भारत आणि कॅनडा या दोन देशांमध्ये कमालीचा तणाव निर्माण झाला आहे. कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो हे कॅनडाच्या मुत्सद्यांना भारतातून काढून टाकल्यानंतर संतापले आहेत. खलिस्तानी दहशतवादी निज्जरच्या हत्येसाठी कॅनडानं भारतावर आरोप केला आहे. यावर भारताने पुरावे मागत कॅनडा सरकारच्या वक्तव्याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. शिवाय भारतानं आपल्या मुत्सद्यांनाही कॅनडातून परत बोलावले आहे. गेल्या वर्षी जूनमध्ये खलिस्तानी फुटीरतावादी नेता हरदीपसिंग निज्जरच्या हत्येनंतर कॅनडा आणि भारत यांच्यातील हा तणाव वाढीस लागला आहे. कॅनडातील ब्रिटिश कोलंबिया येथील गुरुद्वाराबाहेर हरदीपसिंग निज्जर यांची गोळ्या झाडून हत्या झाली. या हत्येमागे भारतीय गुप्तचर संघटना असल्याचा आरोप कॅनडाने केला. (India Canada Relations)
फारकाय लॉरेन्स बिश्नोई याचे नावही कॅनडातील सुरक्षा प्रमुखानं घेतले आहे. यासर्वांबाबत पुरावा द्या, असे भारताने सांगून कॅनडाला पेचात पकडले आहे. वास्तविक या सर्वांमागे फाइव्ह आयज अलायन्स असल्याची चर्चा आहे. हे फाइव्ह आयज अलायन्स म्हणजे काय, तर ही एक गुप्तचर संघटना आहे. पाच देशांच्या या संघटनेनं निज्जरची हत्या भारतीय गुप्तचर खात्यानं केल्याचा अहवाल दिल्याची माहिती आहे. या संघटनेत अमेरिका, ब्रिटन, ऑस्ट्रेलिया, न्यूझिलंड आणि कॅनडा यांचा समावेश आहे. भारतानं हे सर्व आरोप फेटाळून लावत फाइव्ह आयज अलायन्समध्ये असलेल्या कॅनडाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहेत. या संघटनेत भारताचा समावेश नाही, त्यामुळे हा अहवाल एकांगी असल्याचेही सांगितले आहे. तसेच या संघटनेतील इतर देश भारत आणि कॅनडामधील संबंध बिघडवत असल्याचा आरोप केला आहे. (International News)
तेव्हापासूनच फाइव्ह आयज अलायन्स चर्चेत आली आहे. पाच देशाची गुप्तचर संघटना असलेली फाइव्ह आयज अलायन्स जागतिक राजकारणात महत्त्वाची भूमिका पार पाडते. या संघटनेत अमेरिका, ब्रिटन, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि कॅनडा या युरोपातील बड्या देशांच्या अत्यंत तरबेज गुप्तहेरांचा समावेश आहे. त्यामुळेच फाइव्ह आयजला जगातील सर्वात शक्तिशाली इंटेलिजन्स नेटवर्क म्हटले जाते. वास्तविक कुठल्याही देशातील गुप्तहेर संघटना आपली ओळख किंवा आपल्या हेरांची ओळख, गुप्त माहिती अन्य देशाला देत नाही. ती ओळख लपवून ठेवली जाते. मात्र फाइव्ह आयज अलायन्समध्ये या पाच देशातील गुप्तहेर परस्परांना चांगले ओळखतात आणि आपापसातील माहितीही शेअर करतात. दहशतवाद थांबवणे आणि राष्ट्रीय सुरक्षेसाठी काम करणे हे या संघटनेचे सर्वात मोठे उद्दिष्ट आहे. अशाप्रकारे काही देशांची मिळून स्थापन झालेली ही एकमेव संघटना आहे. (India Canada Relations)
फाइव्ह आयज अलायन्सची सुरुवात दुसऱ्या महायुद्धात झाली. दुस-या महायुद्धाच्या काळात जर्मनी आणि जपानचे गुप्तहेर मित्रराष्ट्रांमध्ये पसरले होते. या हेरांना अटकाव करण्यासाठी काहीतरी यंत्रणा हवी म्हणून विचार सुरु झाला. त्यातूनच ब्रिटन आणि अमेरिकेने एकत्र काम करण्याचे ठरवले. यासाठी 1943 मध्ये, या दोन देशात करार झाला. दोन्ही देशांनी एकमेकांशी गुप्तचर माहिती शेअर करण्यास सुरुवात केली. दुस-या महायुद्धात या दोन्ही देशांनी जर्मनीचे वर्चस्व मोडीत काढले. याच यशामुळे दुसरे महायुद्ध संपल्यावरही ब्रिटन आणि अमेरिका यांच्यातील गुप्तचर विभागाची मैत्री कायम राहिली. या दोन देशात 1949 मध्ये कॅनडानं प्रवेश केला. नंतर 1956 मध्ये न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियाही यात सामिल झाले आणि फाइव्ह आयज अलायन्सची स्थापना झाली. हे फाइव्ह आयज अलायन्स देश त्यांच्या भागीदारांचे हित लक्षात घेऊन काम करतात. म्हणजेच कॅनडा आपल्या स्वतःसाठी नाही तर अमेरिकेसाठी माहिती गोळा करतो. तर न्यूझिलंड ऑस्ट्रेलियासाठी माहिती गोळा करतो. (International News)
======
हे देखील वाचा : उमर बिन लादेनला फ्रान्सने केले गेट आऊट
======
यातून अधिक सखोल गुप्तचर माहिती समोर येत असल्याचे या देशांचे म्हणणे आहे. फाइव्ह आयजचे सचिवालय अमेरिकेत आहे. त्यामुळेच अमेरिकेचे या फाइव्ह आयज अलायन्सवर जास्त वर्चस्व आहे. आता भारत आणि कॅनडामध्ये जो दुरावा निर्माण झाला आहे, त्याचे मुळही अमेरिकेतच असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. युरोपात भारताचे वर्चस्व मर्यादित राहिल याकडे अमेरिकेचा जोर असतो. यातूनच अमेरिकेनं कॅनडामध्ये भारताबद्दलचे वाईट मत पसरवल्याचा संशय आहे. यातूनच भारतानं लॉरेन्स बिश्नोई गॅंगला कॅनडामध्ये सूट दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. या दोन देशांमधील तणाव कधी कमी होईल, याकडे अनेकांचे लक्ष आहे. कारण राजकारण बाजुला ठेवले तर कॅनडामधील अनेक विद्यापिठे केवळ भारतीय विद्यार्थ्यांच्या जोरावर चालू आहेत. भारतानं कॅनडासाठी द्वारे बंद केली तर कॅनडालाच मोठा आर्थिक फटका बसणार आहे. त्यामुळे हा वाद कधी कमी होईल, याकडे अनेकांचे लक्ष आहे. (India Canada Relations)
सई बने