ऑगस्ट महिना सुरु झाला की, सगळ्यांनाच वेध लागतात स्वातंत्र्यदिनाचे. भारताचा स्वातंत्र्यदिन हा सगळ्यांसाठीच खूपच महत्वाचा आणि मोठा दिवस आहे. याच दिवशी तब्बल १५० वर्ष आपल्यावर राज्य केलेल्या ब्रिटिशांच्या तावडीतून भारताला स्वातंत्र्य मिळाले. या स्वातंत्र्यासाठी अनेक दिग्गजांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. हजारो लाखो लोकांच्या मेहनतीमुळे आज आपण स्वातंत्र्यामध्ये राहून श्वास घेत आहोत. १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले. यंदा आपण ७९ वा स्वातंत्र्यदिन साजरा करणार आहोत. मात्र तुम्हाला माहित आहे का, की हा दिवस स्वान्त्र्यासाठी का निवडला गेला? हा दिवस निवडण्यामागे देखील एक खास कारण आहे. आज आपण तेच जाणून घेऊया. (Marathi)
15 ऑगस्ट हाच दिवस का निवडला?
पंडित नेहरूंनी १९२९ साली स्वातंत्र्याची मागणी केली आणि २६ जानेवारीला स्वांत्र्यदिन साजरा करण्याची घोषणा केली. १९३० नंतरदेखील हा दिवस स्वतंत्रता दिन म्हणून साजरा करण्यात आला. मात्र प्रत्यक्षात स्वातंत्र्यदिन होऊ शकला नाही. १९४५ साली दुसऱ्या जागतिक युद्धात ब्रिटनची आर्थिक स्थिती खराब झाली, राजकीय संकटही त्यांचेवर होतेच. १९४५ साली झालेल्या मतदानात ब्रिटनची लेबर पार्टी विजयी झाली. लेबर पार्टीने आपले सरकार बनवले तर ब्रिटिश राजवटीतील देशांना मुक्त केले जाईल, असे आश्वासन दिले होते आणि लेबर पार्टीचे सरकार येतात भारताच्या स्वातंत्र्याची चळवळ सुरू झाली. (Marathi News)
भारताला हक्क सुपूर्द करण्यासाठी फेब्रुवारी १९४७ साली माऊंटबेटन यांची नियुक्ती झाली. त्यांनी एक मसूदा तयार केला. ३० जून १९४८ ला सर्व हक्क भारताला सुपूर्द करणार असे या मसुद्यात नमूद करण्यात आले होते. मात्र भारतीय नेत्यांचे यावर एकमत झाले नाही. त्यांनी जून १९४८ ही तारीख ठरवली ज्याला विरोध झाला आणि मग १९४७ हेच वर्ष ठरलं. (Todays Marathi News)
असे सांगितले जाते की शेवटचे व्हाईसरॉय लॉर्ड माउंटबॅटन यांनी १९४८ हे भारताच्या स्वातंत्र्याचे वर्ष ठरवण्यात आले होते, परंतु अनेक वर्षांचा संघर्ष, ब्रिटिश सरकार सतत येणारी संकटे आणि त्यातच ब्रिटिशांची परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत असल्याने लॉर्ड माउंटबॅटन यांना भारताला लवकर स्वातंत्र्य देणे स्वीकारावे लागले. पण मग १५ ऑगस्ट हा दिवस हा निवडण्यात आला तर, ब्रिटीश राजवटीच्या काळात भारताचे शेवटचे व्हॉईसरॉय लॉर्ड माउंटबॅटन होते. त्यांचा नशिबावर, लकवर विश्वास होता. (Top Trending Headline)

माउंटबॅटन यांच्या जीवनात १५ ऑगस्ट हा दिवस अतिशय खास दिवस होता. कारण १५ ऑगस्ट १९४५ रोजी जपानी सैन्याने दुसऱ्या महायुद्धात ब्रिटीशांसमोर शरणागती पत्कारली होती. त्यावेळी लॉर्ड माउंटबॅटन हे ब्रिटीश सैन्यात मित्र राष्ट्रांचे कमांडर होते. जपानी सैन्याच्या आत्मसमर्पणाचे संपूर्ण श्रेय माउंटबॅटन यांना देण्यात आले. यामुळे माउंटबॅटन यांना १५ ऑगस्ट हा त्यांच्या आयुष्यातील सर्वोत्तम दिवस असल्याचे लक्षात आले. म्हणूनच त्यांनी भारताच्या स्वातंत्र्यासाठी १५ ऑगस्ट हा दिवस निवडला. (Top Marathi News)
