आजपासून हिंदू लोकांचा पवित्र महिना श्रावण सुरु होत आहे. श्रावण महिना म्हणजे भगवान शंकराची आराधना करण्याचा अतिशय उत्तम काळ. जेव्हा देवशयनी एकादशीपासून भगवान विष्णू निद्राधीन होतात तेव्हपासून पुढील चार महिने शिवशंकर महादेव या सृष्टीचा कारभार बघतात. अशातच येणारा हा श्रावण महिना खूपच महत्वाचा आणि पूजनीय असतो. या संपूर्ण महिन्यामध्ये अनेक लोकं सतत शिवाची आराधना करतात. या महिन्यातला दिवस कोणताही असला तरी त्या दिवशी शिव आराधना केल्याने पुण्याची प्राप्ती होते. त्यामुळे श्रावण महिन्याचे महात्म्य मोठे आहे. (Shrvan)
आता श्रावण सुरु झाला म्हटल्यावर देशभरातील सर्वच लहान मोठ्या शंकराच्या मंदिरांमध्ये तोबा गर्दी असणार आहे. आता भारत म्हणजे मंदिरांचा देश. आपल्या देशात लहान मोठी असंख्य मंदिरं आहेत. मात्र यातली अनेक मंदिरं ही त्यांच्या वेगळेपणासाठी, त्यांच्या रहस्यांसाठी ओळखली जातात. भारतात अनोखी मंदिरं भरपूर आहेत आणि या मंदिरांमागचा इतिहास देखील जाज्वल्य आहेत. आज आपण अशाच एका मंदिराबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. (Marathi News)
तुम्ही आजवर अनेक विविध प्रकारची शिव मंदिरे पाहिली असतील मात्र आज आम्ही तुम्हाला ज्या मंदिराबद्दल सांगणार तसे मंदिर आपण कुठेही पाहिले नसेल. सामान्यपणे आपण शंकरांच्या मंदिरात त्यांची पिंड किंवा त्यांची मूर्तीच बघत असतो. पण यामंदिरामध्ये भगवान शिव त्यांच्या पत्नीसोबत विराजमान झालेले दिसतात. मुख्य म्हणजे शिव शंकर या मंदिरात विश्रांतीच्या अवस्थेत विराजमान आहेत. हे अतिशय दुर्मिळ मंदिर आहे. या मंदिराचे नाव आहे, ‘श्री पल्लिकोंडेश्वर स्वामी मंदिर’. (Todays Marathi NEws)
आंध्र प्रदेशातील सुरुट्टपल्ली नावाच्या गावात असलेले श्री पल्लिकोंडेश्वर स्वामी मंदिर हे भगवान शिवाला समर्पित असलेले मंदिर आहे. या मंदिरात भगवान शिव “अनंतशयन” या मुद्रेत झोपलेले आपल्याला पाहायला मिळतात. ज्याप्रमाणे आपण भगवान विष्णूला ‘अनंतशयन’ रूपात पाहतो. त्याचप्रमाणे भगवान शिवांची ही मुद्रा इतर कोणत्याही शिवमंदिरात पाहायला मिळत नाही. आणि या मंदिराची अजून एक विशेषतः म्हणजे भगवान शिव मानवी रूपात झोपलेले असून देवी पार्वती त्यांच्या डोक्याशी बसलेली आहेत. शिव हे त्यांच्या पत्नीच्या पार्वती मातेच्या मांडीवर झोपलेले आहे. (Marathi Latest News)
हे मंदिर दाक्षिणात्य स्थापत्यशैलीत बांधलेले असून यामध्ये सुंदर पाच मजली राजगोपुरम आहे. भगवान शिव येथे “पल्लिकोंडेश्वरर” या नावाने पूजले जातात आणि देवी पार्वती “मरगथांबिगै” नावाने प्रतिष्ठित आहेत. आपण कायम महादेवाची शिवलिंगाच्याच रूपात पूजा केली आहे, मात्र या मंदिरात महादेव मनुष्याच्या रूपात पार्वती देवीच्या मांडीवर झोपलेले आहेत. (Top Trending News)
“सुरुट्टपल्ली” या गावाच्या नावामागील आख्यायिका
सुरुट्टपल्ली या गावाच्या नावामागे एक पौराणिक कथा सांगितली जाते. समुद्रमंथनाच्यावेळी जेव्हा भगवान शंकरानी अतिशय जहाल असे विष पिऊन जगाला या विषाच्या प्रलयापासून वाचवले आणि जगाचा उद्धार केला. या विषाचे सेवन केल्यानंतर त्यांना मोठा त्रास होऊ लागला. त्यांच्या शरीरामध्ये आग होऊ लागली. त्यावेळी ते एका जागी विश्रांतीसाठी झोपले आणि देवी पार्वतीने त्यांचे मस्तक आपल्या मांडीवर घेतले. “सुरुट्टा” म्हणजे चक्कर येणे किंवा थकणे तर “पल्ली” म्हणजे झोप किंवा विश्रांती. यावरूनच या गावाचे नाव सुरुट्टपल्ली असे पडले. असे मानले जाते की हे मंदिर विजयनगर साम्राज्याच्या विद्यारण्य राजाने बांधले होते. काही काळ हे मंदिर जीर्णावस्थेत होते, परंतु काही वर्षांपूर्वीच या मंदिराची पुन्हा सुंदर बांधणी करण्यात आली आहे. (Top Marathi Stories)
शंकरच्या भक्तांसाठी प्रत्येक महिन्यात येणाऱ्या प्रदोषाचे मोठे महत्व आहे. या प्रदोषाच्या दिवशी शंकरांची मोठ्या मनोभावे पूजा केली जाते. तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की, सुरुट्टपल्ली हेच ते ठिकाण आहे जिथे सर्वात आधी प्रदोष पूजेची सुरुवात झाली होती. मान्यता आहे की, जे भक्त शनिवारच्या दिवशी येणाऱ्या प्रदोष व्रतावर या मंदिरात भगवान पल्लिकोंडेश्वराची पूजा करतात, त्यांच्या आयुष्यातील सर्व अडथळे दूर होतात. त्यांना निरोगी आणि उत्तम आरोग्य लाभते. आर्थिक समस्या देखील दूर होतात. नोकरीमध्ये देखील प्रगती होते. विवाहात येणाऱ्या अडचणी दूर होतात, आणि विभक्त झालेल्या जोडप्यांमध्ये पुन्हा गोडवा निर्माण होतो. (Top Stories)
=========
हे देखील वाचा : Shravan : श्रावण महिना कधीपासून सुरु होतोय? पहिला श्रावणी सोमवार कधी?
Nagpanchami : श्रावण महिन्याच्या पंचमी तिथीला साजरी होणारी ‘नागपंचमी’
=========
या मंदिरात भगवान शिवाच्या दर्शनाची वेळ सकाळी ६:०० वाजल्यापासून ते दुपारी १२:३० पर्यंत आहे. हे मंदिर पुन्हा संध्याकाळी देखील उघडते. सायंकाळी ४:०० ते ८:०० या काळात मंदिरात दर्शन घेता येते. भगवान शिवाच्या भक्तांस्तही या मंदिरात येऊन त्यांचे दर्शन घेणे म्हणजे अलौकिक अनुभव असणार आहे. या ठिकाणी तुम्ही बसने देखील पोहचू शकता. उत्तुकोट्टई हे या मंदिरापासूनचे जवळचे बस स्थानक आहे, जे फक्त २ किमी अंतरावर आहे. शिवाय तुम्ही इथे रेल्वेने देखील पोहचू शकतात. तिरुवल्लूर हे रेल्वे स्टेशन मंदिरापासून सुमारे २९ किमी अंतरावर आहे. तर विमानाने या मंदिरात येण्याचा विचार करत असाल तर तिरुपती एअरपोर्ट हे सर्वात जवळचे विमानतळ असून, मंदिरापासून ते सुमारे ७३ किमी अंतरावर आहे. (Social Updates)
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics