एकाग्रता नसेल तर खुप चिडचिडेपणा किंवा कोणत्याच गोष्टीत आपण लक्ष केंद्रित करु शकत नाही. ही समस्या लहान मुलांसह वयस्कर लोकांना ही होते. एखाद्या कामात दीर्घकाळ एकाग्रतेने काम करणे सर्वांनाच जमते असे नाही. परंतु एकाग्रता वाढवण्यासाठी काही योगासनं, मेडिटेशन करता येते. पण लहान मुलांमधील एकाग्रता वाढवणे हे आव्हानाचे काम असते. मुलांमध्ये एकाग्रता वाढवण्याचे काम केवळ पालकच करु शकतात. कारण त्यांना माहिती असे आपले मुलं कोणत्या कामात मनं लावून काम करतो आणि नाही. अशातच मुलांमध्ये एकाग्रता वाढवायची असेल तर काय करायला पाहिजे याच बद्दल आपण जाणून घेऊयात.(Improve child concentration)
-मुलांना पुरेशी झोप द्या
मुलांमध्ये जर एकाग्रता वाढवायची असेल तर त्यांना पुरेशी झोप देणे फार गरजेचे आहे. प्रयत्न करा की, तुमच्या मुलांना १० ते १२ तासांची झोप मिळणे फार गरजेचे असते. ऐवढेच नव्हे तर मुलांच्या झोपण्याचा पॅटर्न अधिक बदलू नका. मुलांना रात्री लवकर झोपण्याची आणि लवकर उठण्याची सवय लावा. त्यामुळे त्यांची एकाग्रता वाढण्यास मदत होईल.
-भावना शेअर करण्यास शिकवा
जर तुमचे मुलं कोणत्याही गोष्टीमुळे त्रस्त असेल तर त्याचे लक्ष कोणत्याही दुसऱ्या गोष्टीत लागणार नाही. अशातच मुलांसोबत भावनात्मक रुपात कनेक्ट रहा आणि त्यांच्या सोबत प्रत्येक मुद्द्यावर चर्चा करा. असे केल्याने मुलांना कोणत्याही गोष्टीमध्ये अधिक समस्या येणार नाही. त्याचे लक्ष एकाच गोष्टीवर टिकून राहिल.
-डाएटकडे लक्ष द्या
मुलांना बाहेरचे जंक फूड्स देण्याऐवजी घरातील हेल्थी आणि फ्रेश खाणं द्या. मुलांच्या डाएटमध्ये फळ, हिरव्या भाज्या, मासे, अंडी, मीट यांचा समावेश करा. त्यांना अधिक गोड पदार्थ देण्यापासून दूर ठेवा. ओमेगा थ्री फॅटी अॅसिड मुलांसाठी फार गरजेचे असते. त्यामुळे त्यांच्या खाण्यात समावेश करा. त्यांना खुप पाणी सुद्धा प्यायला द्या.(Improve child concentration)
हे देखील वाचा- दुसऱ्यांचा राग तुम्ही मुलांवर काढत असाल तर ‘अशा’ पद्धतीने हाताळा स्थिती
-व्यायाम महत्वाचा
एका शोधानुसार, मुलांमध्ये एकाग्रता वाढवण्यासाठी त्यांना व्यायाम करणे किंवा खेळण्यासाठी बाहेर पाठवा. डेन्मार्क मधील एका शोधात असे म्हटले गेले होते की, जर मुलं सकाळी शाळेत चालत जात असतील तर ही सवय त्यांच्या कामी येईल. या व्यक्तीरिक्त होम वर्क दरम्यान, मुलांना १५ मिनिटांचा ब्रेक ही एकाग्रता वाढवण्यास खुप मदत करतो.
-मेंदूला चालना देणारे गेम्स
आजकाल बाजारात असे काही मेमोरी बूस्टर गेम्स मिळतात जे मुलांची एकाग्रता वाढवण्यास मदत होते. नंबर मिसिंग गेम्स, कार्ड गेम्स तुम्ही त्यांना खरेदी करुन देऊ शकता. मुलांना गॅजेट्स ऐवजी अशा प्रकारचे मेंदूला चालना देणारे गेम्स द्या.