Home » जपानमध्ये मृतदेह घरात कुजतात !

जपानमध्ये मृतदेह घरात कुजतात !

by Team Gajawaja
0 comment
Japan
Share

तंत्रज्ञांनाच्या बाबतीत जग एक पाऊल पुढे असेल तर जपान हा देश इतरांच्या तुलनेत दहा पाऊलं पुढे असतो. खूप शिस्तबद्ध असेलला हा देश सध्या एका अनोख्या संकटाचा सामना करावा लागतो आहे. कुडोकुशी असं त्या संकटाचं नाव. कुडोकुशी म्हणजे एकट्याने मरणं येणे. तुम्ही म्हणाल, यात काय अनोखं आहे. अनेक लोकं मरतात एकट्याने. पण एकट्याने मरणं जपानमध्ये वाटतं तेवढं साध नाहीये. एखादी व्यक्ती त्याच्या घरात मरण पावली आहे हे इतरांना अनेक दिवसांनी, महिन्यांंनी कळतं. जपान पोलिसांनी २०२४ च्या पहिल्या सहा महिन्यांचाच जो रीपोर्ट जारी केला आहे. या रीपोर्टच्या आकडेवारीनुसार जपानमध्ये सहा महिन्यात तब्बल ४० हजार लोकांचा त्यांच्या राहत्या घरात एकटं असताना मृत्यू झाला. त्यात १३० केस तर अश्या होत्या ज्यांचा मृतदेह वर्षभर घरात सडून पडून होता. जपान मध्ये एकटेपणाच संकट का ओढवलं आहे? आणि कुडोकोशी बद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया. (Japan)

साल २००० चालू होतं. जपानच्या ओसका शहरात एका अपार्टमेंटमध्ये हरुकी वतनाबे या ६० वर्षीय व्यक्तीचा अंथरुणावर डीकमपोस्ट झालेला मृतदेह आढळला. त्यांच्या घरात भरपूर कीटक आणि झुरळांच साम्राज्य झालं होतं. पोलिसांच्या चौकशीत कळाल की हरुकी हे काही गरीब व्यक्ती नव्हते.
त्यांच्याकडे मुबलक पैसा होता. त्यांची पत्नी हयात नव्हती आणि मुलांशी त्यांच बोलण होत नव्हतं. थोडक्यात, त्यांची काळजी घेणार कोणीच नव्हतं. तीन महिने त्यांना कोणी कॉल केला नाही, तीन महिने कोणालाही कळलं नाही की ते मरण पावले आहेत. तीन महिने किडे आणि झुरळांनी भरलेल्या खोलीत त्यांचा मृतदेह अंथरूणात कुजत होता. ही जुनी घटना असली तरी अशा भयानक एकाकी मरणाच्या घटना जपान मध्ये आता वाढल्या आहेत. (Japan)

जपानमधील अनेक लोक सामाजिक आयुष्यात जास्त लक्ष न देता आपल्या कामात व्यस्त राहतात. आपल्या बिझी लाइफमुळे ते लग्नाचा विचार सुद्धा करत नाहीत. सतत कामात असल्यामुळे त्यांना सोशल लाइफ उरतच नाही. पण जपानी लोकांनी स्वत:ला कामात एवढं व्यस्त करून घेण्याचं कारण काय? तर दुसऱ्या महायुद्धानंतर जपानची आर्थिक स्थिती घालावली. तेव्हा जपानच्या लोकांनी खूप जास्त प्रमाणात काम करायला सुरुवात केली. त्यामुळे जपानची एकॉनॉमी तर बूस्ट झाली. पण हे Discipline आणि फक्त काम करण्याचं कल्चर तिथे पिढी दर पिढी वाढत गेलं आणि त्यामुळे लोकांमधला एकटेपणा सुद्धा वाढला. आज जपानमध्ये जवळ जवळ २९.४७% लोकं एकटे राहत आहेत. ज्यामध्ये अधिकतर लोकं वयोवृद्ध आहेत. (Japan)

======

हे देखील वाचा : जपानचा प्रिन्स चार्मिंग

======

या समस्येला तोंड देण्यासाठी जापानने Loneliness Minister म्हणजे एकटेपणाच्या संकटावर समाधान आणि उपाययोजना काढण्यासाठी एक मंत्री नेमला आहे. शिवाय या लोकांचा एकटेपणात मृत्यू होण्याच्या या घटनांमुळे जपानमध्ये एक नवीन बिझनेस सुद्धा सुरू झाला आहे. हा बिझनेस म्हणजे एखादा माणूस मरण पावल्यानंतर त्या घराची साफसफाई करणे. एखाद्या व्यक्तीचा असा मृत्यू झाला तर अश्या प्रकारची साफसफाई करणाऱ्या कंपन्या त्या व्यक्तीच्या नातेवाईकांना किंवा तो व्यक्ती जिथे राहतो त्या घरच्या मालकाला ही साफसफाई करण्यासाठी विचारतात. शिवाय अश्या कंपन्या त्या व्यक्तीच्या जपानी रीतीरिवाजाप्रमाणे अंत्यसंस्कार सुद्धा करतात. कारण मृत पावलेल्या व्यक्तीच्या घरचे मृतदेह घेण्यास नकार देतात. ही खूप दुर्दैवी गोष्ट आहे. (Japan)


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.