Home » टॅक्स चोरी प्रकरणी दिल्लीसह काही राज्यातील १०० हून अधिक ठिकाणांवर IT ची छापेमारी

टॅक्स चोरी प्रकरणी दिल्लीसह काही राज्यातील १०० हून अधिक ठिकाणांवर IT ची छापेमारी

by Team Gajawaja
0 comment
Income Tax
Share

देशातील बहुतांश राज्यात १०० हून अधिक ठिकाणी इनकम टॅक्सकडून (Income Tax) छापेमारी केली जात आहे. या कारवाईमध्ये अर्धसैनिक बलाची मदत घेण्यात येत आहे. सुत्रांच्या मते, इनकम टॅक्सचे अधिकारी सकाळी ६.३० वाजल्यापासूनच विविध ठिकाणी छापेमारीची कारवाई करण्यासाठी पोहचले. त्याचसोबत ही कारवाई राजकीय पक्षाच्या नावावर देणगी वसूलीसंबंधित फसवणूक केल्याप्रकरणी केली जात आहे. फसवणूक करणाऱ्यांच्या विरोधात इनकम टॅक्स विभागाकडून आता ही कारवाई सुरु करण्यात आली आहे. विभागाने उत्तर प्रदेशातील जवळजवळ २४ हून अधिक ठिकाणी ठापेमारी करण्यात आली. प्राप्त झालेल्या माहितीनुसार, टॅक्स चोरीच्या माध्यमातून कोटी रुपयांची फसणूक केल्याचे हे प्रकरण आहे.

आयकर विभागाकडून ज्या राज्यांमध्ये कारवाई केली जात आहे त्यामध्ये प्रामुख्याने उत्तर प्रदेश, राजस्थान, दिल्ली, मध्य प्रदेश, छत्तीसगढ, हरियाणा आणि गुजरातचा समावेश आहे. इनकम टॅक्सची हा कारवाई लहान राजकीय पक्षांसंदर्भात आहे. ज्यांनी देणगी घेतली आणि नंतर रक्कम परत दिली. विभागाची ही कारवाई निवडणूक आयोगाच्या रिपोर्टवर आधारित आहे. त्याचसोबत आयकर विभागाच्या निशाण्यावर अशा कॉर्पोरेट्स आहेत ज्यांनी एंन्ट्री ऑपरेटर्सच्या माध्यमातून राजकिय पक्षांना देणगी दिली आहे. जयपुरमध्ये सध्या छापेमारी सुरु आहे.

यंदाच्याच वर्षात जून महिन्यात निवडणूक आयोगाने १११ अशा पक्षांचे रजिस्ट्रेशन रद्द करण्यास सांगितले होते ज्यांचे रजिस्ट्रेशन झाले होते पण ते अस्तित्वात आले नव्हते. त्यांचे पत्ते हे बनावट असल्याचे समोर आले होते. त्यांच्या पत्त्यांवर पाठण्यात आलेले पोस्टकार्ड सुद्धा परत आले होते. हे पक्ष अवैध पद्धतीने डोनेशन घेत होते आणि त्यामध्ये घोटाळा करत होते. अशा पक्षांचा आर्थिक तपास करण्यास सांगण्यात आले होते. आयटी विभागाकडून अशाच पक्षांच्या एंन्ट्री ऑपरेटर्सवर छापेमारी करत आहे.

हे देखील वाचा- CBI ला कोणत्याही परवानगी शिवाय राज्यात छापेमारी करता येते?

Income Tax
Income tax

तसेच राजस्थानमध्ये ५३ ठिकाणी छापेमारीची कारवाई केली जात आहे. येथे मिड डे मीलच्या उद्योगपतींच्या येथे सुद्धा आयकर विभागाने (Income Tax) छापा मारला आहे. तर दिल्ली आणि दिल्ली बाहेरील कारवाईसाठी अर्धसैनिक बलाचा वापर केला जात आहे. सुत्रांच्या मते छापेमारी लहान-लहान राजकीय पक्षांच्या घरी आणि कार्यालयांमध्ये केली जात आहे. आयटी टीमकडून तपास केला जात आहे की, या लहान-लहान राजकीय पक्षांच्या मागे कोणत्या मोठ्या पक्षाचा पैसा किंवा त्यांच्यामध्ये देवाण-घेवाण आहे की नाही. त्याचसोबत या लहान पक्षांना डोनेशन कुठून आणि किती येते याचा सुद्धा तपास केला जात आहे.

राजस्थान मधील कोटपूतलीचे मंत्री राजेंन्द्र यादव यांच्या नातेवाईकांच्या कारखान्यासह घरांवर ही छापेमारी केली जात आहे. कोटपुतली मध्येच एकूण ३७ ठिकाणांवर इनकम टॅक्सकडून कारवाई केली जात आहे. आयकर विभागाच्या कर्मचाऱ्यांसह सीआरपीएफचे शंभरहून अधिक कर्मचारी सुद्धा उपस्थितीत आहेत.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.