Home » Pakistan : पाकिस्तान पाण्यासाठी अफगाणिस्तानवर अवलंबून राहणार !

Pakistan : पाकिस्तान पाण्यासाठी अफगाणिस्तानवर अवलंबून राहणार !

by Team Gajawaja
0 comment
Pakistan
Share

पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानं सर्वबाजुनं पाकिस्तानची कोंडी करण्यास सुरुवात केली आहे. ऑपरेशन सिंदूरने पाकिस्तानमधील हवाईतळ उदधवस्त झाले आहेत. सोबतच भारताने सिंधू पाणी करार स्थगित करुन पाकिस्तानला मोठा दणका दिला. भारताच्या या निर्णयाने पाकिस्तानमध्ये हाहाकार उडाला असतानाच आता भारत अफगाणिस्तानमधील काबूल नदीवर धरण बांधण्याची योजना आखत आहे. या बातमीनं पाकिस्तानच्या तोंडचे पाणी पळाले आहे. (Pakistan)

कारण पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा प्रांताची जीवनरेखा म्हणून या काबूल नदिचे नाव घेतले जाते. याच नदीवर आता भारताच्या सहाय्यानं शहातूत धरण बांधण्यात येणार आहे. पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये सध्याचे संबंध तणावाचे आहेत. त्यात या दोन देशांमध्ये पाणी वाटपासंदर्भात कुठलाही करार झालेला नाही. त्यामुळे काबूल नदिचे पाणी अडवून शहरातून धरण झाल्यावर अवघ्या पाकिस्तान कोरडा होणार आहे. सोबतच भारताची मदत घेत अफगाणिस्तानने कुनार नदीवरही धरण बांधण्याची घोषणाही केली आहे. या धरणांमुळे काबूल आणि परिसरातील शेतीला मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे. तर पाकिस्तान या धरणामुळे पाण्यासाठी तहानलेला रहाणार आहे. भारताच्या या मास्टरस्टोकमुळे पाकिस्तानचा गळा मात्र आत्ताच कोरडा पडला आहे. (International News)

अफगाणिस्तानच्या काबूल प्रांतातील चरसियाब जिल्ह्यात शहरातून धरण बांधण्यात येणार आहे. या धरणामुळे वीस लाखांहून अधिक कुटुंबांना पिण्याचे पाणी मिळणार आहे. तर 4000 हेक्टर जमिनीला सिंचन सुविधा मिळणार आहे. काबूल नदीवरील हे शहरातून धरण पूर्ण झाल्यावर अफगाणिस्तानची ओळखच बदलणार आहे. कारण येथील अर्थव्यवस्थेला पूरक अशा शेतीला यामुळे जीवनदान मिळणार आहे. कोरड्या अशा अफगाणिस्तानमध्ये अनेक रोजगार निर्माण होणार आहेत. काबूलमधील जनतेचा पाण्याचा प्रश्न सुटल्यामुळे जनजीवनाला मोठा दिलासा मिळणार आहे. अफगाणिस्तानमध्ये हे सर्व होणार आहे, तेही भारताच्या मदतीनं. (Pakistan)

अफगाणिस्तानमधील तालिबान सरकारसोबत भारतानं आपले हितसंबंध अधिक मजबूत करत या शहरातून धरणाचा प्रस्ताव पुढे केला आहे. त्यातून अफगाणिस्तानमध्ये भारताचे स्थान अधिक पक्के झाले आहे. सोबत पाकिस्तानचा आणखी एक पाण्याचा स्त्रोत बंद कऱण्यात भारताला यश आले आहे. शहरातून धरण भारत आणि अफगाणिस्तानमधील जल सुरक्षा आणि सहकार्याला चालना देणारे ठरणार आहे. याआधीही भारतानं अफगाणिस्तानमधील नद्यांवर धरणे बांधण्यासाठी सहाय्य केले आहे. त्यात हरी नदीवर बांधलेल्या सलमा धरणाचा समावेश आहे. या धरणाला भारत-अफगाणिस्तान मैत्री धरण असेही म्हणतात. या सर्व धराणांपेक्षा काबूल नदीवर बांधण्यात येणारे शहरातून धरण हे भव्य असणार आहे. शिवाय या धरणामुळे अफगाणिस्तानला जेवढा फायदा होणार आहे, तेवढाच तोटा पाकिस्तानला होणार आहे. सिंधू खोऱ्याला जोडलेल्या या दोन नद्यांवर धरणे बांधल्यामुळे आता पाकिस्तानच्या मोठ्या जनसंख्येला पिण्याच्या पाण्यासाठी अफगाणिस्तानवर अवलंबून राहावे लागणार आहे. (International News)

या प्रकल्पासाठी भारताने $236 दशलक्ष आर्थिक मदत अफगाणिस्तानला दिली आहे. सोबतच तांत्रिक सहाय्यही प्रदान केले आहे. वास्तविक 2021 मध्ये भारत आणि अफगाणिस्तानमध्ये या प्रकल्पाबाबत करार झाला होता. मात्र तिथे आलेल्या तालिबान सरकारमुळे हा करार थांबवण्यात आला. आता भारत आणि अफगाणिस्तानमधील चर्चा पुन्हा सुरु झाली. भारताकडून या धरणाचे महत्त्व सांगण्यात आल्यानं तालिबान सरकारनं त्याला मंजूरी दिली आहे. शहरातून धरण म्हणजे, पाकिस्तानवर केलेला आणखी एक हल्ला असल्याचे सांगण्यात येत आहे. कारण काबूल नदी ही सिंधू खोऱ्याचा भाग आहे. काबूल नदी हिंदूकुश पर्वतरांगांमध्ये उगम पावते आणि पाकिस्तानातील खैबर पख्तूनख्वा येथे वाहते. या नदीवर धरण बांधल्यावर त्याचा पाकिस्तानच्या पाणीपुरवठ्यावर परिणाम होणार आहे. त्यातच अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमध्ये कोणताही पाणी करार अस्तित्वात नाही. सद्यापरिस्थितीत अफगाणिस्तान सरकारबरोबर पाकिस्तानचे राजकीय संबंधही दुरावलेले आहेत. (Pakistan)

================

हे देखील वाचा : Mahabharat : महाभारतातील ‘या’ आहेत शक्तिशाली महिला

America : 8647 हत्येचा कट !

================

अशा परिस्थितीत, भारताच्या सहाय्यानं होत असलेल्या या प्रकल्पासाठी अफगाणिस्तानला पाकिस्तानच्या परवानगीची आवश्यकता नाही. हे धरण बांधल्याने खैबर पख्तूनख्वामधील पाण्याचा एक प्रमुख स्रोत विस्कळीत होणार आहे. काबूल नदीचे पाणी पेशावर, नौशेरा, अटोक आणि सिंधू नदीच्या संगमापर्यंत शेती आणि पाणीपुरवठ्याचा मुख्य स्रोत आहे. अर्थात शहरातून धरण पूर्ण झाल्यावर ही संपूर्ण शेतजमीन कोरडी होण्याची भीती पाकिस्तानला आहे. सोबत पाकिस्तानमध्ये बलुचिस्तान आणि सिंध प्रांतात सरकारविरुद्ध आंदोलन सुरु आहे. काबूल नदीच्या पाण्याच्या प्रवाहावर नियंत्रण ठेवल्यास पाकिस्तानच्या पश्तून पट्ट्यातही अस्थिरता निर्माण होण्याची शक्यता आहे. या सर्वात पाकिस्तानमध्ये पाणी अडवणुकीसाठी कुठलाही स्रोत नाही. त्यामुळेच काबूल नदीवरील शहरातून धरण योजना जाहीर झाली आणि पाकिस्तानच्या सरकारचा गळा कोरडा पडला आहे. (International News)

सई बने


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.