जर्मनीचा हुकूमशहा ॲडॉल्फ हिटलर (Hitler) यांनी त्याच्या कार्यकालात केलेल्या अत्याचाराच्या घटना आजही अंगावर काटा आणतात. या काळात लाखो लोकांना मारण्यात आले. हिटलरनं (Hitler) केलेल्या अशाच हत्याकांडातील एका आरोपीला आता शिक्षा करण्यात आली आहे. हे वाचून नक्की आर्श्चय वाटेल. पण इर्मगार्ड फर्चनर नावाच्या महिलेचे आयुष्य बघितले आणि लहान वयातच तिने केलेल्या घटना पाहिल्या की हिटरलच्या कार्यकाळात किती अमानुष हत्याकांड झाली आहेत, याची जाणीव होते. इर्मगार्ड यांनी हिटलरकडे (Hitler) टायपिस्ट म्हणून काम केले आहे. या 97 वर्षीय टायपिस्टला 10,505 खून प्रकरणी दोषी ठरवले आहे. नाझी गुन्ह्यांसाठी दोषी ठरलेली इर्मगार्ड फर्चनर ही पहिली महिला आहे. इर्मगार्ड यांनी नाझी सैन्यात महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडली आहे. त्यांना ताब्यात घेण्यात आले तेव्हा ती किशोरवयीन होती. मात्र तेव्हाही तिने केलेल्या अपराधांची जाणीव होती.
97 वर्षाच्या इर्मगार्ड फर्चनर, यांनी जर्मनीच्या स्टुथॉफ येथे शॉर्टहँड टायपिस्ट म्हणून 1943 ते 1945 या काळात काम केले आहे. स्टुथॉफ येथे ज्यू कैदी, गैर-ज्यू नागरिक आणि युद्धादरम्यान पकडलेल्या सोव्हिएत सैनिकांसह सुमारे 65,000 लोकांना भयंकर परिस्थितीत मारण्यात आल्याची नोंद आहे. इर्मगार्ड फोर्चनर, या नाझी कॅम्पमध्ये तैनात होत्या. त्यांनी हिटलरकडे (Hitler) टायपिस्ट म्हणून काम केले आहे. अहवालानुसार, जून 1944 च्या सुमारास स्टॅमथॉफ कॅम्पमध्ये 65 हजार लोक मारले गेले. इर्मगार्ड स्टेथॉफ कॅम्पमध्ये मरण पावलेल्यांच्या मृत्यू प्रमाणपत्रांवर शिक्का मारत असत. या हत्याकांडातील मृतांपैकी काही गैर-ज्यू कैदी होते आणि काही सोव्हिएत सैनिक होते. अटक झाली तेव्हा इर्मगार्ड 18-19 वर्षांची होती. त्यावेळी तिच्यावर विशेष बाल न्यायालयात खटला चालवण्यात आला. स्टेथॉफ कॅम्पमध्ये कैद्यांना मारण्यासाठी गॅस चेंबरही बांधण्यात आले होते. यासंदर्भातला खटला सुरू झाल्यानंतर 40 दिवसांनी इर्मगार्डने न्यायालयात जे घडले त्याबद्दल मी माफी मागते. या सर्वात मी नाझी सैन्याकडून लढले याबद्दल मला खेद वाटत असल्याचे सांगितले. इर्मगार्डवर उत्तर जर्मनीतील इत्झेवोह या न्यायालयात खटला चालवला गेला. सप्टेंबर 2021 पासून हा खटला सुरु होता. खटल्याच्या सुनावणीदरम्यान न्यायालयाने या शिबिरात जिवंत राहिलेल्या सर्वांचे जबाब घेतले. मात्र, इर्मगार्डच्या शिक्षेबाबत अद्याप काहीही सांगण्यात आलेले नाही. सप्टेंबर 2021 मध्ये जेव्हा खटला सुरू झाला तेव्हा इर्मगार्ड फर्चनरने पळण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी तिला पकडले. हा ऐतिहासिक खटला चाळीस दिवस चालला. यात इर्मगार्ड फर्चनरने यांनी जे घडले त्यासाठी मला माफ करा या शब्दात माफी मागितली. या खटल्यात इर्मगार्ड फर्चनरने तर्फे लढणा-या वकीलांनी इर्मगार्डला निर्दोष सोडले जावे अशी मागणी केली. करण इर्मगार्ड फक्त टायपिस्ट होती. तिचा या हत्याकांडामध्येही कुठलाही सहभाग नसल्याचा बचाव मांडण्यात आला. पण न्यायालयाने हा युक्तीवाद फेटाळला.
========
हे देखील वाचा : कर्जधारकांना झटका! ग्राहकांना न सांगताच बँक वाढवणार कर्जाचा व्याज दर
========
युद्धानंतर, फर्चनर यांनी हेन्झ फर्चस्टॅम नावाच्या एसएस पथकाच्या नेत्याशी लग्न केले. या दोघांची भेट नाझी कॅम्पमध्येच झाली. तिने उत्तर जर्मनीतील एका छोट्या गावात प्रशासकीय कर्मचारी म्हणून काम केले. 1972 मध्ये त्यांच्या पतीचे निधन झाले. इर्मगार्ड फर्चनर यांना अटक झाल्यावर इतिहासकार स्टीफन हॉर्डलर यांनी या खटल्यात महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांनी दोन न्यायाधीशांसोबत छावणीच्या ठिकाणी भेट दिली. या छावणीत झालेले हत्याकांड हे अंगावर शहारे आणणारे होते, असे या न्यायाधिशांनी मत व्यक्त केले. या छावणीत ज्यांना पकडून आणले होते, त्या सर्वांना विषारी वायूचा मारा करुन मारण्यात आले. एका मोठ्या कंपार्टमेंटमध्ये या लोकांना डांबले जायचे, आणि मग वरुन हा विषारी वायू सोडला जायचा. काही काळानंतर हे कंपार्टमेंट उघडून सर्व मृतांची नोंद घेतली जायची. ही नोंद इर्मगार्ड फर्चनर या स्वतः करीत असल्याचा उल्लेख न्यायाधिशांनी केला आहे. यावरुन फर्चनर यांना त्या करत असल्याच्या कामांची माहिती होती, आणि त्या दोषी आहेत, हे स्पष्ट केले. मात्र आता इर्मगार्ड फर्चनर या 97 वर्षाच्या आहेत. त्यांना कुठली शिक्षा देण्यात येते याची उत्सुकता आहे.
सई बने