संपूर्ण देशभरामध्ये रामनवमीचा मोठा उत्साह आहे. मोठ्या जल्लोषामध्ये रामनवमीचा उत्सव साजरा होत आहे. देशातील प्रमुख राम मंदिरांमध्ये दर्शनासाठी मोठी गर्दी होताना दिसत आहे. आजचा दिवस अत्यंत शुभ आणि पवित्र असल्याने अनेक चांगल्या गोष्टींची आज सुरुवात होत आहे. याच दिवसाचे औचित्य साधत रामनवमीच्या शुभ मुहूर्तावर तमिळनाडूला मोठी भेट मिळाली. आज ६ एप्रिल रोजी रामेश्वरममध्ये भारतातील पहिल्या व्हर्टिकल लिफ्ट सी ब्रिजचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. व्हर्टिकल लिफ्ट सी ब्रिज अर्थात पंबन पूल हा भारतातील पहिला व्हर्टिकल लिफ्ट रेल्वे सागरी सेतू आहे. (Pamban Bridge)
रेल्वेच्या इतिहासातील सर्वात महत्त्वाच्या प्रकल्पांमध्ये पांबन पूलचा समावेश केला आहे. हा पूल केवळ तांत्रिक कामगिरीच नाही तर तमिळ संस्कृती, भाषा आणि प्राचीन सभ्यतेच्या वारसाशी घट्ट जोडलेला आहे. हा पूल तब्बल ५५० कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चून बांधण्यात आला आहे. नवीन पंबन रेल्वे पुलाचे उद्घाटन केल्यानंतर पंतप्रधान रामेश्वरम-तांबरम (चेन्नई) नवीन रेल्वे सेवेला हिरवा झेंडा दाखवला. (Railway News)
तामिळनाडूमधील पंबन ब्रिज हा भारतातील पहिला उभा लिफ्ट समुद्री पूल असणार आहे. उभा लिफ्ट सी ब्रिज म्हणजे असा पूल ज्याचा एक भाग वर-खाली होतो जेणेकरून जहाजांना अडथळा न येता जाता येईल. पंतप्रधान मोदींनी २०१९ मध्ये पांबन पुलाची पायाभरणी केली होती. ५ वर्षांत तो पूर्ण झाला. हा २.०८ किलोमीटर लांबीचा हा पूल रामेश्वरम (पंबन बेट) आणि तामिळनाडूतील मंडपम यांना जोडतो. हा पूल अनेक प्रकारे खास आहे. अतिशय चर्चेत असणाऱ्या या पंबन पुलाची नक्की वैशिष्ट्य कोणती चला जाणून घेऊया. (Marathi Latest News)
=========
हे देखील वाचा : Airports : ‘ही’ आहेत जगातील सर्वाधिक धोकायदायक विमानतळं
==========
– नवीन पंबन ब्रीज हा जुन्या पुलाच्या समांतर बांधण्यात आलेला आहे. या पुलाचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे याचा एक भाग पाण्यातून वाहतूक करणारी जहाजे, स्टीमर इत्यादींना मार्ग मोकळा करून देण्यासाठी वर उचलता येणार आहे. (Top News)
– यामध्ये पुलाचा ७२ मीटरचा भाग २२ मीटर उंचीपर्यंत लिफ्टद्वारे वर उचलला जाईल, ज्यामुळे मोठ्या आणि उंच समुद्री जहाजांना खालून सहजपणे जाता येईल. २ किलोमीटरहून अधिक लांबीचा हा पूल समुद्रावर बांधण्यात आलेला आहे आणि तो भारताच्या पहिल्या व्हर्टिकल लिफ्ट सी ब्रिज या नावाने ओळखला जाणार आहे. (Latest Marathi News)
– सन १९१४ मध्ये बांधलेला जुना पंबन ब्रीज हा भारतातील पहिला समुद्री पूल होता, जो तमिळनाडूतील मंडपम टाऊनला रामेश्वरम बेटाशी जोडत होता. या जुन्या पुलामध्ये एक शेर्झर रोलिंग लिफ्ट स्पॅन होता, ज्यामुळे समुद्रातील जहाजे सहजपणे पार होत नव्हती. (Social News)
– १०० वर्ष जुना पंबन पूल गंज लागल्यामुळे आणि जीर्ण होत असल्यामुळे भविष्यातली कोणतीही दुर्घटना टाळण्यासाठी तसेच भूकंप, चक्रीवादळ आणि समुद्री हालचालींचा विचार करता, एक नवीन आणि अधिक टिकाऊ पुल बांधण्याची तयारी करण्यात आली. या नव्या पुलाचे काम आता अंतिम टप्प्यात पोहोचले आहे.(Railway Bridge News)
– भारताचा पहिला व्हर्टिकल लिफ्ट समुद्री रेल्वे पूल असलेल्या या पुलावरून ९८ किमी प्रतितास वेगाने गाड्या धावू शकतील, ज्यामुळे प्रवासाचा वेळ मोठ्या प्रमाणात कमी होईल. या पुलाची २५ टन प्रति एक्सल लोड क्षमता असून, मालवाहतूक व प्रवासी गाड्यांसाठी पूर्णपणे योग्य आहे.(Top Stories)
– ५३१ कोटी रुपये खर्चून बांधण्यात आलेल्या या पुलात उच्च दर्जाचे गंजरोधक साहित्य, विशेष कोटिंग, तसेच समुद्राच्या खारट पाणापासून संरचनेचे संरक्षण करणारे उपाय करण्यात आले आहेत. शिवाय हा पूल चक्रीवादळ आणि भूकंपप्रतिरोधक तंत्रज्ञानाने तयार करण्यात आला आहे, त्यामुळे प्रतिकूल हवामानातसुद्धा तो सुरक्षित राहील. याशिवाय, पुलात सेंसर आणि स्वयंचलित प्रणाली बसवण्यात आल्या आहेत. यामुळे संरचनेची सातत्याने देखरेख आणि त्वरित दुरुस्ती शक्य होईल. (Marathi)
=========
हे देखील वाचा : Ramnavmi : जाणून घ्या रामायणातील प्रचलित नसलेल्या महत्वाच्या घटना
==========
– हा नवा पंबन ब्रीज भविष्यात दुहेरी रेल्वे लाईन्ससाठी सुद्धा सक्षम आहे. या पुलाची तुलना गोल्डन गेट ब्रीज (अमेरिका), टॉवर ब्रिज (लंडन) आणि ओरेसंड ब्रीज (डेन्मार्क-स्वीडन) यांसारख्या जागतिक दर्जाच्या प्रतिष्ठित पुलांशी केली जाऊ शकते. हा पूल केवळ तांत्रिक उत्कृष्टतेचं प्रतीक नसून, भारताच्या वाढत्या पायाभूत सुविधांची क्षमता दर्शवणारा एक महत्त्वाचा पुरावा आहे.(Pamban Bridge News)
– पंबन ब्रीजच्या बांधकामामुळे हजारो लोकांना थेट आणि अप्रत्यक्षरित्या रोजगाराच्या संधी मिळाल्या. रामेश्वरमकडे जाणाऱ्या यात्रेकरूंना अधिक सुरक्षित, जलद आणि सोयीस्कर प्रवासाचा अनुभव मिळणार आहे. ज्यामुळे पर्यटन उद्योगाला चालना मिळेल. माल वाहतुकीची कार्यक्षमता वाढेल, ज्यामुळे व्यापारिक हालचालींना गती येईल आणि स्थानिक व्यवसायांना लाभ होईल.(News)