Home » India Constitution : भारतीय संविधानाला उधार का थैला का म्हणतात?

India Constitution : भारतीय संविधानाला उधार का थैला का म्हणतात?

by Team Gajawaja
0 comment
India Constitution
Share

२०० वर्षांच्या गुलामगिरीतून आपला भारत देश १५ ऑगस्ट १९४७ ला स्वतंत्र झाला. पण विविध जाती, प्रांत,भाषा अशी निराळी संस्कृती असणाऱ्या देशातील प्रत्येकाला समानतेचा, स्वातंत्र्याचा, धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार मिळवून देण्यासाठी आणि भारतात स्थापन होणारं सरकार चालवण्यासाठी एका राज्यघटनेची गरज होती. मग अस्तित्वात आलं आपलं भारतीय संविधान. भारताचा आकार, विविधता या सर्व परिस्थितींमुळे भारतासाठी संविधान तयार करणं मुळीच सोप काम नव्हतं. इतकी आव्हानं असून सुद्धा भारतीय संविधानाची निर्मिती कशी झाली. संविधान निर्मितीच्या रंजक गोष्टी काय आहेत? जाणून घेऊ. (India Constitution)

तर भारत स्वतंत्र होण्याच्या एकवर्षा आधी जेव्हा ब्रिटिश सरकार भारताला स्वतंत्र करण्याचा विचार करत होतं. तेव्हा १९४६ मध्ये ब्रिटिशांनी भारतात कॅबिनेट मिशन म्हणजेच एक ब्रिटिश प्रतिनिधीमंडळ पाठवलं. कॅबिनेट मिशनची बरीच उद्दिष्ट होती त्याततीलच एक म्हणजे भारतातील विविध राज्यांचे प्रतिनिधींशी चर्चा करून भारतीय संविधानाचा ड्राफ्ट तयार करण्यासाठी संविधान सभेची स्थापना करणं. कॅबिनेट मिशनच्या ध्येयानुसार, संविधान सभेची स्थापना करण्यात आली. सुरुवातीला या सभेचे स्थायी अध्यक्ष म्हणून डॉ.राजेंद्र प्रसाद यांची नेमणूक करण्यात आली. नंतर २८ ऑगस्ट १९४७ रोजी संविधान ड्राफ्टिंग कमिटीचं अध्यक्ष म्हणून डॉ. बाबसाहेब आंबेडकर यांची नियुक्ती करण्यात आली. संविधानाचा पहिला ड्राफ्ट तयार करण्यासाठी १३ समित्यांची स्थापना करण्यात आली होती. ज्यांनी मूलभूत अधिकार, अल्पसंख्याक, आदिवासी अशा विविध पैलूंचा अभ्यास केला. १९४७ च्या एप्रिल ते ऑगस्ट दरम्यान या समित्यांनी संविधान सभेसमोर आपला अहवाल सादर केला. या अहवालात काय चूक काय बरोबर यावर सविस्तर चर्चा झाल्या. या चर्चांनंतर संविधान सभेचे सल्लागार बी. एन. राऊ यांनी संविधानाचा ड्राफ्ट तयार करून तो ड्राफ्टिंग कमिटीसमोर सादर केला.

India Constitution

२७ ऑक्टोबर १९४७ रोजी ड्राफ्टिंग कमिटीने संविधानाच्या ड्राफ्टची तपासणी सुरू केली. गरजेनुसार त्यात बदल केले आणि २१ फेब्रुवारी १९४८ रोजी अंतिम ड्राफ्ट संविधान सभेच्या अध्यक्षांना सादर केला. हा ड्राफ्ट सादर केल्यानंतर तो सार्वजनिकपणे प्रकाशित करण्यात आला. ज्यावर अनेक सूचना आल्या, ज्यावर टीकासुद्धा झाली आणि feedback सुद्धा मिळाला. ज्यावर अनेक दिवस विश्लेषणात्मक चर्चा सुद्धा झाली. ४ नोव्हेंबर १९४८ रोजी, संविधानाचा सुधारित ड्राफ्ट डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान सभेत सादर केला. ज्यावर पुन्हा सभेत चर्चा सुरू झाली. या चर्चा गरजेच्या होत्या कारण संविधानावर भारताचं भविष्य अवलंबून होतं. (India Constitution)

डॉ. बाबसाहेब आंबेडकरांनी सुधारित ड्राफ्ट सादर केल्यानंतर संविधानातील कलमांमध्ये बदल काही कलमे जोडणे किंवा काढणे असं करत सुधारित ड्राफ्टमध्ये पुन्हा सुधारणा करण्यात आल्या. १४ नोव्हेंबर १९४९ रोजी हा दुसऱ्यांदा सुधारित केलेला ड्राफ्ट संविधान सभेत सादर करण्यात आला. आणि २६ नोव्हेंबर १९४९ रोजी झालेल्या तिसऱ्या वाचनानंतर या ड्राफ्टवर सुद्धा चर्चा झाल्या. काही सदस्यांना हा ड्राफ्ट समाधानकारक वाटतं होता, तर काहींंनी चिंता व्यक्त केली. विस्तृतचर्चांनंतर, ७६३५ सुधारणांनंतर अखेर याच २ वर्ष, ११ महिने, १८ दिवस या ड्राफ्टच तिसरं वाचन पूर्ण करून, डॉ. बाबसाहेब आंबेडकरांनी प्रस्तावित केलेला ठराव मंजूर केला आणि संविधानाचा स्वीकार करण्यात आला. मग २६ जानेवारी १९५० रोजी भारतात संविधान लागू झालं. (India Constitution)

भारतीय संविधान कोणी लिहिलं असं जर तुम्ही सर्च करालं तर उत्तर डॉ. बाबसाहेब आंबेडकर असंच येईल पण प्रेम बिहारी नारायण रायजादा यांनी शब्दश: भारताचं संविधान लिहिलं. म्हणजे संविधानाची मूळ प्रत तयार करण्यासाठी कोणत्याही प्रकारच्या टायपिंग आणि प्रिटिंगचा वापर करण्यात आला नाही, तर प्रेम बिहारी नारायण रायजादा यांनी संविधानाची मूळ प्रत त्यांनी स्वत:च्या हस्ताक्षराने लिहिली. रायजादा यांचं कुटुंब मुळात कॅलिग्राफी आर्टिस्ट होतं. जेव्हा भारतीय संविधान छापण्यासाठी तयार होता, तेव्हा पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी रायजादा यांच्याशी संपर्क साधून ते इटॅलिक स्टाइलमध्ये लिहिण्याचा प्रस्ताव दिला. आणि त्यासाठी किती पैसे घेणार असं विचारलं. त्यावर रायजादा एकही पैसा घेणार नाही. देवाच्या कृपेने माझ्याकडे सर्व गोष्टी आहेत. मी माझ्या जीवनात खूप आनंदी आहे,” असं त्यावर त्यांनी उत्तर दिलं.(India Constitution)

फक्त त्यांनी एक विनंती केली. ती म्हणजे संविधानाच्या प्रत्येक पानावर ते स्वत:चं नाव लिहिणार आणि शेवटच्या पानावर आजोबांचंही नाव लिहिणार. ही विनंती सरकारने मान्य केली. संविधान लिहिण्याचे काम त्यांना सोपवण्यात आलं. संविधान लिहिण्यासाठी त्यांना सहा महिने लागले. यासाठी भारत सरकारने त्यांना कॉन्स्टिट्यूशन हाऊसमध्ये एक खोली दिली होती. त्याशिवाय संविधानाच्या प्रत्येक पानावर चित्रांची सजावट करण्याचं काम आचार्य नंदलाल बोस यांना सोपवण्यात आलं होतं. नंदलाल बोस यांच्या मार्गदर्शनाखाली, त्यांच्या शिष्यांनी संविधानाच्या पानांची सजावट केली. मोठी चित्रे त्यांनी स्वतः रंगवली. संविधानाची ‘प्रस्तावना’ पान सजवण्याचं काम ब्योहर राममनोहर सिन्हा यांनी केलं, जे नंदलाल बोस यांचे शिष्य होते.

===============

हे देखील वाचा : Sanjay Gandhi : संजय गांधी यांना आणीबाणीचे खलनायक का बोललं जातं ?

===============

हे हस्तलिखित संविधान आज सुद्धा वैज्ञानिक पद्धतीने तयार केलेल्या हेलियम असलेल्या गॅस चेंबरमध्ये ठेवण्यात आलं आहे. हेलियम हा निष्क्रिय वायू असल्याने त्यात ठेवलेल्या वस्तू दीर्घकाळ सुरक्षित राहू शकतात म्हणून.(India Constitution)

आपल्या संविधानाला उधार का थैला सुद्धा म्हंटलं जातं. कारण संविधानातील अनेक गोष्टी या इतर संविधानांमधून घेण्यात आल्यात आहेत. स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्वचे सिद्धांत फ्रान्सच्या संविधानातून घेतले आहेत. पंचवार्षिक योजनेची कल्पना यूएसएसआरकडून घेतली होती. सामाजिक-आर्थिक अधिकाराचा सिद्धांत आयर्लंडकडून घेतला आहे. तर सर्वात महत्त्वाचं, ज्या कायद्यावर सुप्रीम कोर्ट काम करतं, ते जपानकडून घेतलं आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की, “The Constitution is not a mere lawyer’s document, it is a vehicle of life, and its spirit is always the spirit of the age!” त्यांच्याच म्हणण्यानुसार संविधानाबाबत आणखी एक गोष्ट जी लक्षात ठेवण्यासारखी आहे ती म्हणजे. “संविधान कितीही चांगलं असलं, तरी त्याचं पालन करणारे चांगले नसतील, तेव्हा ते संविधान वाईटच ठरेल. आणि जेव्हा संविधान चांगलं नसेल, पण त्याचं पालन करणारे चांगले असतील, तरी ते संविधान चांगलंच ठरेल.


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.