भारत हा देश जगातील एकमेव असा देश आहे जिथे अनेक प्रमुख धर्म जन्मला आले. हिंदू, बौद्ध, जैन आणि शीख धर्म इथेच सुरू झाले. इतर देशांतून आलेले धर्मही इथे आले आणि आजही भारतात ते गुण्या गोविंदाने नांदतायेत. या देशाने इतक्या धर्मांना कसं आपलंसं केलं? त्याचा इतिहास काय जाणून घेऊ. (Religions)
भारतात जन्मलेल्या धर्मांबद्दल. हजारो वर्षांपूर्वी, जेव्हा जग अजूनही अंधारात आणि अज्ञानात बुडालेले होते, तेव्हा भारतात एक मोठी संस्कृती उभी राहिली. सिंधू खोऱ्यातली सभ्यता, जिथे लोक शहरं बांधत होते, नद्या पूजत होते, आणि जीवनाच्या रहस्यांबद्दल विचार करत होते. सिंधू खोऱ्यातील सभ्यता, जिथे हडप्पा आणि मोहेंजोदडो ही शहरं होती, तिथून हिंदू धर्माची मुळं सापडतात. वेद, उपनिषदं, रामायण, महाभारत यातून हा धर्म आकाराला आला. हिंदू धर्मात लोकांनी नद्या, पर्वत, झाडं यांना पूजलं, कर्म आणि पुनर्जन्मावर विश्वास ठेवला. हा धर्म इतका लवचिक आहे की, त्याने अनेक विचारांना सामावून घेतलं. त्यात एक देव मानणारेही आहेत, अनेक देव मानणारेही, भारताची माती इतकी सुपीक आहे की, इथे विचारांचं बीज रोवलं की ते मोठं झाड होऊन जातं आणि असंच भारताच्या सांस्कृतिक आणि भौगोलिक विविधतेने हिंदू धर्माला हिमालयापासून कन्याकुमारीपर्यंत समृद्ध केलं. (Top Stories)
काही शतकांनंतर, हिंदू धर्मातूनच पुढे दोन नवे धर्म जन्मले – बौद्ध आणि जैन. इ.स.पू. 6 व्या शतकात गौतम बुद्धांचा जन्म झाला, लुंबिनी इथे, जो आज नेपाळात आहे. पण त्यांचं संपूर्ण जीवन आणि उपदेश भारतातच अंगिकारले गेले. सम्राट अशोकाने इ.स.पू. 3 ऱ्या शतकात बौद्ध धर्म स्वीकारला आणि तो श्रीलंका, म्यानमार, थायलंडपर्यंत पसरला. भारतात कालांतराने बौद्ध धर्माचं प्रमाण कमी झालं, पण आजही भारतात 0.7% लोक बौद्ध आहेत.
त्याचवेळी बिहार मधील वैशाली येथे जन्मलेल्या महावीर स्वामींनी जैन धर्माची सुरुवात केली, त्यांनी अहिंसेचा कडक मार्ग शिकवला, आत्म्याच्या शुद्धीवर भर दिला. आजही 0.4% जैन लोक भारतात आहेत आणि त्यांचं व्यापार आणि समाजसेवेतील योगदान मोठं आहे. (Religions)
पुढे 15 व्या शतकात शीख धर्माचा जन्म झाला. गुरु नानक यांनी पंजाबात हा धर्म स्थापन केला. त्यांनी सांगितलं, “एक ओंकार” – एकच ईश्वर आहे, आणि सगळे माणसं समान आहेत. हिंदू आणि इस्लाम यातील चांगल्या गोष्टी घेऊन त्यांनी शीख धर्म बनवला. दहा गुरुंनी हा धर्म वाढवला, आणि गुरु ग्रंथ साहिब हे त्यांचं पवित्र पुस्तक बनलं. आज भारतात 1.7% शीख आहेत, आणि त्यांचा प्रभाव पंजाबपासून जगभर दिसतो. (History)
हे सगळे धर्म भारतात का जन्मले? कारण भारताची मातीच विचारांची आहे. दार्शनिक चर्चा, वादविवाद यांना इथे नेहमीच प्रोत्साहन मिळालं. भारतात विविधता आहे. भाषा, संस्कृती, परंपरा आणि हा लवचिकपणा धर्मांना जन्म देण्यासाठी आणि वाढण्यासाठी कारणीभूत ठरला.
आता बोलूया भारतात बाहेरून आलेल्या धर्मांबद्दल. ज्यू धर्म हा सर्वात आधी आला, जवळपास इ.स.पू. 6 व्या शतकात. ज्यू व्यापारी व्यापारासाठी केरळच्या कोची इथे आले. नंतर इ.स. 70 मध्ये, जेव्हा रोमनांनी जेरुसलेममधील ज्यू मंदिर उद्ध्वस्त केली, तेव्हा आणखी ज्यू भारतात आश्रयासाठी आले. कोचीच्या राजाने त्यांना जमीन दिली, त्यांच्या धर्माचं पालन करण्याचं स्वातंत्र्य दिलं. आजही कोचीत ‘पारदेसी सिनागॉग’ हे ज्यू मंदिर आहे.
ज्यू प्रमाणेच ख्रिश्चन धर्म सुद्धा इ.स. 52 मध्ये केरळात आला. Saint थॉमस, येशू ख्रिस्तांचे शिष्य, मलबार किनाऱ्यावर उतरले. त्यांनी इथे उपदेश केला, आणि सेंट थॉमस ख्रिश्चन समाजाची स्थापना झाली. नंतर 16 व्या शतकात पोर्तुगीजांनी मिशनरी आणले, आणि 18 व्या शतकात ब्रिटिशांनीही ख्रिश्चन धर्म पसरवला. आज भारतात 2.3% ख्रिश्चन आहेत, आणि गोवा, केरळ मोठ्या प्रमाणात ख्रिश्चन राहतात. (Religions)
पारशी धर्म, म्हणजे झोरोस्ट्रियन हा 8 व्या शतकात इराणमधून भारतात आला. अरबांनी इराण जिंकल्यावर पारशींना जबरदस्ती त्यांचं धर्मांतर करण्याचा प्रयत्न केला गेला, तेव्हा ते तिथून Migrate करून जहाजाने गुजरातच्या किनाऱ्यावर उतरले. स्थानिक राजांनी त्यांना आश्रय दिला, पारशींनी भारताच्या संस्कृतीत स्वतःला सामावून घेतलं, आज इतिहास बघितला तर होमी भाभांपासून रतन टाटांपर्यंत या पारशी समुदयातला लोकांनी भारतासाठी मोलाचं योगदान दिलं.
आता बोलूया भारतातल्या लोकसंख्येच्या बाबतीत दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या धर्माबद्दल तो म्हणजे इस्लाम! 7व्या शतकात अरब व्यापाऱ्यांमार्फत हा धर्म भारताच्या मलबार किनाऱ्यावर आला. त्यांनी व्यापारासोबत धर्माचा प्रसार केला. नंतर 12व्या शतकात दिल्ली सल्तनत आणि 16व्या शतकात मुगलांनी इस्लाम पसरवला की आजही भारतात 14.2% मुस्लिम आहेत.
===============
हे देखील वाचा : Marina Abramovic : “6 तास माझ्यासोबत काहीही करा” मग लोकांनी जे केलं…
===============
भारताने विविध धर्मांचा स्वीकार का केला? याचं उत्तर भारताच्या सहिष्णू आणि सर्वांना सामावून घेण्याच्या संस्कृतीत दडलं आहे. प्राचीन काळापासून भारत हा व्यापार, सांस्कृतिक देवाणघेवाण आणि बौद्धिक आदानप्रदानाचा केंद्रबिंदू राहिला आहे. ज्यामुळे अनेक धर्मांना येथे आपलं स्थान निर्माण करता आलं आणि याचं धर्मांमधून आलेल्या महान थोर संतांनी संत कबीर, गुरु नानक, आणि तुकाराम यांसारख्या थोर व्यक्तींनी धर्माच्या सीमा ओलांडून मानवतेचा संदेश दिला. स्वातंत्र्यानंतर, 1950 च्या भारतीय राज्यघटनेने भारताला धर्मनिरपेक्ष राष्ट्र म्हणून स्थापित केलं. घटनेच्या कलम 25 ते 28 नुसार, प्रत्येक नागरिकाला आपला धर्म स्वीकारण्याचं, आचरण करण्याचं आणि प्रसार करण्याचं स्वातंत्र्य देण्यात आलं. यामुळे भारतात धार्मिक विविधता टिकून राहिली आणि वाढली. (Religions)
आज भारतात मंदिर, मशीद, चर्च, गुरुद्वारा एकत्र दिसतात. कधी कधी तणाव होतात, पण भारताची ताकद आहे एकत्र राहण्यात. ‘वसुधैव कुटुंबकम’ – जग हे एक कुटुंब आहे, ही भावना भारताच्या मातीत रुजली आहे आणि म्हणूनच आपला भारत एक महान राष्ट्र आहे.
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics