Home » दिवाळीत घरी आवर्जून आणतो ‘ही’ वस्तू

दिवाळीत घरी आवर्जून आणतो ‘ही’ वस्तू

by Team Gajawaja
0 comment
True Cardamom Demand
Share

काही वस्तू कितीही महाग झाल्या तरी त्यांच्याशिवाय सण-समारंभ साजरे होत नाहीत. अगदी किलोभर नाही पण दहा ग्रॅम तरी या वस्तू घरात आल्याच पाहिजेत, असा अट्टाहास असतो. चवीसाठी आणि आरोग्यासाठीही या वस्तूंची तोड कोणातच नाही. ही छोटीशी वस्तू म्हणजे छोटी हिरवी वेलची. सध्या बाजारात छोट्या हिरव्या वेलचीची मागणी (True Cardamom Demand)वाढली असली तरी त्यांची किंमतही वाढत आहे. भारतात कर्नाटक, केरळ आणि तामिळनाडू या राज्यांमध्ये वेलचीची लागवड होते. पण जोरदार पावसाचा वेलचीच्या उत्पादनालाही फटका बसला आहे. दसरा-दिवाळीमध्ये होणा-या गोड पदार्थात या छोट्याश्या वेलचीला मोठी मागणी असते. प्रत्येक घरात अगदी दहा ग्राम तरी वेलची खरेदी केली जाते. लाडू, करंजी, शंकरपाळी अशा गोडाच्या पदार्थात चमचाभर वेलचीची पूड चव आणते. पण त्यासोबत ही चमचाभर वेलची आरोग्यही सांभाळते. त्यामुळेच बाजारात कितीही भाव वाढला तरी या महाग असलेल्या हिरव्या वेलचीचा सुगंध प्रत्येक घरात दरवळतो.

हिरवी वेलची ही प्रत्येक भारतीय घरामध्ये असतेच. मसाल्यामधला अत्यंत सुवासिक असा हा पदार्थ नावापुरता मसाल्यामध्ये वापरत असले तरी त्याचा खरा वापर गोडाच्या पदार्थांमध्ये होतो. मसाला दुधापासून लाडवापर्यंत वेलचीचा मुबलक वापर प्रत्येक घरात होतो. अगदी मसाला चहा म्हटल्यावरही त्यात वेलचीचा सुगंध हवा असतो. ही वेलची या पदार्थांमध्ये का वापरली जाते याचीही माहिती असावी. ही माहिती असल्यास तुम्ही नेहमीच्या स्वयंपाकात आठवणीनं किमान एका तरी वेलचीचा वापर कराल, इतकी ती गुणकारी आहे.(True Cardamom Demand)

वेलचीमध्ये फायबरचे प्रमाण भरपूर असते. पचन आणि वेलची याचे घनिष्ठ नाते असते. गोडाच्या पदार्थात दूधाचा वापर असतो. आणि त्याचमुळे हे पदार्थ पचायला थोडे जड असतात. अशावेळी त्यात वेलची टाकल्यास पचन चांगले होते. वेलचीचा वापर बद्धकोष्ठता, अॅसिडिटी, गॅस ची समस्या जाणवत असेल तर केल्यास त्यापासून मुक्ती मिळते. जेवणानंतर अनेकवेळा तोंडातून दुर्गंधी येते. अशावेळी एक वेलची चघळल्यास ही दूर्गंधी दूर होतेच शिवाय जेवण पचनासही त्याचा फायदा होतो. आणखी महत्त्वाचे म्हणजे वेलचीच्या नियमीत सेवनानं रक्तदाबही नियंत्रणार रहातो असा निष्कर्ष काढण्यात आला आहे.(True Cardamom Demand)

वेलची मुख्यतः दोन प्रकारात उपलब्ध असते. एक मोठी वेलची आणि हिरवी वेलची(True Cardamom Demand). मोठी वेलची ही काळ्या रंगाची असून त्याचा वापर मसाल्याच्या पदार्थात, चहाचा मसाला करण्यासाठी आणि मुख्यतः सामिष पदार्थांमध्ये जास्त केला जातो. हिरवी वेलची ही गोडाच्या पदार्थात जास्त वापरली जाते. अर्थात त्याचाही वापर मसाल्यामध्ये करण्यात येतो. त्यामुळे मिरचीचा तिखटपणा थोडा कमी होतो, आणि मिरचीपासून होणारी जळजळ कमी होते. भारतीय स्वयंपाकात वेलची हा एक सामान्य घटक झाला आहे. याशिवाय स्वीडन, नॉर्वे आणि फिनलंडमध्येही वेलचीचा वापर मुबलक प्रमाणात होतो. भारतातील वेलचीचे बरेचसे उत्पादन पारंपारिकपणे केले जाते. वेलचीच्या झाडांना आठ ते दहा पाने असतात. त्यांची उंची साधारण 1 फूट असते. सप्टेंबर ते नोव्हेंबरपर्यंत यापासून वेलचीचे उत्पादन मिळायला सुरुवात होते. काही ठिकाणी ही वेलचीची झाडे सहा फूटांएवढीही होतात. मात्र त्यांची खूप काळजी घ्यावी लागते. खूप महागडे पिक असल्यामुळे या वेलचीच्या झाडाला जपण्यात येते. वेलचीच्या काढणीच्या वेळी, फळांचे पुंजके असलेले कोंब देठाच्या जवळ तोडून त्यांना सूर्यप्रकाशात सुकवण्यात येते. आता या पद्धतीला आधुनिक रुप देण्यात आले आहे. वेलची सुकवण्यासाठी आधुनिक साधनांचाही वापर करण्यात येतो.

=========

हे देखील वाचा :एवढ्याश्या चारोळीची किमया भारी….

========

त्यानंतर तयार झालेली वेलची सर्वस्वी गुणकारी असते. वेलचीच्या आकारानुसार किंमत ठरते. साधारण वेलचीचा वापर हिवाळ्यात जास्त होतो. त्यामागचे कारणही तसेच आहे. वेलचीमध्ये लोह आणि व्हिटॅमिन सी जास्त असते. या ऋतुमध्ये होणार खोकला आणि कफ याला वेलचीच्या वापरामुळे थोडा अटकाव होतो. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे वेलचीच्या सेवनानं रक्तातले चांगले कोलोस्ट्रॉल वाढते असेही स्पष्ट झाले आहे. पित्त वाढल्यासही ही छोटी हिरवी वेलची गुणकारी ठरेत. एकूण सर्व गोड पदार्थात फक्त चवीसाठी वेलचीचा वापर आपल्या आई-आजी करत नाहीत तर त्यापासून मिळणारे फायदेही त्यांना माहित आहेत, म्हणूनच कितीही महाग असली तरी हिरवी वेलची (True Cardamom Demand) दिवाळीत नक्की घरी आणा आणि त्याचा वापर सर्व गोड पदार्थात करा. याचा नक्की फायदा होईल…

सई बने…


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.