या वर्षी १५ ऑगस्टला भारत ७९ वा स्वातंत्र्यदिन साजरा करणार आहे. १९४७ मध्ये याच दिवशी देशाने ब्रिटिश राजवटीतून मुक्त होत सार्वभौम राष्ट्राचा दर्जा मिळाला. १५ ऑगस्ट १९४७ ही तारीख भारताच्या स्वातंत्र्याचा गौरवशाली इतिहास सांगितली जाते. अनेक महान लोकांनी आपल्या प्राणांची आहुती देत, आपले संपूर्ण जीवन केवळ भारत मातेच्या स्वातंत्र्यासाठी लढत सत्कारणी लावत हे स्वातंत्र्य मिळवले आहे. १५ ऑगस्टच्या दिवशी सर्वच लोकांमध्ये देशभक्ती जागृत असते. या दिवशी देशभक्तीपर गाणे गात, सिनेमे बघत ध्वजारोहण करत लोकं स्वातंत्र्यतादिन साजरा करतात. स्वातंत्र्यदिनानिमित्त लाल किल्ल्यावरुन ध्वजारोहण केल्यानंतर पंतप्रधान देशाला संबोधित करतात. (Todays Marathi Headline)
मात्र तुम्हाला माहित आहे का…? भारताला जसे ब्रिटिशांपासून १५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वातंत्र्य मिळाले. तसेच जगात इतर देशांनाही याच दिवशी निरनिराळ्या वर्षी स्वातंत्र्य मिळालेले आहे. अर्थात १५ ऑगस्ट हा स्वातंत्र्यदिन म्हणून फक्त भारतामध्येच नाही तर अजूनही काही इतर देशांमध्येही साजरा केला जातो. म्हणजेच काय तर आजच्या दिवशी काही इतर देशांनाही गुलामगिरीतून स्वातंत्र्य मिळाले आहे. जाणून घेऊया हे देश नेमके कोणते आहेत.(Marathi News)
दक्षिण कोरिया आणि उत्तर कोरिया
हे दोन्हीही स्वतंत्र देश असून त्यांच्या स्वातंत्र्यदिनाला ‘ग्वांगबोक्जेओल’ असे म्हटले जाते. या शब्दाचा अर्थ, प्रकाशाची पुन्हा साठवणूक असा होतो. सन १९४५ पासून जपानच्या अधिपत्याखाली असलेला हा देश ३५ वर्षांनंतर म्हणजे सन १९८० मध्ये स्वतंत्र झाले. आज हे दोन्ही देश वेगळे असले तरी ते आपला सामाईक स्वातंत्र्यदिन साजरा करतात. या देशांमध्ये स्वातंत्र्य दिनाला ‘नॅशनल लिबरेशन डे ऑफ कोरिया’ असे म्हटले जाते. १५ ऑगस्ट १९८० रोजी दुसऱ्या महायुद्धात जपानच्या साम्राज्याने शरणागती पत्करली होती. त्यानंतर तीन वर्षांनी कोरियाचे दोन देशांत विभाजन झाले. यांपैकी उत्तर कोरिया हा सोव्हियत संघाचा समर्थक होता तर दक्षिण कोरिया हा अमेरिकेचा समर्थक देश होता. (Latest Marathi News)
बहरीन
१५ ऑगस्ट हा आपला स्वातंत्र्यदिन मानत नसला तरी बहरीन देशाला १५ ऑगस्ट १९७१ रोजी ब्रिटनपासून स्वातंत्र्य मिळाले. बहरीनचे तत्कालीन शासक ईशा बिन सलमान अल खलिफा यांनी ज्या दिवशी सत्ता हाती घेतली, बहरीनने राष्ट्रीय स्वातंत्र्यदिन म्हणून घोषित केले आणि हा दिवस १६ डिसेंबर होता. मात्र, बहरीन देशाला १५ ऑगस्ट १९७१ रोजी खरे स्वातंत्र्य मिळाले आहे. (Top Trending News)
काँगो
१५ ऑगस्ट १९६० रोजी आफ्रिकन देश काँगो फ्रान्सपासून स्वतंत्र झाला. यानंतर ते काँगोचे लोकशाही प्रजासत्ताक बनले. जेव्हा ते फ्रान्सच्या ताब्यात होते, तेव्हा ते फ्रेंच काँगो म्हणून ओळखले जात होते. माहितीनुसार, फ्रान्सने १८८० पासून काँगोवर कब्जा केला होता. (Top Stories)
लाइक्टेन्स्टाईन
युरोप खंडातील या देशात सन १९४० पासून १५ ऑगस्ट हा दिवस ‘राष्ट्रीय दिवस’ म्हणून पाळला जातो. हा स्वातंत्रदिन साजरा करताना देशात रात्री १० वाजण्याच्या सुमारास पारंपारिक पद्धतीनं फटाक्यांची आतषबाजी केली जाते. सन १९९० मध्ये या देशात अधिकृतरित्या १५ ऑगस्ट रोजी राष्ट्रीय सुट्टी जाहीर करण्यात आली. लाइक्टेन्स्टाईन देशाची राजधानी असलेल्या वडूझ येथील किल्ल्यासमोरील लॉनमध्ये हजारो नागरिक एकत्र जमतात. यावेळी इथला प्रिन्स आणि पार्लमेंटचे अध्यक्ष देशातील जनतेला संबोधित करतात यावेळी उपस्थित नागरिक स्वातंत्र्यदिनाचे सेलिब्रेशन करतात. यावेळी या किल्ल्यासमोरील गार्डनमध्ये स्वागतसमारंभ आयोजित केला जातो यासाठी सर्व नागरिकांना आमंत्रण असते. जनतेसाठी याच एका दिवशी हे गार्डन खुले करण्यात येते. (Social News)
==========
Health : जेवणानंतर अंघोळ करणे योग्य की अयोग्य?
==========
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics