पृथ्वी, अपरिमित सौंदर्याची खाण. निसर्गाच्या कित्येक रहस्यांसोबत जीवन अंकुरणारा आपल्या आकाशगंगेतील एकमेव ग्रह. बघावे, शोधावे तेवढे इथले नैसर्गिक सौंदर्य भावणारे, गूढ करत जाणारे भासत जाते. मानवांच्या पृथ्वीवरील वास्तव्याच्या काळात माणसाने येथील भव्यतेत अजून भर घातली. आज जगात अनेक अशा गोष्टी आहेत ज्या आजच्या काळात निर्माण करण जवळपास मानवी आवाक्याच्या बाहेर आहे. या गोष्टी आपल्यासाठी आश्चर्यापेक्षा कमी नाहीत. ही आश्चर्ये जगासमोर आणण्याच्या दृष्टीने २००१ साली ‘द न्यू सेव्हन वंडर्स ऑफ द वर्ल्ड’ संस्थेद्वारे सर्व्हे घेण्यात आला. जगातील दोनशे जुन्या स्मारकांपैकी सात आश्चर्ये निवडण्यात आली. या प्रक्रियेत लोकांनी इंटरनेट आणि मोबाईल मेसेजिंग द्वारे मतदान करत सहभाग नोंदवला होता. २००७ साली याचे निकाल (Result) घोषित करण्यात आले. यात निवडले गेलेले जगातील सात आश्चर्ये खालीलप्रमाणे.

ताज महाल (आग्रा, भारत)
आग्रा शहरात यमुना नदीच्या तटावर ताजमहाल दिमाखात उभे आहे. मुघल सम्राट शहाजहान याने आपली प्रिय पत्नी मुमताज हिच्या स्मृतीपित्यर्थ ताजमहाल उभारला. मोगल स्थापत्यकलेचा उत्कृष्ट नमुना असलेली ही इमारत १६५३ मध्ये बांधून पूर्ण झाली. उस्ताद अहमद लाहुरी यांच्या मार्गदर्शनाखाली एकूण वीस हजार कामगारांनी ही इमारत पूर्ण केली.(Result)
चिचेन इत्सा (युकातान, मेक्सिको)
माया जमातीच्या लोकांनी बांधलेले हे एक शहर होते. विविध स्थापत्यकलेचे सुरेख मिश्रण यामध्ये बघायला मिळते. मेक्सिकोच्या युकातान शहरामध्ये हे वसलेले आहे.(Result)
क्रिस्तो रेदेंतोर (रियो दि जानेरो, ब्राझिल)
रियोजवळील कार्कोरावो डोंगरावर उभा असलेल्या येशुंच्या या पुतळ्याची उंची 30 मीटर आहे तर याचे हात 28 मिटर पसरलेले आहेत. पॉल लँडोवस्की या फ्रेंच शिल्पकाराने याची निर्मिती केली तर हायटर दा सिल्वा कोस्टा या ब्राझिलियन इंजिनियरने अल्बर्ट कॅकोट आणि जॉर्ज लेओनिडा, ज्यांनी या पुतळ्याचा चेहरा बनवला यांच्या सहाय्याने हा पुतळा बांधला. याचे बांधकाम १९२२ ते १९३३ दरम्यान पूर्ण झाले. रिइन्फ़ोर्सड कॉक्रीट आणि सोपस्टोन यांपासून हा पुतळा बांधण्यात आलेला आहे.
कलोसियम (रोम, इटली)
कलोसियम हे रोम शहरामधील एक खुले थिएटर आहे. ऐतिहासिक रोमन साम्राज्य काळात बांधले गेलेले कलोसियम थिएटर रोमन वास्तूशास्त्र व अभियांत्रिकीचे एक सर्वश्रेष्ठ उदाहरण मानले जाते. सम्राट व्हेस्पासियनच्या मार्गदर्शनाखाली इ.स. ७० ते ७२ काळामध्ये कलोसियमचे बांधकाम सुरू झाले व इ.स. ८० साली टायटसच्या काळात ते पूर्ण झाले. ५०,००० प्रेक्षकांची क्षमता असलेले कलोसियम कला, संगीत, नाटके, लढाया इत्यादी मनोरंजन प्रकारांसाठी वापरले जात असे. २००० वर्षे जुने कलोसियम नैसर्गिक झीज, भूकंप इत्यादी घटनांमुळे काही अंशी नष्ट झाले असले तरी आजही ते रोममधील सर्वांत लोकप्रिय पर्यटनस्थळ आहे. (Result)
चीनची भिंत (चीन)
द ग्रेट वॉल ऑफ चायना अर्थात चीनची भिंत परकीय आक्रमणापासून संरक्षण करण्यासाठी बांधली गेली. या भिंतीच्या बांधकामाची सुरुवात सातव्या शतकाच्या सुमारास झाली. त्यानंतर चीनचा पहिला सम्राट किन शिन हुआंग याने काही भाग बांधला. त्यानंतर बऱ्याच राज्यकर्त्यांनी ह्या भिंतीचे बांधकाम केले. मिंग डायनास्टी याने या भिंतीचा बरचसा भाग बांधून काढला आहे. मध्ये मध्ये उभारलेल्या टॉवर्समुळे संरक्षणाच्या दृष्टीने ही भिंत अधिक प्रभावी होऊन जाते. अवकाशातून ही भिंत आपण पाहू शकतो असेही बोलले जाते.(Result)
=========
हे देखील वाचा : बेवारसी असलेला ‘हा’ एक हजार कोटींचा बंगला…
=========
माक्सू पिक्त्सू (कुस्को, पेरू)
हे पेरू देशातील ऐतिहासिक इन्का साम्राज्यातील एक स्थळ आहे. माक्सू पिक्त्सू पेरूमधील कुस्को शहराच्या शेजारी समुद्रसपाटीपासुन ७९७० फूट उंचीवर स्थित आहे व इन्का साम्राज्याच्या सर्वाधिक महत्त्वाच्या खुणांपैकी एक मानले जाते. युनेस्कोने माक्सू पिक्त्सूला जागतिक वारसा स्थान जाहीर केले. (Result)
पेट्रा (जॉडन)
पेट्रा हे पश्चिम आशियाच्या जॉर्डन देशातील एक प्राचीन शहर आहे. हे शहर प्रामुख्याने डोंगर कोरून बनवण्यात आले असून त्याची निर्मिती इ.स. पूर्व ३१२ मध्ये करण्यात आली असावी असा अंदाज आहे. पेट्रा जॉर्डनमधील सर्वात लोकप्रिय पर्यटनस्थळ आहे. पेट्रा जॉर्डनच्या दक्षिण भागात अकाबाचे आखात व मृत समुद्र ह्यांदरम्यान असलेल्या सपाट खोऱ्यामध्ये स्थित आहे व १८१२ सालापर्यंत ते उर्वरित जगासाठी बहुतांश अज्ञात होते जेव्हा एका स्विस शोधकाने त्याचा शोध लावला. (Result)
सौंदर्य, स्थापत्य यांचा सर्वोच्च नमुना म्हणजे जगातील ही सात आश्चर्ये आहेत.