गेल्या दहा वर्षांपासून आयसीसी जेतेपदापासून दूर राहिलेल्या भारतीय संघाला जागतिक कसोटी अजिंक्यपदाचा अंतिम सामना जिंकत आपला जेतेपदाचा दुष्काळ संपवण्याची संधी चालून आली आहे. अलीकडच्या काळात भारतीय संघाला आयसीसीच्या जेतेपदाने सातत्याने हुलकावणी दिली आहे, परंतु “कसोटी अजिंक्यपदाचा अंतिम सामना खेळतांना आमच्यावर यातील कुठलेही दडपण नसणार” असे मत भारतीय संघाचे प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी व्यक्त केले आहे.(WTC Final)

भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान कसोटी अजिंक्यपदाच्या दुसऱ्या सत्राचा अंतिम सामना (WTC Final) खेळवला जाणार आहे. २०२१ साली झालेल्या अंतिम सामन्यात विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाला अंतिम फेरीत पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यापूर्वी २०१४ च्या ट्वेन्टी-२० विश्वचषक करंडक व २०१७ च्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला होता. २०१५ व २०१९ चा वनडे विश्वचषक तसेच २०१६ व २०२१ ट्वेंन्टी-२० विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत भारताला पराभवाचा सामना करावा लागला होता. आयसीसी बाद फेरीतील महत्वाच्या सामन्यांतील पराभवाची मालिका खंडित करण्याचा भारताचा प्रयत्न असेल.(WTC Final)

भारतीय संघाला बाद फेरीतील महत्वाच्या सामन्यांत विजय मिळवणे जमले नसले तरी मागच्या काही वर्षांमध्ये भारतीय संघाच्या कामगिरीत सातत्य जाणवते. भारतीय संघ मायदेशात तसेच परदेशातदेखील सातत्याने विजय मिळवत आला आहे. ही संघासाठी खूप सकारात्मक बाजू आहे. आम्ही सर्वोत्तम खेळ करण्याचा प्रयत्न करू असा विश्वास राहुल द्रविड यांनी व्यक्त केला आहे.(WTC Final)
आयपीएलचा हंगाम संपवून भारतीय संघातील खेळाडू इथे दाखल झाले होते. आयपीएल सुरु असतांनादेखील भारतीय संघाने या सामन्यासाठी तयारी सुरु ठेवली होती. पुजारा ससेक्स कडून इंग्लंडमध्येच कौंटी क्रिकेट खेळत होता. त्याच्या अनुभवाचादेखील भारताला फायदा होईल. अनुभवी फलंदाज अजिंक्य रहाणेचे कसोटी संघातील पुनरागमन भारतीय फलंदाजीला मजबूत करणारे ठरेल. स्टार फलंदाज विराट कोहली व कर्णधार रोहित शर्मा यांच्याकडून देखील संघाला अपेक्षा असतील. आयपीएलमधील आपला भन्नाट फॉर्म कायम ठेवण्याचा प्रयत्न शुभमन गिल करेल.(WTC Final)
=======
हे देखील वाचा : कसोटी अजिंक्यपदावर भारताची नजर
=======
अंतिम अकरामध्ये कोणत्या खेळाडूंना स्थान मिळेल याचा अजूनही अंदाज आलेला नाही. दिग्गज माजी भारतीय खेळाडू याबद्दल तर्कवितर्क लावत आहेत. दोन्ही संघ तुल्यबळ भासत आहेत त्यामुळे क्रिकेटरसिकांना चुरशीची लढत बघायला मिळण्याची आशा आहे. सर्वोत्तम खेळ करणाऱ्या संघालाच जेतेपदाला गवसणी घालता येईल एवढं मात्रं नक्की!