Income Tax Return Fraud: जर तुम्हाला इनकम टॅक्स रिफंडच्या नावाखाली एखादा मेसेज आलाय का? त्यावर क्लिक करण्याआधी सावध राहा. अशा प्रकारचा मेसेज तुमचे बँक खाते रिकामे करू शकते. गृह मंत्रालयाकडून युजर्सला इशारा देण्यात आला आहे की, त्यांनी अशा कोणत्याही लिंकवर क्लिक करू नये ज्यामध्ये तुम्हाला टॅक्सचे पैसे रिफंड मिळतील असा दावा केलाय. असे मेसेज बनावट असून तुमची मोठी आर्थिक फसवणूक होऊ शकते.
आजकाल इनकम टॅक्स रिफंडच्या नावाखाली सायबर हल्लेखोर तुमच्या बँक खात्यातील रक्कम सहज लंपास करू शकता. सायबर हल्लेखोर टॅक्स डिपार्टेंच्या नावाखाली लोकांना मेसेच पाठवून त्यांना रिफंड मिळण्यासाठी सज्ज व्हा असा दावा करतात. याशिवाय मेसेजमध्ये एक लिंक पाठवून त्याच्या माध्यमातून रिफंड मिळवण्यास सांगतात. पण असे करणे तुमच्यासाठी धोकादायक ठरू शकते. यामुळे कोणत्याही मेसेज किंवा वेबसाइटवरील लिंकवर क्लिक करण्यापूर्वी विचार करा.
फसवणूकीपासून असे राहा दूर
-इनकम टॅक्सकडून तुम्हाला कोणत्याही प्रकारचा मेसेज किंवा ईमेल मागितला जात नाही
-तुम्हाला एखादा असा मेसेज आला असेल त्यामध्ये तुमची खासगी माहिती मागितली असेल तर त्यावर क्लिक करू नका
-इनकम टॅक्स रिफंडसाठी केवळ अधिकृत इनकम टॅक्सच्या वेबसाइटला भेट द्या (Income Tax Return Fraud)
या गोष्टीही लक्षात ठेवा
-इनकम टॅक्स रिफंडच्या नावाखाली आलेल्या मेसेजव विश्वास ठेवू नका
-आपल्या बँक खात्याची माहिती कोणत्याही अज्ञात व्यक्तीसोबत शेअर करू नका
-आपल्या कंप्युटर किंवा फोनवर नेहमीच अँण्टीव्हायरस सॉफ्टवेअर अपडेट करून ठेवा.
आणखी वाचा :