1 ऑगस्ट रोजी आकाशात अभूतपूर्व असे दृष्य दिसणार आहे. अवकाश दर्शनाची ज्यांना आवड आहे, त्यांच्यासाठी ही सुवर्ण संधी असणार आहे. तर या दिवसाचे धार्मिक महत्त्वही खूप आहे. अधिक महिना चालू आहे. त्यात आलेली पौर्णिमा ही सर्वस्वी चांगली मानली जात असते. दर तीन वर्षांनी असा सुवर्णयोग येतो. त्यामुळे 1 ऑगस्ट रोजी अवकाशात दिसणारा सुपरमून (SuperMoon) अनेकांना सुखावणारा असाच ठरणार आहे. पूजापाठ करणा-यांसाठी हा पौर्णिमेचा काळ मोठा पवित्र असेल, तर अवकाशाचा, ता-यांचा अभ्यास करणा-यांसाठी तीन वर्षानी येणारी ही अभ्यासाची नवीन संधी असणार आहे. उद्या 1 ऑगस्ट रोजी अवकाशात दिसणारा ब्लू मून दर तीन वर्षांतून एकदा दिसतो. यानंतर हा ब्लू मून 2026 मध्ये दिसणार आहे.
याशिवाय ऑगस्ट महिन्याच्या 30 तारखेलाही अवकाशात ब्लू मून दिसणार आहे. त्यामुळे ऑगस्ट हा एक मनोरंजक महिना असणार आहे. ब्लू मून किंवा सुपरमून हा चंद्र सामान्य पौर्णिमेच्या चंद्रापेक्षा थोडा मोठा आणि तेजस्वी दिसतो. यामुळेच या पौर्णिमेचे धार्मिक महत्त्वही मोठे आहे. या दिवशी तिर्थस्नानावर जाऊन पहाटे स्नान करण्यासाठी गर्दी होते. विशेष करुन भगवान शंकराचे आणि भगवान विष्णूचे स्थान असलेल्या ठिकाणी पहाटे स्नान करुन भगवान शंकराचे पूजन करण्यासाठी या पौर्णिमेच्या दिवशी गर्दी होते. दर तीन वर्षांनी येणारा हा मुहूर्त मोठा फलदायी असल्याची धारणा आहे. (SuperMoon)
ऑगस्ट महिना हा खास ठरणार आहे. या महिन्याच्या सुरुवातीला आणि अखेरीस ब्लू मून दृष्टीस पडणार आहे. हा ब्लू मून अमेरिकेत अधिक सुस्पष्ट पाहावयास मिळणार आहे. अमेरिकेत 1 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 6.33 वाजता आकाशात सुपर मून पाहता येणार आहे. यासोबतच 30 ऑगस्ट रोजीही आकाशात ब्लू मून पाहता येणार आहे. ही दोन्ही दृश्ये आश्चर्यकारक असतील. अशी खगोलीय घटना दर तीन वर्षांनी घडते. हा ब्लू मून दर तीन वर्षांतून एकदा दिसतो. सहज डोळ्यांनी आपण ही आश्चर्यकारक खगोलीय घटना पाहू शकतो. त्यामुळेच सर्वचजण या खगोलीय घटनेचे नेत्रसुख घेऊ शकतात. ब्लू मून म्हणजे, चंद्र निळा दिसतो असे नाही तर कॅलेंडरच्या एका महिन्यात दोन पौर्णिमा येतात तेव्हा त्याला ब्लू मून म्हणतात. पौर्णिमा 31 दिवसांच्या आत दोनदा येते तेव्हा असे घडते. या ऑगस्ट महिन्यात तसे होत आहे. जेव्हा चंद्राची कक्षा नेहमीपेक्षा पृथ्वीच्या जवळ येते तेव्हा त्याला सुपरमून म्हणतात. 2023 हे वर्ष सुपरमूनच्या (SuperMoon) दृष्टीने खूप खास आहे, ज्यामध्ये अशा चार घटना घडतील. विशेषतः, 30 ऑगस्टचा पूर्ण चंद्र ब्लू मून असेल. यापूर्वी 3 जुलै रोजी जगातील अनेक भागात सुपरमून दिसला होता. हा वर्षातील पहिला सुपरमून (SuperMoon) होता ज्याला ‘बक मून‘ असेही म्हटले जाते. या दरम्यान चंद्र आणि पृथ्वी यांच्यामध्ये 361,934 किमी अंतर होते, जे सामान्यपेक्षा 22,466 किमी कमी होते. सामान्य पौर्णिमेच्या तुलनेत, तो 5.8 टक्के मोठा आणि 12.8 टक्के तेजस्वी दिसला. आता असाच तेजस्वी चंद्र 1 ऑगस्ट आणि 30 ऑगस्ट रोजी दिसणार आहे.
=======
हे देखील वाचा : भारतातील असे शहर जेथे फुकटात राहता येते
=======
अवकाशात दिसणा-या या खगोलीय घटनेला धार्मिक महत्त्वही खूप आहे. या दिवसासाठी काही ठिकाणी दिवसरात्र मंदिरे खुली ठेवण्यात येणार आहेत. सध्या अधिकमहिना चालू आहे. या अधिक महिन्यात येणा-या पौर्णिमेला भगवान विष्णूची पूजा करण्याचे विशेष महत्त्व शास्त्रात सांगितले आहे. याशिवाय पौर्णिमेच्या तिथीला स्नान आणि दान केल्याने विशेष पुण्य प्राप्त होते. त्यामुळेच या दिवशी स्नानासाठी आणि देवाचे दर्शन घेण्यासाठी भक्तांची गर्दी होणार आहे. श्रावण अधिकमास पौर्णिमेला 3 विशेष शुभ योग तयार होत आहेत. या दिवशी आयुष्मान योग सकाळी 6.53 वाजता सुरू होईल आणि 2 ऑगस्ट रोजी दुपारी 2.34 वाजता समाप्त होईल. दुसरीकडे, प्रीती योग रात्री 11:50 वाजता सुरू होईल आणि 6 ऑगस्ट रोजी 53:00 वाजता समाप्त होईल. याशिवाय 1 ऑगस्टला लक्ष्मी नारायण योगही तयार होत आहे. हा योग खूप लाभदायक मानला जातो. यादिवशी लक्ष्मी देवीला प्रसन्न करण्यासाठी विशेष पूजा करण्यात येते. तसेच तीन वर्षातून एकदा येणारा हा योग साधत पिंपळाच्या झाडाची पूजा केल्यासही सर्व नकारात्मक शक्तींचा नाश होतो, अशी धारणा आहे.
सई बने