खरंतर ३० जून १९४८ रोजी ब्रिटिश राजवटीनुसार भारताला स्वातंत्र्य मिळणार होते. मात्र त्यावेळी मोहम्मद अली जिन्नाह यांनी स्वतंत्र्य पाकिस्तानची देखील मागणी केली होती. यावेळी पंडित नेहरू आणि मोहम्मद अली जिन्नाह यांच्यात भारत आणि पाकिस्तानच्या फाळणीचा मुद्दा सुरू झाला होता. त्यामुळे देशात अंतर्गत कलह मोठ्या प्रमाणावर निर्माण होऊ लागले. त्यावेळी सर्वांनाच लक्षात आले की. जर आपण अजून वाट पाहिली तर हा भारत पाकिस्तान संघर्ष अधिकच वाढेल. यामुळे १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला स्वतंत्र करण्याचा निर्णय घेण्यात आला. ४ जुलै १९४७ रोजी ब्रिटीश हाऊस ऑफ कॉटमन्समध्ये माउंटबॅटन यांनी भारतीय स्वातंत्र्याचे विधेयक मांडले होते. या विधेयकाला ब्रिटिश संसदेने तत्काळ मंजुरी दिली आणि १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताचे स्वातंत्र्य घोषित करण्यात आले. (Top Trending News)
मध्यरात्री स्वातंत्र्य का घोषित करण्यात आलं?
१५ ऑगस्ट १९४७ मध्यरात्री १२ वाजता भारताच्या स्वातंत्र्याची घोषणा करण्यात आली. मात्र भारताच्या स्वातंत्र्यदिनाची ही तारीख आणि वेळ अचानक ठरलेली नाही. या तारखेमागे आणि वेळेमागेदेखील इतिहास आहे. आता भारताच्या स्वातंत्र्याची घोषणा १४ ऑगस्ट रोजी मध्यरात्री १२ वाजता केली गेली. मग रात्री १२ लाच का याची घोषणा केली गेली? यामागे देखील काही कारणं असल्याचे सांगितले जाते. चला जाणून घेऊया याबद्दल. (Marathi Latest News)
जेव्हा भारताच्या स्वातंत्र्यासाठी १५ ऑगस्ट तारीख ठरली तेव्हा या तारखेला, भारतीय ज्योतिष तज्ज्ञ यांनी भारतासाठी अशुभ असल्याचे सांगितले. ज्योतिषांनी दुसरी तारीख काढून दिली, मात्र माऊंटबेटन आपल्या निर्णयावर ठाम होते. त्यामुळे मधला मार्ग म्हणून एक शुभ वेळ काढण्यात आली. १४ ऑगस्ट १९४७ रात्री ११.५१ ते रात्री १२.३९ ही वेळ शुभ होती. इंग्रजी कॅलेंडरनुसार रात्री १२ नंतर १५ ऑगस्ट सुरू होतो. मात्र भारतीय पद्धतीनुसार सूर्योदयानुसार तारीख बदलते. त्यामुळे मध्यरात्री १२ ही वेळ निश्चित झाली. (Top Stories)
==========
Independence Day : स्वातंत्र्य दिन सोहळ्याचा साक्षीदार होण्यासाठी ‘असे’ करा बुकिंग
Independence Day : भारतासोबतच ‘या’ देशांचा देखील असतो १५ ऑगस्टला स्वातंत्र्यता दिन
==========
या घोषणेमागचे अजून एक कारणं म्हणजे, पाकिस्तान आणि भारताची फाळणी. त्यावेळी ब्रिटिश सरकारला भीती होती की जर स्वातंत्र्याच्या दिवशीच भारत आणि पाकिस्तानची फाळणी झाली तर त्यातून दंगली होतील आणि कायदा, सुव्यवस्था नियंत्रित करणे कठीण होईल. त्यामुळेच भारताच्या स्वातंत्र्याची घोषणा ही मध्यरात्री करण्यात आली. मात्र ब्रिटीश सरकारने १५ ऑगस्ट १९४७ रोजी पाकिस्तान आणि भारत अशी दोन्ही राष्ट्रे एकाच वेळी स्वतंत्र होतील अशी घोषणा केली होती. यामुळेच मध्यरात्री नवी दिल्लीत भारताच्या स्वातंत्र्याची घोषणा झाली. (Social News)
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics
