पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इमरान खान यांचा एक ऑडिओ लीक झाला आहे. त्यामध्ये कथित रुपात एका महिलेसह अश्लील शब्दांमध्ये बातचीत केली जात असल्याचे ऐकायला येत आहे. सोशल मीडियात ही ऑडिओ क्लिप वेगाने व्हायरल होत आहे. कथित रुपात इमरान यांचे असे ३ ऑडिओ लीक झाल्यानंतर पाकिस्तानच्या राजकरणात खळबळ उडाली आहे. असे सांगितले जात आहे की, जनरल बाजवा आमि आयएसआय चीफ यांच्याशी पंगा घेणे इमरान खान यांना महागात पडले आहे.आयएसआयने कट रचून हा ऑडिओ इमरान यांच्या फोनवरुन मिळवला आहे. दरम्यान, हा ऑडिओ बनावट असल्याचे पीटीआयचे म्हणणे आहे.(Imran Khan Audio Leak)
ऑडिओ क्लिपमध्ये एका महिलेचा आवाज येत आहे. त्या महिलेचे नाव आयला मलिक असल्याचे सांगण्यात येत आहे. आयला पाकिस्तानातील बड्या राजघराण्यातील असून ती खासदार सुद्धा होती. पाकिस्तानी मीडियात अशी बातमी दाखवली जात आहे की, इमरान खानने आयला मलिक हिला ७० लाख रुपये दिले होते.
आयलाने सांभाळला होता इमरान खान यांच्या निवडणूकीचा प्रचार
आयलाचा जन्म ६ ऑक्टोंबर १९७० मियांवली मध्ये झाला होता. तिचे वय ५२ वर्ष आहे आणि तिने पाकिस्तानाच आपले प्राथमिक शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर ती उच्च शिक्षणासाठी परदेशात गेली. पाकिस्तानी मीडियात पत्रकार असण्यासह ही राजकीय नेता सुद्धा होती. तिचा नवरा यार मुहम्मद सुद्धा पाकिस्तानातील एका बड्या नेत्यांपैकी एक आहे. त्यांना २ मुलं आहेत.
आयला पाकिस्तानचे माजी राष्ट्रपति सरदार फारुक अहमद खान लेघारी यांची भाची आणि माजी मंत्री सुमैरा मलिक यांची बहिण आहे. आयला मलिकला पाकिस्तानातील सर्वाधिक सुंदर नेत्यांपैकी मानले जाते. ती पीटीआयच्या प्रमुख चेहऱ्यांपैकी एक आहे. त्याचसोबत पाकिस्तान असेंबलीची सदस्य सुद्धा होती. मियांवली परिसरात तिने इमरान खान यांच्यासाठी निवडणूक प्रचाराची कमान सांभाळली होती.
आयलाने इमरान खान यांना देशाचे हिरो म्हटले होते
आयला मलिक राजकीय नेता असण्यासह टीवी चॅनलवर अँकर सुद्धा होती. २००९ मध्ये आयलाच्या टीव्ही शो मध्ये इमरान खान आले होते. तेव्हा असे म्हटले जात होते की, आयला आणि इमरान खान यांच्यामध्ये दीर्घकाळ प्रेमसंबंध होते. आयला इमरान खान यांना पसंद करायची. ती एका शो दरम्यान, इमरान खान यांना आयलाने देशाचे हिरो असल्याचे सुद्धा म्हटले होते.(Imran Khan Audio Leak)
हे देखील वाचा- तालिबानने महिलांना युनिव्हर्सिटीत जाण्यासाठी घातली बंदी, अमेरिकेने दिला परिणाम भोगण्याचा इशारा
आयला २००२ ते २००७ पर्यंत पाकिस्तानी असेंबलीची सदस्य सुद्धा होती. २००७ नंतर ती इमरान खान यांच्या पक्षात सहभागी झाली. २०१३ मध्ये इमरानने तिला आपली मियांवली जागेवरुन निवडणूक लढवण्याची ऑफर दिली होती. मात्र इंटरमीडिएटची डिग्री बनावट असल्याचे आढळून आल्याने तिला निवडणूक लढवण्यास दिली नाही. आयला हिची बहिण सुमैरा त्या वेळी नवाज शरीफ यांच्या पक्षाची नेता होती. यामागे सुद्धा तिचा हात असल्याचे सांगितले जाते.