Home » कसोटी अजिंक्यपदावर भारताची नजर

कसोटी अजिंक्यपदावर भारताची नजर

by Team Gajawaja
0 comment
WTC Final
Share

सात जूनपासून ओव्हल येथे भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यादरम्यान जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना खेळवण्यात येणार आहे. या सामन्यात भारतीय फिरकी गोलंदाजांना मदत मिळू शकते असे मत ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टीव्ह स्मिथने व्यक्त केले आहे. त्यामुळे ओव्हलची खेळपट्टी फलंदाजांसाठी अनुकूल असली तरी येथे अश्विन, जडेजा आणि अक्सर पटेल या भारतीय फिरकीपटूचा बोलबाला बघायला मिळण्याची शक्यता आहे.(WTC Final)

अंतिम सामन्याबाबत (WTC Final) बोलतांना तो पुढे म्हणाला, जसा खेळ पुढे सरकेल तसं इथे फलंदाजांना धावा करणे अवघड जाऊ शकते. अखेरच्या दिवशी ही खेळपट्टी भारतीय खेळपट्ट्यासारखी वागू शकते. वेगवान गोलंदाज तसेच फिरकी गोलंदाजाचा दबदबा असणाऱ्या या खेळपट्टीवर धावा करणे आव्हानात्मक असेल, असे स्टीव्ह स्मिथला वाटते. त्यामुळे भारतीय फिरकीपटूसमोर चांगली कामगिरी करण्याचे आव्हान ऑस्ट्रेलियन फलंदाजांसमोर असेल. तसेच त्यांना या सामन्यात वरचढ ठरायचे असेल तर त्यांच्या फिरकीपटूना चांगली कामगिरी बजावत बळी मिळवावे लागतील. फेब्रुवारीमध्ये ऑस्ट्रेलियाचा संघ भारत दौऱ्यावर आला होता. तेव्हा फिरकीसमोर त्यांचा काही निभाव लागला नव्हता. आपली कामगिरी सुधारण्यासाठी ते प्रयत्नशील असतील.(WTC Final)

आयपीएलचा हंगाम संपवून भारतीय खेळाडू टप्प्याटप्प्याने इंग्लंडमध्ये दाखल झाले आहेत. भारतीय संघाने आयोजित केलेल्या सराव शिबिरात हजेरी लावत भारतीय खेळाडूंनी सरावदेखील केला. विराट कोहली, अक्सर पटेल, कर्णधार रोहित शर्मा आदी खेळाडू सराव करतांना दिसून आले. पुजारा कौंटी क्रिकेट खेळत असल्याने बऱ्याच दिवसापासून इंग्लंडमध्ये आहे. त्याच्या तिथे खेळण्याचा फायदा भारतीय संघाला नक्कीच होईल असे मत माजी कर्णधार सुनील गावसकर यांनी व्यक्त केले आहे.(WTC Final)

भारतीय संघाच्या अंतिम निवडीबाबतदेखील (WTC Final) बऱ्याच चर्चांना उधाण आलेले आहे. भारताचा प्रमुख यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत दुखापतग्रस्त असल्याने त्याच्याजागी कुणाला खेळवायचे हा प्रश्न कायम आहे. युवा इशान किशन आणि केएस भारत असे दोन पर्याय भारतीय संघापुढे उपलब्ध आहेत. यष्टिरक्षक म्हणून केएस भारत याला तर शार्दुल ठाकूरऐवजी उमेश यादवला अंतिम अकरामध्ये स्थान मिळायला हवे, असे मत भारतीय क्रिकेट निवड समितीचे माजी सदस्य सरनदीप यांनी व्यक्त केले आहे.

=======

हे देखील वाचा : आयपीएलमध्ये ‘या’ खेळाडूंनी जिंकले अवार्ड्स!

=======

सात जून ते अकरा जून दरम्यान खेळवल्या जाणाऱ्या या सामन्यात (WTC Final) भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात जेतेपदासाठी थेट लढत होणार आहे. दोन्ही संघ तुल्यबळ असल्याने ही लढत रंगतदार होणार असल्याची शक्यता आहे. जेतेपद जिंकण्याच्या तयारीने भारतीय संघ मैदानात उतरेल. प्रेक्षक या सामन्यासाठी आवर्जून उपस्थिती लावतील अशी आशा आयसीसीने व्यक्त केली आहे.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.