भारताला २०२१ मध्ये परदेशातून मनी ऑर्डरच्या रुपात ८७ अरब डॉलर मिळाले आणि या प्रकरणी देश सर्वाधिक वरच्या स्तरावर राहिला आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या रिपोर्ट्मध्ये असे सांगितले गेले आहे. डब्लूएचओच्या निवासी आणि स्थलांतरितांच्या पहिल्या रिपोर्टमध्ये असे म्हटले गेले आहे की, आज जगात प्रत्येक आठ पैकी एक व्यक्ती म्हणजेच जवळजवळ एक अरब प्रवासी आहे. यामध्ये असे ही म्हटले गेले आहे की, डॉलरच्या रुपात विदेशातून मनी ऑर्डर प्राप्त करण्यामध्ये प्रमुखपाच देश त्यामध्ये भारत, चीन, मेक्सिको, फिलिपिन्स आणि मिस्रचा समावेश आहे. रिपोर्टनुसार २०२१ मध्ये ८७ अरब डॉलर मिळवण्यासह भारतातील उर्वरित आणि मध्यम उत्पन्न असलेल्या देशांच्या श्रेणीत वरच्या स्तरावर आहे. तर चीन आणि मेक्सिकोने ५३ अरब डॉलर, फिलिपीनने ३६ अरब डॉलर तर मिस्रने ३३ अरब डॉलर मिळवले.(India Remittances 2022)
अमेरिकेतून अधिक पैसे आले
जर स्रोताबद्दल बोलायचे झाल्यास तर अमेरिकेतून सर्वाधिक पैसा भारतात आला. त्यानंतर संयुक्त अरब अमीरात, सौदी अरब आणि स्विर्त्झलँन्डचा समावेश आहे. रिपोर्टमध्ये असे सांगितले गेले आहे की, यंदाच्या वर्षी परदेशातून पैसा आल्याच्या प्रकरणी देशाची स्थिती उत्तम राहण्याची अपेक्षा आहे. पण कोविड१९ च्या कारणामुळे आव्हानं सुद्धा आहेत.
मोठ्या संख्येने परदेशी चलन देशात येते
यामध्ये असे सांगितले गेले आहे की, मनी ऑर्डर हे स्थलांतरित लोकांसह त्यांच्या मित्रपरिवासाठी फार महत्वपूर्ण आणि सकारात्मक आर्थिक परिणाम आहे. जे त्यांच्यापासून दूर देशात असतात. तज्ञांनी असे म्हटले की, भारतीयांद्वारे परदेशात पैसे पाठवल्याने मोठ्या प्रमाणात येथे परदेशी चलन येते. ही रक्कम वर्षाला प्रत्यक्ष परदेशातील गुंतवणूकीच्या ६० अरब डॉलरपेक्षा अधिक आहे. भारतात काही वर्षांपासून परदेशातून पैसे येण्याची प्रकरणी अधिक वाढली गेली आहेत.
भारतातील रेमिटंन्स फ्लो मध्ये १२ टक्क्यांनी वाढ
वर्ल्ड बँकेच्या विकास रिपोर्टमध्ये असे म्हटले गेले आहे की, हे रेमिटंन्सचे आकडे भारतातील रेमिटंन्सच्या फ्लो मध्ये १२ टक्क्यांनी वाढ करु शकतात. ज्यामुळे भारतातील रेमिटंन्श फ्लो च्या टक्केवारीत चीन, मेक्सिक आणि फिलिपिंन्सच्या पुढे जाईल. भारताव्यतिरिक्त साउथ एशियात रेमिटेंसचा अनुमान ३.५ टक्क्यांनी वाढून १६३ बिलियन अमेरिकन डॉलर झाला आहे.(India Remittances 2022)
हे देखील वाचा- तुमच्याकडे ITR ची कागदपत्र नसतील तरीही घेता येईल बँकेकडून कर्ज
रेमिटंन्स म्हणजे काय?
रेमिटंन्स मध्ये कार्य करत असलेल्या एखाद्या देशातील व्यक्तीकडून आपल्या देशात पाठवलेला पैसा. स्थलांतरितद्वारे घरी पाठवण्यात आलेला पैसा ह त्या देशातील सकल घरगुती उत्पादात प्रमुख वाढ करतो. जो एखाद्या विकासशील देशासाठी महत्वपूर्ण आहे.