तोशखाना प्रकरणी पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इमरान खान यांच्या अटकेवरुन जोरदार गोंधळ सुरु आहे. पीटीआय अध्यक्ष इमरान खान यांना अटक करण्यासाठी जमान पार्क येथील त्यांच्या निवासस्थानी पोलीस फोर्स बोलावण्यात आली. इमरान खान यांच्या समर्थकांनी काही तास गदारोळ केल्याने त्यांनी खान यांना अटक करता आली नाही. अशातच इमरान खान यांनी असे म्हटले आहे की, ते १८ मार्चला कोर्टासमोर हजर होतील आणि याचे अश्वासन लाहौर हायकोर्टाचे अध्यक्ष इश्तियार अहमद खान देतील. (Imran Khan Arrest)
जेव्हा कोर्टाच्या आदेशावर इस्लामाबाद पोलिसांची एक टीम इमरान खान यांना अटक करण्यासाठी लाहौर मधील त्यांच्या निवासस्थानी पोहचली. याच दरम्यान, शेकडो समर्थक तेथे आले आणि त्यांनी विरोध दर्शवण्यास सुरुवात केली. यामध्ये समर्थक आणि पोलिसांमध्ये झटापट झाली. त्यानंतर तणाव ऐवढा वाढला की, समर्थकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला. ऐवढेच नव्हे तर परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी वॉटर कॅननचा ही वापर केला गेला.
या सर्व स्थितीत इमरान खान यांनी एक व्हिडिओ जारी केला आहे. त्यात त्यांनी असे म्हटले आहे की, त्यांना तुरुंगात बंद करुन त्यांची हत्या करण्याचा कट रचला जात आहे. यामागे पाकिस्तानच्या सरकारचा हात आहे. दरम्यान पाकिस्तान तहरीक-ए-इंसाफ (पीटीआय) चे अध्यक्ष इमरान खान यांनी असे सुद्धा म्हटले होते की, ते अटकेसाठी
मानसिक रुपात तयार ही आहेत.
तोशखाना प्रकरण नेमके काय?
तोशखाना, कॅबिनेटचा एका विभाग आहे. जेथे अन्य देशांतील सरकार, राष्ट्रप्रमुख आणि परदेशी पाहुण्यांसाठी अत्यंत किंमती भेटवस्तू ठेवल्या जाता. नियमाअंतर्गत एखाद्या अन्य देशाच्या प्रमुख अथवा प्रतिष्ठित व्यक्तींकडून मिळालेल्या भेटवस्तू तोशखान्यात ठेवणे गरजेचे आहे.
इमरान खान २०१८ मध्ये पाकिस्तानचे पंतप्रधान झाले. त्यांनी अरब देशांच्या दौऱ्यासह तेथील लोकांनी त्यांना महागडे गिफ्ट्स ही दिले. या व्यतिरिक्त त्यांना काही युरोपीय देशांच्या राष्ट्रप्रमुखांसह सुद्धा महागड्या भेटवस्तू मिळाल्या. त्यांनी त्या सर्व तोशखान्यात जमा केल्या होत्या. पण इमरान खान यांनी त्या सर्व भेटवस्तू अगदी कमी किंमतीत खरेदी केल्या आणि मोठ्या नफ्यात विक्री केल्या. याच संपूर्ण प्रक्रियेत बेकायदेशीर गोष्टी केल्या गेल्या. याच प्रकरणावरुन आता ते अकडले गेले आहेत. (Imran Khan Arrest)
खान यांनी निवडणूक आयोगाला असे सांगितले होते की, राज्यातील खजिन्यामधील भेटवस्तूंना २.१५ कोटी रुपयांना खरेदी केले. त्यांची विक्री करुन जवळजवळ ५.८ कोटींचा नफा झाला. या मध्ये एक Graff घड्याळ, कफलिंक, एक महागडे पेन, एक अंगठी आणि चार रोलेक्सच्या घड्याळांसह अन्य काही भेटवस्तूंचा समावेश होता.
हे देखील वाचा- पाकिस्तानची अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी अमेरिका मदत करणार
जियो न्यूजनुसार इमरान खान यांनी असे म्हटले होते की, या सर्व भेटवस्तू त्यांना खासगी रुपात दिल्या गेल्या आहेत. त्यामुळे त्याच्यावर त्यांचा हक्क आहे. खान यांनी असे ही म्हटले होते की, त्यांची मर्जी की त्या भेटवस्तू आपल्याकडे ठेवतील अथवा नाही. दरम्यान, तोशखाना वादावर इमरान खान यांचे असे म्हणणे आहे की, तोशखाना गिफ्टी विक्री करण्यावरुन विरोधकांकडून जो आरोप लावला जात आहे तो आधारहीन आहे. कारण त्यांनी जे काही तोशखान्यातून खरेदी केले त्याचा रेकॉर्ड आहे.