अर्थव्यवस्थेबद्दल सरकार आणि जनतेसाठी एक आनंदाची बातमी आहे. भारताचा जीडीपीने सर्वाधिक एक्सपर्ट आणि रेटिंग एजेंसीच्या अनुमानाला मागे सोडत एप्रिल-जून मध्ये ४ तिमाहीतील सर्वाधिक वेगवान ग्रोथ दाखल केली आहे. सरकारकडून जारी करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहित भारताने ७.८ टक्क्यांनी विकास दर मिळवला आहे. (India GDP Data)
NSO ने आकडेवारी जारी करत असे म्हटले की, २०२३-२४ च्या पहिल्या तिमाहित एप्रिल-जून मध्ये विकास दर ७.८ टक्के होता. हा चार तिमाहितील सर्वाधिक विकासदर आहे. बहुतांशकरुन इकनॉमिस्टने ७.७ टक्क्यांच्या ग्रोथ रेटचा अंदाज लावला होता. याआधी एप्रिल-जून २०२२ मध्ये जीडीपीचा विकास दर १३.१ टक्के होता. त्यानंतर तीन तिमाहित ग्रोथ रेट कधीच ऐवढा वर गेला नव्हता. जानेवारी-मार्च २०२३ मध्ये विकास दर केवळ ६.१ टक्के होता.
भारताचा ग्रोथ रेट हा कंस्ट्रक्शन आणि उत्पादन सेक्टर संदर्भात मिळून दिला गेला आहे. महागाई सारख्या स्थितीत ही ग्राहकांनी मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरला भरपूर प्रतिसाद दिला. एप्रिल-जून महिन्याच्या तिमाहित कंस्ट्रक्शन क्षेत्राचा ग्रोथ रेट ७.९ टक्के होता. जो जानेवरी-मार्च मध्ये १०.४ टक्के आणि गेल्या वर्षात एप्रिल-जून मध्ये १६ टक्के होता. अशा प्रकारे मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरचा ग्रोथ ४.७ टक्के होता. जो जानेवारी-मार्च तिमाहित ४.५ टक्के आणि गेल्या वर्षात एप्रिल-जून मध्ये ६.१ टक्के होता.
त्याचसोबत वातावरणाची स्थिती व्यवस्थितीत नसली तरीही भारतातील कृषी क्षेत्राने आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहित मजबूच ग्रोथ दाखल केली आहे. एप्रिल-जून तिमाहित एग्रीकल्चर सेक्टरची ग्रोथ ३.५ टक्क होती. तर गेल्या वर्षषातच्या तुलनेच्या तिमाहित ती २.४ टक्के होती. जानेवारी-मार्च तिमाहित सुद्धा एग्रीकल्चर सेक्टरचा ग्रोथ रेट ५.५ टक्के होता. (India GDP Data)
हेही वाचा- काँग्रेसला पक्ष चिन्ह मिळण्यामागील इंदिरा गांधी आणि देवराह बाबा यांच्यातील रहस्यमय कथा
तसेच जीडीपीचा मजबूत ग्रोथ रेट सांभाळण्याचे काम देशाच्या ग्राहकांनी केले आहे. एप्रिल-जून तिमाहित खासगी सेलमध्ये वाढ सहा टक्के होता. जानेवारी-मार्चच्या तिमाहित त्याचा दर २.८ टक्के होती. तर एप्रिल-जून तिमाही २०२२ मध्ये तो १९.८ टक्के होता. यंदाच्या वर्षात एप्रिल-जून मध्ये सरकारचा खर्च शून्यापेक्षा ही ०.७ टक्क्यांनी खाली गेला आहे. जो जानेवारी-मार्चच्या तिमाहित २.३ टक्के होता आणि एप्रिल-जून २०२२ दरम्यान १.८ टक्के होता.