Home » IND-PAK : शिमला करार स्थगित आता भारत-पाक युद्ध अटळ ?

IND-PAK : शिमला करार स्थगित आता भारत-पाक युद्ध अटळ ?

by Team Gajawaja
0 comment
IND-PAK
Share

१४ ऑगस्ट १९४७ भारताला तोडून पाकिस्तान नावाचा देश जन्माला आला. दुसऱ्याच दिवशी भारत स्वतंत्र झाला. पण दोन महिने झाले नाहीत की ऑक्टोबरमध्ये पाकिस्तानने भारतावर हल्ला चढवला. निमित्त काश्मीरच होतं. ४७-४८ दरम्यान झालेलं ते भारत-पाकिस्तानचं पहिलं युद्ध. इथेच काश्मीरचा मुद्दा उफाळून वर आला. त्यानंतर पुन्हा १९६५, १९७१ आणि १९९९ असं चार वेळा भारत-पाकिस्तानदरम्यान युद्ध झालं. सर्व युद्धांमध्ये भारताचाच विजय झाला. पण याच दरम्यान काश्मीरमध्ये इंसर्जन्सी, टेररीजम, कट्टरता आणि छोटे मोठे दहशतवादी हल्ले वाढू लागले. यामुळेच काश्मीर कित्येक वर्षांपासून पेटतच आहे. त्यातच आता काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी टुरिस्टवर हल्ला केला, ज्यामध्ये २७ लोकांना आपला जीव गमवावा लागला. काश्मीरमध्ये तशा जवानांसोबत चकमकी घडतच असतात. पण यावेळी मात्र या दहशतवाद्यांनी टुरीस्टना टार्गेट गेलं. यामुळे सरकार आणि सुरक्षा यंत्रणा अलर्ट झाल्या. भारताने पाकिस्तानवर अनेक निर्णय लादले.  इतकच काय तर भारत आणि पाकिस्तानचं पुन्हा युद्ध होतंय की काय, अशा चर्चा होऊ लागल्या आहेत. कारण पाकिस्ताने शिमला करार स्थगित करून स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेतला आहे. पण हे युद्ध का होऊ शकतं, याची नेमकी कारण काय असू शकतात ? आणि शिमला करार काय आहे, जाणून घेऊ. (IND-PAK)

आता आपण जरा पहलगाम हल्ल्याच्या काही दिवस मागे जाउद्या. पाकिस्तानी आर्मीचे जनरल आसीम मुनीर यांनी एक स्टेटमेंट दिली होती. त्यात ते म्हणाले होते की, काश्मीर तर आपल्या गळ्याची नस आहे. हिंदू-मुस्लीम वेगळे आहेत. त्यांची संस्कृती वेगळी आहे. यामुळे टेररीस्ट ग्रुप्सना खतपाणी मिळालं. लष्कर ए तोयबाचा कमांडर अबू मुसा याने १८ एप्रिलला एक कार्यक्रम आयोजित केला होता, यामध्ये तो म्हणाला की, ‘जिहाद जारी रहेगा, कश्मीर में बंदूकें गरजती रहेंगी, कत्ल होते रहेंगे. काही ठिकाणी अशीही बातमी होती की या हल्ल्याची planning फेब्रुवारीमध्येच झाली होती.

यानंतर २२ डिसेंबरचा तो दिवस आला. जेव्हा मोठ्या संख्येने टुरिस्ट पहलगामच्या बैसरनमध्ये आले होते. यावेळी जम्मू काश्मीर पोलिसांची वर्दी घालून हातात एके४७ घेऊन दहशतवादी तिथे आले आणि त्यांनी पर्यटकांवर हल्ला केला, ज्यामध्ये २७ जणांचा मृत्यू झाला. यानंतर पूर्ण देशभरातून संताप व्यक्त केला गेला, याचं प्रमुख कारण म्हणजे दहशतवादी धर्म विचारून लोकांना मारत होते. सरकारच्या बैठका झाल्या, सर्वपक्षीय बैठका झाल्या. स्वतः गृहमंत्री अमित शाह पहलगाममध्ये पोहोचले. यानंतर सरकारने पाकिस्तानबाबत काही कठोर निर्णय घेतले. यामध्ये सिंधू जल करार, अटारी-वाघा बॉर्डर बंद सार्क व्हिसा रद्द,  पर्सोना नॉन ग्राटा, पाकिस्तानी नागरिकांना ४८ तासात देश सोडण्याचे आदेश… असे हे काही निर्णय होते. (IND-PAK)

