जर तुम्ही ऑनलाईन शॉपिंग करत असाल तर ही तुमच्यासाठी फार महत्वाची बातमी आहे. कारण आता तुम्ही अॅमेझॉन आणि फ्लिपकार्टसारख्या सुविधा इंडिया पोस्टच्या माध्यमातून सुद्धा खरेदी करु शकता. कारण आता भारतीय पोस्टाने सुद्धा आपले ई-कॉमर्स पोर्टल सुरु केले आहे. भारतीय पोस्टने याच्या सुरुवातीने अॅमेझॉन आणि फ्लिपकार्ट सारख्या मोठ्या ई-कॉमर्स वेबसाइटला टक्कर देणार आहे. कारण भारतीय पोस्ट हे एक विश्वासू आणि फार मोठे नेटवर्क भारतात खुप वर्षांपासून पसरलेले आहे. या नव्या सुरुवातीने आता पोस्टच्या ग्राहकांना लहान-लहान गोष्टींसाठी सुद्धा वारंवार पोस्टात यावे लागणार नाही. कारण इंडिया पोस्ट आता अमेझॉन आणि फ्लिपकार्ट प्रमाणेच फ्री होम डिलिव्हरी करणार आहे. यामुळे प्रत्येकाच्या घरोघरी भारतीय पोस्टाच्या सेवेचा लाभ घेता येणार आहे.(India Post Shopping)
भारतीय पोस्टाने याच्या सुरुवातीसह आता लोकांना घरातील सामानाची सुद्धा थेट डिलिव्हरी करणार आहे. आता अॅमेझॉन आणि फ्लिपकार्ट सारख्या बड्या ई-कॉमर्स वेबसाइट प्रमाणेच भारतीय पोस्ट ही ई-कॉमर्सच्या माध्यमातून लोकांना घरापर्यंत सामान पोहचवणार आहे. तर सामान्य लोकांना अन्य सुविधा सुद्धा उपलब्ध करुन देणार आहे.

भारतीय पोस्टच्या ई-कॉमर्स वेबसाइटच्या माध्यमातून खरेदी करण्यात आलेले सामान पोस्टमन भारतातील कोणत्याही कोपऱ्यात आणि कोणत्याही नागरिकाला पोहचवणार आहे. सर्वात मोठी गोष्ट अशी की, भारतात प्रत्येक गावातील परिसरात पोस्ट ऑफिस आहे. याची संख्या आता जवळजवळ १.५५ लाखांपेक्षा अधिक आहे. अॅमेझॉन आणि फ्लिपकार्ट प्रमाणेच भारतीय पोस्टाचे ग्राहक आणि दुकानदारांना आपल्या सोबत काम करण्यासह खरेदी करण्याची संधी देत आहे.(India Post Shopping)
हे देखील वाचा- मोबाईल बँकिंगचा वापर करत असाल तर व्हा सावध! वेगाने पसरतोय ‘हा’ वायरस
भारतीय पोस्टाच्या ई-कॉमर्स वेबसाइटचा असा वापर केला जाणार
-सर्वात प्रथम तुम्हाला भारतीय पोस्टाच्या अधिकृत वेबसाईट Ecom.Indiapost.Gov.In येथे भेट द्यावी लागेल
-आता होम पेजवर तुम्हाला My Account च्या ऑप्शनवर क्लिक करावे लागेल
-येथे दोन प्रकारचे ऑप्शन दिसतील जसे की, Existing User आणि New User? Register Now
-आता तुमच्यानुसार ऑप्शन निवडावा लागणार असून तेथे रजिस्ट्रेशन करावे लागणार आहे
-आता रजिस्ट्रेशन करण्यासाठी तुमचा पत्ता, पिन कोड, राज्य, मोबाईल क्रमांक, ईमेल आयडीची माहिती द्यावी लागणार आहे
-आता आपली खासगी माहिती सेव्ह केल्यानंतर नवा युजर आयडी पासवर्ड मिळेल