सध्या सर्वत्र भारत आणि पाकिस्तानमध्ये सुरु असलेल्या युद्धाच्याच बातम्या सुरु आहेत. भारताकडून राबवल्या जाणाऱ्या ‘ऑपरेशन सिंदूर’ची जगभर चर्चा सुरु आहे. जवळपास मागील ३ दिवसांपासून भारत आणि पाकिस्तानमध्ये सीमारेषेवर तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती. पाकिस्तानने भारतावर विविध पद्धतीने अनेक हल्ले केले आणि हे सर्व हल्ले भारतीय सेनेने परतावून लावले. भारताने केलेल्या जोरदार प्रत्युत्तरानंतर पाकला पळता भुई थोडी झाली आणि त्यांना त्यांची चूक लक्षात आहे. (India)
भारतासोबत पंगा घेणे परवडणारे नाही हे सत्य अखेर पाकड्यांनी स्वीकारले आहे. देशाचं मोठं नुकसान झाल्यानंतर का असेना पाकिस्तानला अक्कल आली आणि म्हणूनच त्यांनी या युद्धातून पळ काढला आहे. पाकिस्तानने शस्त्रसंधीसाठी पुढाकार घेतला आहे. आज दिनांक १० मे ला संध्याकाळी ५ वाजेपासून शस्नसंधीची घोषणा केली आहे. भारतीय पराराष्ट्र मंत्रालयाने पत्रकार परिषद घेऊन आज ५ वाजेपासून भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धविराम केल्याची घोषणा केली आहे. या युध्दविरामानंतर सगळीकडे शस्त्रसंधी हा शब्द गाजत आहे. त्यामुळे सगळ्यांना शस्त्रसंधी म्हणजे काय हे जाणून घेण्याची खूपच उत्सुकता आहे. जाणून घेऊया शस्त्रसंधी म्हणजे काय? (India – Pak War)
युद्धबंदी किंवा युद्धविराम म्हणजे युद्धात सहभागी असलेल्या देशांनी त्यांच्यातले युद्ध किंवा लढाई थांबवण्यासाठी सामंजस्याने केलेला परस्पर करार. हा करार कायमस्वरूपी किंवा तात्पुरता देखील असू शकतो. युद्धविराम हा बऱ्याचवेळा देशांमधील औपचारिक कराराचा भाग असतो, मात्र तो कोणत्याही स्वाक्षरी केलेल्या कराराशिवाय अनौपचारिक देखील होऊ शकतो. (Marathi Top News)
युद्धविराम हे दोन देशांमधील युद्ध थांबवण्याचे तात्पुरते माध्यम आहे. दोन्ही देशांदरम्यान झालेल्या या शस्त्रसंधीच्या करारानुसार दोन्ही देश दोन्ही बाजूंनी सीमेवर आक्रमक कारवाई न करण्याचे आश्वासन देतात. असं म्हटलं जातं की, एक यशस्वी युद्धविराम हा बहुतकरून शांततेचा तोडगा देखील ठरू शकतो. (Marathi Latest News)
बहुतकरून शस्त्रसंधीचा निर्णय हा तेव्हा घेतला जातो जेव्हा दोन देशांमध्ये काही काळ युद्ध सुरू असते आणि दोन्ही देशांना जेव्हा युद्धात कोणीही पूर्णपणे विजयी होणे अशक्य वाटते, मात्र ते पूर्णपणे तडजोड करण्यास तयार नसतात. अशा वेळी, दोघांमध्ये अनेकदा युद्धविराम होतो आणि ज्या ठिकाणी त्यांच्या सैन्यात संघर्ष होतो ती जागा त्यांची प्रत्यक्ष परस्पर सीमा बनते. जरी एक किंवा दोन्ही पक्ष ती वैध सीमा म्हणून स्वीकारण्यास तयार नसले तरी. अशा सीमांना युद्धबंदी रेषा म्हणतात. (Top Trending Marathi News)
=======
हे देखील वाचा : HAROP Drone : पाकिस्तानची एअर डिफेन्स सिस्टिम नष्ट करणाऱ्या ‘हार्पी ड्रोन’ची वैशिष्ट्ये
Air Defence : भारताने नष्ट केली पाकिस्तानची एअर डिफेन्स सिस्टिम, जाणून घ्या या प्रणालीबद्दल
=======
१९६५ च्या युद्धानंतर, काश्मीर प्रदेशातील भारत आणि पाकिस्तानमधील सीमेला युद्धविराम रेषा देखील म्हटले जाऊ लागले. मात्र १९७१ च्या शिमला करारानंतर तीच रेषा नियंत्रण रेषा म्हणून ओळखली जाऊ लागली. युद्धविराम किंवा सीजफायरमध्ये एक सामंजस्याने निर्णय घेतला जातो. यानंतर निश्चित जागेसाठी आणि वेळेकरता सैन्य सर्व हालचाली थांबवतात. याला युद्धविराम दिल्याचे म्हटले जाते. युद्धविराम हा एक लष्करी करार आहे ज्याचा प्राथमिक उद्देश युद्ध संपवणे आणि दोन्ही देशांमध्ये शांती निर्माण करणे हा आहे.(Top Marathi News)