पितृपक्ष सुरु झाला आहे. पितृपक्षाचा काळ भाद्रपद पौर्णिमेपासून अश्विन अमावस्येपर्यंत असतो. या वर्षी 7 सप्टेंबर ते 21 सप्टेंबर पितृपक्ष असणार आहे. पूर्वजांच्या पूजनाचा काळ असलेल्या या पितृपक्षात तर्पण देण्यासाठी संगमकाठावर गर्दी होते. त्यातही भारतात पितृपक्षामध्ये प्रयागराज, गया आणि वाराणसी येथे मोठी गर्दी होते. या तीन ठिकाणी एकदा तरी पूर्वजांच्या नावानं तर्पण करावे, असे सांगण्यात आले आहे. त्यातही वाराणसी येथील पिशाच मोचन तिर्थाबाबत अनेक मान्यता असून हे पिशाच मोचन तीर्थ रहस्यमयी तीर्थ म्हणूनही ओळखले जाते. वाराणसीमध्ये असलेल्या या प्राचीन रहस्यमयी तिर्थबाबत अशी मान्यता आहे की, येथे त्रिपिंडी श्राद्ध केल्याने पूर्वजांच्या आत्म्यांना शांती मिळते. (Pitrupaksha)
पूर्वजांच्या पूजा आणि तर्पणाचा उत्सव, पितृपक्ष, सुरू झाला आहे. पितृपक्षाच्या या 15 दिवसांत, पूर्वजांसाठी श्राद्ध आणि पिंडदान केले जाते. सध्या काशी, प्रयाग आणि गया हे पिंडदान आणि श्रद्धासाठी लाखों भाविकांची गर्दी जमली आहे. या तीर्थक्षेत्रांमध्ये काशी नगरीचे वेगळे महत्त्व असून भगवान शंकराच्या या नगरीमध्ये पिंडदान करण्यासाठी रोज हजारो भाविक दाखल होत आहेत. काशी चा उल्लेख मोक्ष नगरी असा करण्यात येतो. त्यातही येथील पिशाच मोचन तीर्थाचे विशेष महत्त्व आहे. (Social News)
काशीतील पिशाच मोचन तीर्थावर पिंडदान केल्याने भूतलोकात जाणारे पूर्वज देखील तृप्त होतात आणि त्यांना मुक्ती मिळते, अशी मान्यता आहे. काशीमधील बाबा विश्वनाथांच्या मंदिरापासून सुमारे 3 किमी अंतरावर पितरांचे मोचन तीर्थ आहे. या तीर्थक्षेत्राचा भगवान शंकराशी संबंध आहे. धार्मिक श्रद्धेनुसार, या तीर्थक्षेत्राला महादेवाचा आशीर्वाद आहे की, जो कोणी या तलावाच्या पाण्याने आपल्या पूर्वजांचे श्राद्ध-तर्पण करतो आणि येथे स्नान करतो, त्याच्या पूर्वजांच्या मुक्ततेचा मार्ग खुला होतो. काशीचे पितरांचे मोचन तीर्थ हे संपूर्ण जगात एकमेव असे स्थान आहे की, जिथे भूतलोकात प्रवेश केलेल्या आत्म्यांना विशेष विधीने मुक्ती मिळते. विशेषतः अकाली मृत्युमुखी पडलेल्या मृत आत्म्यांसाठी येथे विशेष पूजा करण्यात येते. काशीमधील हे एकमेव तीर्थक्षेत्र आहे जिथे भटकंती करणाऱ्या आत्म्यांच्या मुक्तीसाठी त्रिपिंडी श्राद्ध केले जाते. (Pitrupaksha)
या विधीत ब्रह्मा, विष्णू आणि शंकर यांची तीन वेगवेगळ्या कलशांवर पूर्ण विधीपूर्वक पूजा केली जाते, ज्यामुळे त्या भटकणाऱ्या आत्म्यांना वैकुंठात जाण्याचा मार्ग मोकळा होतो, असे सांगितले जाते. या पिशाच मोचन तिर्थावर आता मोठी गर्दी झाली आहे. देशभरातील हिंदू भाविक या तिर्थावर आले असून या सर्व भाग पंडित आणि या भाविकांनी भरुन गेला आहे. पिशाच मोचन तिर्थाबाबत आणखीही एक मान्यता आहे की, भगवान विष्णूने स्वतः या तलावाला पिशाच मोचन म्हणजेच भूतांपासून मुक्तीचे वरदान दिले आहे. येथे जो कोणी स्नान करून भक्तीने पूजा करतो त्याच्या जीवनातील सर्व अडथळे दूर होतात. शिवाय नकारात्मक विचारही संपुष्टात येतात. ज्यांचा अकाली मृत्यू झाला आहे, अशांच्या नावानं याच पिशाच मोचन तिर्थावर पूजा आणि होम केले जातात. त्यातून या पूर्वजांना मुक्ती मिळते, अशी श्रद्धा आहे. (Social News)
==========
हे देखील वाचा : Pitrupaksha : पितृपक्षात वापरल्या जाणाऱ्या दर्भाचे महत्व
==========
याशिवायही या पिशाच मोचन तिर्थाची लोकप्रियता आहे. येथे वाईट शक्तींनी पछाडलेल्या लोकांनी स्नान केले तर त्यांच्यावरील वाईट शक्तीचा प्रभाव कमी होतो, असे सांगितले जाते. त्यामुळेच पितृपक्षाच्या पहिल्या दिवसापासून येथे मोठी गर्दी झाली आहे. दररोज 30 ते 40 हजार भाविक येथे श्राद्ध आणि पिंडदान करण्यासाठी येत आहेत. या सर्व भाविकांसाठी राज्यसरकारनं व्यवस्था केली आहे. या पिशाच मोचन कुंडाची माहिती हिंदू धार्मिक ग्रंथातही आहे. गरूड पुराणात या पिशाच मोचन कुंडाचा उल्लेख आहे. यातील काशीखंडात असे नमूद आहे की, पवित्र गंगा नदी पृथ्वीवर येण्याआधीच पिशाच मोचन कुंड अस्तित्वात होते. सोबतच स्कंद पुराणातही या तिर्थाचा उल्लेख आहे. पिशाच मोचन कुंडाला ‘काशीचे विमल तीर्थ’ असेही म्हणतात. आता हेच तिर्थ जगाच्या कानाकोप-यातून आलेल्या भाविकांनी भरुन गेले आहे. (Pitrupaksha)
सई बने
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics