पॉँन्डचेरी दक्षिण भारतातील केंद्र शासित राज्य आहे. पर्यटन स्थळ म्हणून हे फार लोकप्रिय आहे. येथे १९५४ पर्यंत फ्रेंच कोलोनिया होती. त्यांच्या सभ्येतेचे अवशेष आजही पहायला मिळू शकतात. येथे काही चर्च, मुर्त्या आणि टाउन मधील तमिळ शऔलीच्या वास्तूकला ही आहेत. पॉँन्डेचेरीला The Europe of India असे ही म्हटले जाते. तसेच जेव्हा आपण पॉँन्डिचेरी बद्दल बोलतो तेव्हा सर्वात प्रथम आपल्या डोळ्यासमोर निळाशार समुद्र, लोकल फूड आणि फ्रेंच आर्किटेक्चरची चर्च ही समोर येतात. मात्र पॉँन्डिचेरी मध्ये या व्यतिरिक्त सर्वाधिक पर्यटक हे येथील पाण्याखालील मुझ्यिमला भेट देण्यासाठी जरुर येतात. खरंतर राज्यात अन्य मुझ्यियम्स आहेत. पण ते त्यांची खास पसंद आहे. याची ओळख भारतातील पहिल्याच पाण्याखालील म्युझियम अशी आहे. ते पाहण्याची एक वेगळीच मजा आहे. (India first underwater museum)
सर्वसामान्यपणे म्युझियमचे नाव ऐकून लोक कंटाळतात. पण हे म्युझियम असे आहे की, तुम्ही पाहून तेथे तुम्हाला पुन्हा पुन्हा जावेसे वाटेल. खासकरुन अशा लोकांसाठी ही पर्वणी आहे ज्यांना वॉटर स्पोर्ट्स खुप आवडतात.
हे पाण्याखालील म्युझियम वास्तवात एक डीकमशीन माइंसवीपर, आयएनएस कुड्डोलोर आहे. नॅशनल इंस्टिट्युट ऑफ ओशन टेक्नॉलॉजी, नॅशनल सेंटर फॉर कोस्टल रिसर्च, एनजीओ पॉन्डीकॅन आणि केंद्र सरकारच्या वतीने मिळून भारतीय नौसाने माइनस्वीपरला एक पाण्याखालील मुझ्यियमचे रुप दिले आहे. आता पर्यंत लोकांना टायटाइन पाहणे आवडत होते. पण आएनएस कुड्डालोर जवळजवळ तीन दशकांपर्यंत सेवेत होते. आपल्या कार्यकाळात आयएनएस कुड्डालोरने ३० हजार नॉटिकलचे अंतर पार केले आहे. ती जवळजवळ ६० मीटर लांब आणि १२ मीटर रुंद आहे.
हे म्युझियम पॉँन्डिचेरीच्या समुद्र किनाऱ्यापासून ७ किमी दूर २६ मीटर खोलवर समुद्राच्या तळाशी उभारण्यात आले आहे. म्युझियम तयार करण्यासाठी आयएनएस कुड्डालारेचे दरवाजे काढून टाकण्यात आले आहेत. त्यामुळे समुद्रातील जीव त्यामध्ये अगदी सहज प्रवेश करु शकतात. तसेच तेथे तुम्ही स्विमिंग ही करु शकता. त्यावेळी कोणतीही समस्या उद्भवू नये म्हणून ही काही महत्वाच्या गोष्टींची तेथे व्यवस्था करण्यात आली आहे. (India first underwater museum)
हे देखील वाचा- जगातील ‘हे’ बेट प्रत्येक ६ महिन्याला बदलते देश
काहीप्रकारे हे म्युझियम फार लाभदायक आहे. सर्वात प्रथम तर भारतातील हे असे पहिलेच पाण्याखालील म्युझियम आहे. ज्यामुळे लोकांच्या मनात तेथे भेट देण्यासाठी फार उत्सुकता आहे. या म्युझियममुळे पॉँन्डेचेरीतील पर्यटनच नव्हे तर इको-सिस्टिम ही मजबूत होणार आहे.