वर्षातील असा काळ सुरु आहे जेव्हा बहुतांश कॉर्पोरेट्स आपल्या कर्मचाऱ्यांकडून गुंतवणूकीसंदर्भात माहिती घेत आहेत. प्रत्येकाला अधिकाधिक टॅक्सची बचत करायची असते आणि याच कारणास्तव बहुतांश कर्मचारी हे त्याच्या सत्यतेसाठी धावपळ करताना दिसून येत आहे. कर्मचाऱ्यांकडून दिल्या गेलेल्या माहितीच्या आधारावर टॅक्सची गणना केली जाते आणि त्यानुसार टॅक्सची कपात होते. (Income Tax Saving Scheme)
जर तुम्ही सुद्धा कर्मचारी असाल आणि गुंतवणूक करण्यास सुरुवात केली असेल तर काही अशा गोष्टी आहेत ज्याच्या माध्यमातून तुम्ही टॅक्सची बचत करु शकता. तर टॅक्स बचतीच्या कोणत्या योजना आहेत त्याचबद्दल आपण अधिक जाणून घेऊयात.
इक्विटीसंदर्भातील टॅक्स बचत योजना
टॅक्स बचतीसाठी इक्विटीसंदर्भातील ही योजना फार प्रसिद्ध आहे. ही योजना तुम्हाला पैसे शेअर्समध्ये गुंतणूक करते. त्यासाठी तुमच्यासमोर शेअर्सच्या विविध पोर्टफोलियोचा ऑप्शन दिला जातो. दरम्यान, ही योजना तीन वर्षांच्या लॉक इन पीरियडसह येते. परंतु टॅक्स सेविंग ऑप्शनमध्ये ही सर्वाधिक कमी कालावधीतील योजना आहे. या योजनेत उत्तम रिटर्न्स मिळू शकतात.
पीपीएफ आणि सुकनन्या समृद्धी योजना
दीर्घकाळासाठी तुम्हला गुंतवणूकीचा ऑप्शन उपलब्ध करुन देणाऱ्या या योजनेत याआधी ७.१ टक्के आणि नंतर ७.६ टक्के रिटर्न मिळतो. यामध्ये मिळणाऱ्या रिटर्नवर तुम्हाला कोणताही टॅक्स द्यावा लागत नाही. या योजनेतून तुम्हाला रिटर्न्स दीर्घकाळानंतर मिळतात.
पीपीएफसाठी कमीतकमी कालावधी हा १५ वर्षांचा आहे. तर सुकन्या समृद्धी योजनेत मुलीचे वय २१ वर्ष असते. दरम्यान, दीर्घकाळासाठी फंड तयार करण्यास इच्छुक असलेले गुंतवणूकदार या दोन्ही योजनेत गुंतवणूक करु शकतात. तर हाय इनकम टॅक्स स्लॅबमध्ये येणारे गुंतवणूकदार ही गुंतवणूक करण्याचा विचार करु शकतात.
नॅशनल पेंन्शन सिस्टिम
रिटायरमेंट फंड बनवणे किंवा वृद्धापकाळात वार्षिक उत्पन्न सुनिश्चित करण्यासाठी एनपीएस एक उत्तम ऑप्शन असू शकतो. नॅशनल पेमेंट सिस्टिममध्ये गुंतवणूक करत तुम्ही इनकम टॅक्स अॅक्ट सेक्शन 80C अंतर्गत टॅक्समध्ये सूट मिळवू शकता. या मध्ये वर्षाला १.५ लाख आणि कलम 80CCD (1B) अंतर्गत अतिरिक्त ५० हजार रुपयांपर्यंत ही गुंतवणूक करु शकता. एनपीएसमध्ये गुंतवणूक करुन तुम्ही इनकम टॅक्समध्ये एकूण २ लाख रुपयांपर्यंत सूट मिळवू शकता. (Income Tax Saving Scheme)
सीनियर सिटीजन सेविंग स्किम
ही अशी एक योजना आहे जी पाच वर्षांच्या कालावधीसाठी असते. ती तीन वर्षांपर्यंत वाढवली जाऊ शकते. सध्या या योजनेअंतर्गत जमा झालेल्या रक्कमेवर ८० टक्के व्याज मिळतो. एक सीनियर सिटीजन या योजनेत १५ लाखांपर्यंत गुंतवणूक करु शकतात. तसेच कलम ८० अंतर्गत एका वर्षात १.५ लाखांपर्यंत कपातीचा लाभ घेऊशकता. यामध्ये व्याजाचे पेमेंट तीन महिन्यांमध्ये केले जाते.
हे देखील वाचा- ट्रॅव्हल इंन्शुरन्ससोबत करा तुमचा प्रवास सुरक्षित, जाणून घ्या फायदे
नॅशनल सेविंग्स सर्टिफिकेट आणि टॅक्स सेविंग एफडी
ही गुंतवणूक त्या गुंतवणूकदारांसाठी उत्तम ऑप्शन ठरु शकते जो लो-इनकम टॅक्स स्लॅबमध्ये येते. तसेच कमी कालावधीसाठी ती असते. या दोन्ही योजनेचा कालावधी पाच वर्षांचा असतो. सध्या एनएससी मध्ये ७ टक्के व्याज दर आहे. तर टीडीएफवर जवळजवळ ७ ते ७.५ टक्के व्याज दिले जाते. दरम्यान बँक एफडी आणि एनएससी वर्षाला रिटर्न देतात. मात्र गुंतवणूकदारांसाठीच्या व्याजावर टॅक्स लागतो.
