सामन्यात त्यांना मॅच ड्रॉवर समाधान मानावं लागलं. पण शेवटच्या सामन्यात अझरबैझानवर विजय मिळवत भारताला चेस ऑलिम्पियाडमध्ये गोल्ड मेडल मिळवून दिलं. (Chess Olympiad)
======
हे देखील वाचा : पॅरिस ऑलिम्पिकमध्ये वाटले गेले २ लाख कंडोम ?
======
या आधी भारतात झालेल्या २०२२ च्या चेस ऑलिम्पियाड मध्ये ब्रॉन्झ मेडल जिंकलं होतं. आता बुडापेस्ट येथे सुरु असलेल्या चेस ऑलिम्पियाड २०२४ मध्ये ९७ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच गोल्ड जिंकण्याचा विक्रम केला आहे. त्यामुळे येत्या काळात भारताचं चेसमध्ये वर्चस्व असेल यात काही शंका नाही. चेस या खेळामुळे माणसाचा बौद्धिक विकास होतो. माणसाची स्मरण शक्ती वाढते एकाग्रता वाढते. माणूस आणखी संयमी बनतो. लहानमुलांचा मोबाइलचा अतिरेकी वापर टाळण्यासाठी हा खेळ खूप फायदेशीर ठरू शकतो. आणि काय सांगता येतं त्यामुळे भारताला नवीन Pubg प्लेयर न मिळता एखादा चेसचा खेळाडू मिळू शकतो. (Chess Olympiad)