या हल्ल्यानंतर भारताला जगभरातल्या देशांचं समर्थन मिळालं, विशेष म्हणजे १० इस्लामिक देशच यावेळी भारताच्या पाठीशी उभे राहिले आहेत. याचदरम्यान आणखी पाकिस्तानची खरी वृत्ती दाखवणारी स्टेटमेंट त्यांच्याकडून आली. पाकिस्तानचे डेप्युटी पीएम आणि परराष्ट्र मंत्री इशाक दार यांनी पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना चक्क फ्रीडम फायटर म्हटलं. साहजिकच आहे ही गोष्ट backfire होणारच होती. यानंतर इंडियन आर्मीने मोठ्या प्रमाणात सैन्य काश्मीरमध्ये diploy केलं. पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशीसुद्धा बॉर्डरवर चकमकी सुरूच होत्या. बारामुल्लाला आर्मीने दोन दहशतवाद्यांना ठोकलं. यानंतर उधमपूरमध्ये झालेल्या चकमकीत आर्मीचे हवालदार झंटू अली शेख शहीद झाले. त्यानंतर २५ एप्रिलला आर्मीने लष्कर ए तोयबाचा कमांडर अल्ताफ लल्लीला ठार केलं.

हे सगळ घडत असतानाच पाकिस्ताने शिमला करार रद्द करून टाकला आणि गरमा गरमीच्या माहोलमध्ये आपल्याच पायावर धोंडा मारून घेतला आहे. आता खूप जणांना प्रश्न पडलाच असेल, तावातावात पाकिस्ताने शिमला करार रद्द केलाय, पण यामुळे यांचं काय नुकसान होऊ शकतं ? तर त्यासाठी आपल्याला आधी शिमला करार म्हणजे काय हे समजून घ्यायला लागेल. १९७१ ला भारताने पाकिस्तानला युद्धात चांगलंच लोळवलं. या दोन्ही देशांनी ठरवलं की आता हे युद्ध न व्हावेत, म्हणून आपण एक करार करुया. तो शिमलाला पंतप्रधान इंदिरा गांधी आणि पाकिस्तानचे त्यावेळचे पंतप्रधान झुल्फिकार अली भुत्तो यांच्या स्वाक्षरीने झाला. यात असं ठरलं होतं की, भूतकाळात जे जे घडलं ते आपण विसरून जाऊ. आणि शांततापूर्ण मार्गाने मतभेद दूर करू. (IND-PAK)

यात एक महत्त्वाची गोष्ट होती ती, म्हणजे दोन्ही देशांमधील कोणत्याही समस्येचं योग्य समाधान होईपर्यंत, कुणीही नियंत्रण रेषेवरची म्हणजे LOC वरची स्थिती एकतर्फी बदलणार नाही आणि शांततापूर्ण संबंध राखण्यासाठी एकमेकांना धोकादायक असलेल्या कृतींना टाळतील. पण तरीही पाकिस्तानने आपल्या कुरापत्या सुरूच ठेवल्या. या करारात असंही ठरलं की, भारत आणि पाकिस्तान आपले सर्व मुद्दे परस्पर चर्चेने सोडवतील. कोणत्याही तिसऱ्या देशाला यात हस्तक्षेप करण्याची परवानगी दिली जाणार नाही. पण स्वत: पाकिस्तान चीनला यामध्ये ओढू लागलं. तसं पहायला गेलं तर पाकिस्ताननेच या करारातील नियमांचं पालन केलं नाही. आणि तावातावामध्ये शिमला करार रद्द करून टाकला. आता यामुळे काय घडणार की, आता LOC दोन्ही देशांसाठी बंधनकारक राहणार नाही. म्हणजे भारत बिनधास्त आणि कधीही loc मध्ये घुसू शकतो.

पाकिस्तानने कोणत्या कॉन्फीडेन्सने हा निर्णय घेतलाय त्यांनाच ठाऊक… पण Loc च नाही म्हणजे युद्धाला निमंत्रण असंही आपण म्हणू शकतो. त्यामुळे आता असंही assume केलं जात आहे की, भारत आणि पाकिस्तानदरम्यान युद्ध होऊ शकतं. महत्त्वाचं म्हणजे भारत आणि पाकिस्तान दोन्हीही न्युक्लीअर स्टेट आहेत. त्यातच भारताने आपले दोन लढाऊ विमान राफेल आणि सुखोई-३० यांचा युद्धाभ्यास सुरु केला आहे. यानंतर भारताने २७ देशांच्या राजदूतांसोबत बैठक केली होती. यामध्ये पाकिस्तानबाबत पुढच्या रणनीतीबद्दल चर्चा झाली. (IND-PAK)

===============

हे देखील वाचा : India : भारताने स्थगित केलेला सिंधू जल करार नक्की आहे तरी काय ?

===============

नुकतच एका रशियन न्यूज channel ने अशी गुप्त माहिती दिली आहे की, भारत आणि पाकिस्तानदरम्यान लवकरच काहीतरी मोठ होणार आहे. पण इतर देशांच्या स्टेटमेंट्स अनेकदा जिओपोलिटिकल वातावरण बिघडवण्यासाठी असतात. यानंतर मोदी सरकारने सर्वपक्षीय बैठक घेतली. ज्यामध्ये स्वत: राहुल गांधी यांनी म्हटलं की, सरकार पाकीस्तानविरोधात जी कारवाई करेल, त्यामध्ये विरोधी पक्षाचं पूर्णपणे समर्थन असेल. गृहमंत्री अमित शाह आणि परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी राष्ट्रपतींसोबत तातडीची बैठक घेतली, ज्यामध्ये काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. या सर्व गोष्टी युद्धाचे संकेत असल्याचं बोललं जात आहे.

जर भारत आणि पाकिस्तानच्या संरक्षण दलांची तुलना केली, तर पाकिस्तान भारतापासून कोसो दूर मागेच आहे. भारताकडे साडे चौदा लाख active सैनिक आहेत, तर साडे अकरा लाख रिझर्व्ह सैनिक आहेत. दुसरीकडे पाकिस्तानकडे साडे सहा लाख active आणि ५ लाख रिझर्व्ह पर्सनल आहेत. याशिवाय tanks, सेल्फ-प्रोपेल्ड आर्टिलरी, पाणबुड्या, एअरक्राफ्ट, अत्याधुनिक शस्त्र अशा सर्वांमध्ये भारत पुढे आहे. त्यामुळे निश्चितच युद्ध झालं तरी पाकिस्तान भारतासमोर टिकू शकणार नाही, हे confirm आहेच. पण यामुळे दोन्ही देशांचं नुकसान होणार हे सुद्धा तितकच खर आहे. (IND-PAK)

पाकिस्तानची आर्थिक परिस्थिती काय झालीये, संपूर्ण जग पाहतंय. त्यातच पाकिस्तान आधीपासूनच आर्मीच्या कंट्रोलमध्ये राहिलेला देश आहे, ज्यामुळे त्यांनी गेल्या ७५ वर्षांत फक्त नुकसानच पाहिलं आहे. अशातच पाकिस्तानने भारतासोबत युद्ध केलं तर उरलेली अर्थव्यवस्था पूर्णपणे ढासळेल. व्यापार आणि गुंतवणुकीवर त्याचा परिणाम होईल. बेरोजगारी आधीच भयंकर आहेत तिथे ती आणखी वाढेल. त्यात महागाई वाढेल. अंतर्गत संघर्ष सुरु होतील. या सर्वात पाकिस्तानचं इतकं नुकसान होईल की, तो देश पुन्हा उभा राहूच शकणार नाही. त्यामुळे युद्ध झालं तर निश्चितच भारताला याचं फार नुकसान होणार नाही. पण कदाचित पाकिस्तान पुन्हा युद्ध करावं अशा स्थितीत राहू शकणार नाही.


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.