Home » कोच, कॅप्टन, बॅट्समन चूक कोणाची?

कोच, कॅप्टन, बॅट्समन चूक कोणाची?

by Team Gajawaja
0 comment
India VS New Zealand
Share

सर्व भारतीय कट्टर क्रिकेट चाहतांच्या तोंडात सध्या एकच वाक्य आहे. ये दु:ख साला काहे खतम नही होता! दिवाळीत भारतात आनंदाच वातावरण असताना, गेल्यावर्षीही दिवाळीचा शेवट भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी दु:खाचा झाला होता. त्या जखमेवर मलम लावण्याच काम T -२० वर्ल्डकपच्या विजयाने केलं. पण आता पुन्हा या जखमेवरची खपली काढण्याच काम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड या टेस्ट सीरीजने केलं आहे. तब्बल २४ वर्षांनंतर भारतीय क्रिकेट संघ व्हाइट वॉश झाला आहे. बारावर्षांनंतर आणि १८ मालिकानंतर भारताचा मायदेशात पराभव झाला आहे. भारतीय क्रिकेट चाहत्यांनी ३ नोव्हेंबर हा दिवस भारताच्या क्रिकेट इतिहासातील काळा दिवस घोषित केला आहे. टीम कोच गौतम गंभीर यांना त्यांच्या अटींप्रमाणे सगळं मिळालं असताना. मालिके आधी दमदार दिसणारी टीम पराभूत कशी झाली. त्यामागची कारणं काय आहेत? जाणून घेऊया. (India VS New Zealand)

न्यूझीलंडविरुद्ध असलेल्या टेस्ट मालिकेपूर्वी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये पोहचण्यासाठी भारताला चार सामने जिंकणं गरजेच होतं. कसोटी सामन्यातला इतिहास पाहता, भारत न्यूझीलंडविरुद्ध तिन्ही सामने जिंकेल असं सर्वांनाच वाटत होतं. त्यानंतर ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर भारताने फक्त एक सामना जिंकला की भारतीय संघ फायनलमध्ये प्रवेश करेल, असे स्वप्नं सुद्धा काहींनी पहिले असतीलं. पण न्यूझीलंड संघाने भारताचा 3- ० असा दणदणीत पराभव केला. यापूर्वी 2000 साली दक्षिण आफ्रिकेने भारतात भारताचा 2-0 असा पराभव केला होता. पण या पराभवाचं मुख्य कारण म्हणजे भारतीय फलंदाजांचा खराब फॉर्म. ज्याच्या फिटनेसच उदाहरण अवघ्या जगाला दिलं जातं ज्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 80 शतकं झळकवली आहेत. त्या विराट कोहलीचा फॉर्म या मालिकेत चाललेला दिसला नाही. तीन सामन्यांमध्ये ६ डावात कोहलीने 93 Runs केले. तर कॅप्टन रोहित शर्माने 6 डावात 91 Runs केले. आता भारतीय संघाचे आधारस्तंभ असलेले खेळाडूच चांगलीकामगिरी करू शकले नाहीत, त्यात दुसऱ्यांच काय? (Sports News)

तरी ऋषभ पंतने सर्व सामने मिळून 200 हून अधिक Runs केलं. भारतीय फलंदाजांवर भारी पडले न्यूझीलंडचे डावखुरे फिरकीपटू, संपूर्ण मलिकेत न्यूझीलंडच्या एझाझ पटेलने 15 तर मिचेल सँटनरने 13 विकेट घेतल्या. टेस्ट मॅच एकदम पेशन्सने खेळण्याचा गेम. ऑफस्टंपबाहेर आलेले बॉल्स सोडून, चांगल्या डिलिव्हरीला सावधपणे खेळून आणि खराब बॉलवर अटॅक करणं या खेळात अपेक्षित असतं. पण मालिकेच्या पहिल्याच सामन्यात बंगळुरूमध्ये न्यूझीलंडच्या मॉट हेन्री, टीम साऊदी आणि विल्यम ओ रुक यांच्यासमोर भारतीय फलंदाज ठेपाळले. 31.2 Overs मध्येच भारताचा डाव 46 Runs वरच आटोपला. (India VS New Zealand)

पुण्यात न्यूझीलंड संघाने मालिका स्वत: च्या नावावर केली. भारतीय संघ पहिल्या डावात 156 Runs करून Pavilion मध्ये परतला, आणि दुसऱ्या डावात थोडी सुधारणा करत245  Runs चा आकडा पार केला. मुंबईत पहिल्या डावात 263 Runs करून दुसऱ्या डावात 147 Runs चा पाठलाग करताना 121 Runs वर भारतीय संघ ऑलआउट झाला. भारतीय फलंदाज Pavilion मध्ये परतण्याच्या घाईत दिसत होते. थोडक्यात, जिथे टिकून खेळायला हवं होतं, तिथे तडकाफडकी शॉट्स खेळून कार्यक्रमच झाला ! न्यूझीलंडच्या बोलर्संनी तब्बल १४ वेळा भारतीय फलंदाजांना 0 Runs वर पिच सोडायला भाग पाडलं. मिचेल सँटनर आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्सकडून खेळतो. भारतातल्या वेगवेगळ्या पीचेसवर खेळण्याचा अनुभव त्याने इथे चोख वापरला. (Sports News)

तर मुंबईच्या जोगेश्वरीच्या पण न्यूझीलंडमध्ये स्थायिक झालेल्या एझाझ पटेलने, 2 वर्षांपूर्वीच भारताविरुद्ध 10 विकेट्स घेतल्या होत्या, आता सुद्धा त्याने वानखेडे स्टेडियमवर 10 विकेट्स घेत भारतीय फलंदाजांचा धुव्वा उडवला. प्रश्न हा पडतो की, भारताने न्यूझीलंडला हलक्यात घेतलं का? कारण न्यूझीलंडने भारतात आतापर्यंत एकही कसोटी मालिका जिंकली नव्हती. या मालिकेपूर्वी श्रीलंकेने न्यूझीलंडचा पराभव केला होता. त्यामुळे भारतासाठी ही मालिका केक-वॉक ठरेल असं वाटलं होतं. बीसीसीआयने सर्व अटी व शर्ती मान्य करून गौतम गंभीरयांच्याकडे हेड कोचचा पदभार सोपवला होता. पण त्याच्या मार्गदर्शनाखाली टीम इंडियाने असे रेकॉर्डस बनवले आहेत, जे भारतीय क्रिकेट चाहत्यांना नको होते. 27 वर्षानंतर टीम इंडियाला श्रीलंकेविरुद्ध वनडेमध्ये पराभव पत्करावा लागला, तो ही असा तसा नाही श्रीलंकेविरुद्धच्या तिन्ही सामन्यांत टीम इंडिया ऑल आउट झाली. एकदिवसीय मालिकेत फिरकी गोलंदाजीविरुद्ध सर्वाधिक विकेट्स गमावणारा भारत पहिला संघ ठरला. (India VS New Zealand)

======

हे देखील वाचा :  एका माणसाला मारण्याचे ९ वेळा भयानक प्रयत्न केले ?

====

न्यूझीलंडच्या मालिकेबद्दल बोलायचं तर त्यांनी घरचाअभ्यास चांगला केला होता. कदाचित न्यूझीलंड टीमला पण स्वप्नात सुद्धा वाटलं नसेल की आपण भारताला भारतात हरवू. पण त्यांनी मेहनत घेतली, तयारी केली, आणि ते करुन दाखवलं. आता काही दिवसांत टीम इंडियाला ऑस्ट्रेलिया विरुद्ध बॉर्डर – गावस्कर ट्रॉफी खेळायची आहे. त्यासाठी त्यांना खूप मेहनत घ्यावी लागणार आहे. आधी आलेलं अपयश बाजूला सारून त्यांना पुन्हा उभं राहावं लागेल. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये पोहचण्यासाठी टीम इंडियाला पाच सामन्यांपैकी चार सामने जिंकावे लागतील. आव्हन तगड आहे, पण त्यातच मजा आहे. टीम इंडियावर आता फॅन्स नाराज जरी असले तरी, बॉर्डर – गावस्कर ट्रॉफीसाठी टीम इंडियाला त्याहून दुप्पट सपोर्ट आपण देऊच. (Sports News)


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.