श्रावणामुळे सर्वत्र अतिशय पवित्र आणि सात्विक वातावरण आहे. हिंदू लोकांचा अतिशय महत्वाचा महिना म्हणून श्रावणाची ओळख आहे. श्रावणात शंकराच्या उपासनेला अनन्यसाधारण महत्व आहे. हा संपूर्ण महिना महादेवांना समर्पित असल्याने या काळात त्यांची पूजा आराधना केली जाते. या महिन्यामध्ये अनेक लोकं भगवान शंकरांच्या विविध मंदिरांमध्ये जाऊन दर्शन घेतात आणि पूजा करतात. याकाळात केलेल्या पूजेचे फळ आपल्याला नक्कीच प्राप्त होते अशी मान्यता असल्याने सर्वच लोकं या महिन्यात देवाला प्रसन्न करण्यासाठी विविध उपाय करतात. याच श्रावणाच्या निमित्ताने आज आपण शंकरांचे वाहन असलेल्या नंदीबद्दल रंजक माहिती जाणून घेऊया. (Shravan 2025)
आपण जर पाहिले तर प्रत्येक शंकराच्या मंदिरात सर्वात आधी दिसतो तो नंदी आधी त्याचे दर्शन आपण घेतो आणि त्यानंतर देवाचे दर्शन घेतो. महादेवाच्या पूजेच्या आधी नंदीची पूजा केली जाते. असे मानले जाते की जोपर्यंत नंदी प्रसन्न होत नाही तोपर्यंत भक्तांच्या प्रार्थना शिवापर्यंत पोहोचत नाहीत. मग महादेवांच्या आधी नंदीचे दर्शन का घेतात?, देवाचे दर्शन घेण्याआधी त्याच्या वाहनाचे दर्शन घेण्यामागे काय आहे माहिती? (Lord Shiva)
पुराणांमध्ये असे वर्णन केले आहे की नंदी हे माध्यम आहे ज्याद्वारे भक्तांच्या प्रार्थना भोलेनाथांपर्यंत पोहोचतात. म्हणूनच, असे मानले जाते की जोपर्यंत नंदी प्रसन्न होत नाही तोपर्यंत तुमचे शब्द शिवापर्यंत पोहोचत नाहीत. नंदी हा भारतीय संस्कृतीत केवळ एक वाहन नाही तर एक पवित्र प्राणी आहे आणि शिवगणांमध्ये त्याचे एक प्रमुख स्थान आहे. त्याला धर्म आणि शक्तीचे प्रतीक मानले जाते. म्हणूनच आधी नंदीची पूजा करून त्याला प्रसन्न करतात त्यानंतर शंकरांचे दर्शन घेतात. (Latest Marathi Headline)
नंदी हा शिवाचा महान भक्त आहे. शिव मंदिरात नंदीचे दर्शन घेताना आपण त्याच्या कानात आपली इच्छा सांगतो. मान्यता आहे की, जर आपण नदीच्या कानात आपली इच्छा सांगितली तर ती लवकर पूर्ण होते. कायम महादेव तपश्चर्येतच असतात, त्यामुळे भक्तांकडून देवाच्या तपात कोणताही अडथळा येऊ नये म्हणून नंदी भक्तांच्या इच्छा ऐकण्याचे काम करतात आणि त्या महादेवांपर्यंत पोहचवतात देखील. म्हणूनच लोक मंदिरात जातात आणि आपली इच्छा सांगतात. आम्ही तुम्हाला सांगतो की नंदीला भगवान शिवाचे द्वारपाल म्हणतात. महादेवाच्या दर्शनापूर्वी नंदीचे दर्शन होते. (Marathi News)
नंदीच्या जन्माची आणि महादेवाचे वाहन होण्याची एक आख्यायिका सांगितली जाते, शिलाद मुनी आजन्म ब्रह्मचर्याचे पालन करत होते. पण एकदा त्यांच्या मनात विचार आला, की यामुळे माझा वंश राहणारच नाही. म्हणुन त्यांनी इंद्रांकडून पुत्र मागितला. परंतु इंद्र त्यांची ही पुत्रप्राप्तीची इच्छा पुर्ण करू शकत नव्हते. इंद्रांनी, शिलाद मुनींना सांगितले, “तुम्ही शंकराची आराधना करा, तुमची इच्छा ते पुर्ण करतील.” शिलाद मुनींनी तपश्चर्या करून भगवान शंकर यांना प्रसन्न केले आणि पुत्रप्राप्तीची आपली इच्छा सांगितली. (Top Marathi Headline)
