Home » भारतातील एकमेव उलटी वाहणारी नदी

भारतातील एकमेव उलटी वाहणारी नदी

भारतात गंगा आणि यमुना नदीच नव्हे तर अन्य काही नद्यांना सुद्धा पवित्र मानले जाते. त्यापैकी अशा काही नद्या आहेत ज्या काही शहरच नव्हे तर काही राज्यांसाठी जीवनदायनी मानल्या जातात.

by Team Gajawaja
0 comment
India reverse river
Share

भारतात गंगा आणि यमुना नदीच नव्हे तर अन्य काही नद्यांना सुद्धा पवित्र मानले जाते. त्यापैकी अशा काही नद्या आहेत ज्या काही शहरच नव्हे तर काही राज्यांसाठी जीवनदायनी मानल्या जातात. देशातील बहुतांश नद्या पश्चिमेकडून पूर्वेला वाहतात. मात्र देशात अशी एक नदी सुद्धा आहे जी पूर्वेकडून पश्चिम दिसेला वाहते आणि देशाला दोन हिस्स्यात विभागते. या नदीला गंगा आणि यमुना नदीप्रमाणे पवित्र मानले जाते. (India reverse river)

गंगा आणि यमुनेप्रमाणे पवित्र मानली जाणारी नर्मदा नदी मध्य प्रदेश आणि गुजरात मधील प्रमुख नदी आहे. नर्मदा नदी देशातील एकमेव अशी नदी आहे, जी देशातील अन्य नद्यांच्या प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वाहते. तर मध्य प्रदेशातील उज्जैन मध्ये जेव्हा महाकाल आणि आमकारेश्वर यांच्या दर्शनासाठी जाता तेव्हा तेथे तुम्हाला नर्मदा नदीचे दर्शन होते. नर्मदा नदीला ‘मोक्षदायिनी’ असे सुद्धा म्हटले जाते. जेथे देशातील अन्य नद्या पश्चिमेकडून पूर्वेला वाहत बंगालच्या खाडीला जाऊन मिळतात. मात्र नर्मदा नदी पूर्वेकडून पश्चिमेला वाहत अरब सागराला जाऊन मिळते.

Now Take A 15-Day Tour Along The Banks Of River Narmada At ₹63,000

नर्मदा नदीला देशातील सात सर्वाधिक प्रमुख नद्यांपैकी एक मानले जाते. ही नदी मैखल पर्वताहून अमरकंटक मध्ये एका कुंडात आणि सोनभद्राच्या पर्वत रागांतून निघतले. अमरकंटक मध्य प्रदेशातील शहडोल जिल्ह्यातील पुष्पराजगढ जिल्ह्यात आहे. नर्मदा नदी उलट दिशेने वाहण्याचे कारण म्हणजे रिफ्ट वॅली. सोप्प्या शब्दात बोलायचे झाल्यास तर नदीचा प्रवाह हा उलट दिशेने आहे.

नर्मदा नदी उलट दिशेने वाहण्यामागे एक धार्मिक मान्यता सुद्धआ आहे. पौराणिक कथेनुसार नर्मदा आणि शोध भद्र यांचा विवाह होणार होता. मात्र विवाहापूर्वी नर्मदेला कळळे की, भद्राला दासी जुहिला पसंद आहे. नर्मदेला हा अपमान वाटला आणि मंडप सोडून उलट दिशेला गेली. शोण भद्रने तिला थांबवण्याचा खुप प्रयत्न केला. मात्र ती थांबली नाही. त्यामुळेच नर्मदा आज सुद्धा उलट दिशेने वाहते. (India reverse river)

हेही वाचा-  पाताळनगरीकडे जाणारी नागविहीर

मोक्षदायिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या नदीला मध्य प्रदेश आणि गुजरातची जीवनरेषा असे ही म्हटले जाते. ही नदी तिच्या उगम स्थळानंतर दीर्घ मार्गावरुन वाहते. नर्मदेच्या पश्चिमेला १३१२ किमीवर खंबातची खाडी अरब सागराला जाऊन मिळते. नर्मदा नदी याआधी मध्य प्रदेश, गुजरात आणि महाराष्ट्रातून ९५,७२६ वर्ग किमीचे पाणी आपल्यासोबत घेऊन जाते. नर्मदा भारताला जवळजवळ दोन समहिस्स्यात विभागते. ही नदी भारताच्या केंद्रीय उच्च भूमी आणि दख्खनच्या पठारात देशाला विभागते.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.