“तुमची इच्छा नक्कीच पुर्ण होईल” असं महादेवाने सांगितले. एके दिवशी आपल्या आवारात चालत असतांना त्यांना वाटेत एक नवजाच बाळ सापडलं. जेव्हा ते बाळाजवळ गेले त्यावेळी आकाशवाणी झाली, की “याचे संगोपन करं. हा मुलगा तुझं आयुष्य सुख-समृद्धीने भरून देईल” शिलाद मुनींनी या मुलाचे नाव नंदी ठेवले. (Todays Marathi Headline)
नंदी लहानपणापासूनच अत्यंत हुशार आणि शिवाचा परमभक्त होता. प्रत्येक विद्येत नंदीने निपुणता मिळवली होती. एकदा शिलादी मुनींच्या आश्रमात दोन साधु आले. शिलाद मुनी आणि नंदीने या दोन्ही साधूंची उत्तम व्यवस्था केली. पुढच्या मार्गाला जाण्यापूर्वी दोन्ही साधुंनी शिलाद मुनींना “शतायुषी भवः” असा आशीर्वाद दिला. परंतु नंदीला आशीर्वाद देतांना ते थोडे कचरले. शिलाद मुनींनी हे ओळखले आणि त्याचे कारण दोन्ही साधूंना विचारले, तर साधु म्हणाले,”आम्ही नंदीला शतायुषी होण्याचा आशीर्वाद नाही देऊ शकत कारण त्याच आयुष्य कमी आहे.’ (Latest Marathi News)
हे ऐकून शिलाद मुनींना खूप दुःख झाले. नंदीला सगळा प्रकार वडिलांकडून कळला. आपले आयुष्य कमी आहे हे ऐकून काळजी करण्यापेक्षा नंदी जोरजोरात हसत म्हणाला, “मी सुद्धा तुमच्याप्रमाणे शंभोमहादेवाला प्रसन्न करणार आणि अल्पावधीचे विधीलिखीत बदलण्यास सांगेन”. नंदीच्या या तपश्चर्येवर महादेव प्रसन्न झाले आणि त्यांनी वर मागण्यास सांगितला. तेव्हा नंदी म्हणाला, “मला तुमच्याजवळ राहायचं आहे ते पण कायमस्वरूपी.” तेव्हा शंभूमहादेवाने सांगितले, “तु माझे वाहन बनशील आणि समस्त गणांचा मुख्य ही तुच राहशील.” तेव्हा पासुन नंदी बैलाच्या रूपात महादेव जवळच असतो. (Top Marathi Stories)
==============
हे देखील वाचा : Haritalika Vrat : जाणून घ्या हरितालिका व्रताचा मुहूर्त आणि पूजा विधी
Ganesh Chaturthi : गणेश चतुर्थी कधी आहे? जाणून घ्या मुहूर्त आणि शुभ वेळ
===============
नंदी हा शंकरांच्या गाभाऱ्याबाहेर आहे कारण तो पूर्णतः सावध आहे. सुस्त किंवा निष्क्रिय बसलेला नाहीये. अत्यंत सक्रीय, पूर्णतः जागरूक आणि जीवनाने भरलेला, पण कोणतीच अपेक्षा किंवा मागणी करत नाहीये. तो ध्यान करत बसला आहे. नंदीचे मुख कायम भगवान शंकराकडे आहे. त्यांची ही मुद्रा महादेवावर अटळ लक्ष आणि भक्तीचे प्रतीक आहे. त्यांचे लक्ष फक्त त्यांच्या उपासकाकडेच असते. नंदीला आपली इच्छा सांगतांना ती नंदीच्या डाव्या कानात सांगावी. प्रार्थना करतांना दोन्ही हातांनी आपला चेहरा झाकून घ्या जेणेकरून कोणीही तुमची प्रार्थना ऐकू शकणार नाही. नंदीच्या कानात प्राथना सांगितल्यानंतर त्यांना नैवेद्य दाखवावा. (Social News)
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics