Home » Sindoor : सिंदूर लावण्याचे धार्मिक फायदे

Sindoor : सिंदूर लावण्याचे धार्मिक फायदे

by Jyotsna Kulkarni
0 comment
Sindoor
Share

भारताने ऑपरेशन सिंदूर करून पाकिस्तानला हादरवून सोडले आहे. २२ एप्रिल रोजी पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने वायुसेनेच्या मदतीने पाकिस्तानमधील अतिरेकी ठिकाणांना उध्वस्त केले आणि आतंकवाद्यांच्या खात्मा केला. पहालगाममधील हल्ल्यामध्ये अनेक महिलांच्या डोळ्या देखत त्यांच्या नवऱ्याला गोळी मारली गेली आणि त्यांचे कुंकू पुसले. याचाच बदला म्हणून भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवले आणि यशस्वी देखील केले. या घटनेनंतर ‘सिंदूर’ चांगलाच चर्चेत आला आहे. (Sindoor)

सिंदूर, कुंकू म्हणजे शुभ शकुन. आपल्या शास्त्रात सांगितलेल्या सोळा अलंकारांपैकी सिंदूर किंवा कुंकू हे सर्वात महत्त्वाचे आहे. हिंदू धर्मातील विवाह संस्कार तर कुंकुवाशिवाय कायम अपूर्ण असतात. महिलांच्या डोक्याला लावलेला सिंदूर हे त्यांच्या विवाहित असण्याचे प्रतीक मानले आहे. याशिवाय कुंकू मांगल्याचे, लाभाचे देखील प्रतीक मानले जाते. सनातन धर्मातील सर्वच पूजा विधींमध्ये कुंकू आवश्यक असते. (Marathi News)

धार्मिक कार्यात कुंकूचा उपयोग केला जातो. हिंदू सनातन धर्मात कुंकवाला अनन्य साधारण महत्त्व आहे. सुवासिनी महिलांच्या सौभाग्याची खून असलेले हे कुंकू महिलांसाठी खूपच महत्वाचे समजले जाते. लग्नानंतर महिला भांगेत कुंकू लावतात. असे केल्याने जोडीदाराप्रती असलेला आदर, प्रेम आणि समर्पण दिसून येते. आपल्या पुराणांमध्ये, धर्मामध्ये कुंकवाचे धार्मिक फायदे सांगितले आहेत, जाणून घेऊया… (Marathi Top News)

वैवाहिक आयुष्यातील महत्व
हिंदू परंपरेत कुंकू हे सौभाग्याचे प्रतीक मानले जाते. पतीच्या दिर्घआयुष्याशी देखील भांगेत भरलेल्या कुंकवाचा संबंध आहे. कुंकवाचा वापर देव -देवतांच्या पूजेत प्रकर्षाने केला जातो. असे मानले जाते, की कुंक लावल्याने सर्व प्रकारच्या समस्या दूर होतात आणि आयुष्यात आनंद आणि समृद्धी येते.

Sindoor

गणपतीला कुंकू अर्पण करतात
सिंदूर, कुंकू केवळ देवी किंवा हनुमानाच्या पूजेसाठी वापरला जात नाही, तर गणपतीच्या पूजेमध्ये देखील कुंकवाला मोठे महत्व आहे. असे मानले जाते की गणपतीला कुंकू लावल्यास आपल्या आयुष्यातील सर्व दु:ख दूर होतात. त्यामुळे सुख आणि समृध्दी मिळते. (Top Trending NEws)

​नकारात्मकतेपासून मुक्तता
माणसाच्या नकारात्मक भावना दूर करण्यासाठी कुंकवाचा वापर केला जातो. तेलामध्ये कुंकू मिसळून त्याची पुरचुंडी तयार करून ती घराच्या प्रवेशद्वारावर लावावी. असे सलग ४० दिवस केल्याने कुटुंबातील सदस्यांच्या मनातील नकारात्मकता दूर होते, अशी मान्यता आहे. (Social News)

छठ पूजेतील वापर
युपी, बिहार मधील अतिशय पवित्र अशा छठ पूजेमध्ये देखील कुंकवाला मोठे महत्व आहे. या पवित्र सणामध्ये देखील कुंकूचा विशेष वापर केला जातो. या दिवशी, छठी देवीची पूजा केली जाते, स्त्रिया त्यांच्या नाकापासून भांगेपर्यत कुंकू लावतात. हे कुंकू जितके जास्त लावले जाईल तितके पतीचे आयुष्य जास्त असते अशी मान्यता आहे. (Top Marathi News)

हनुमानाला प्रसन्न करण्यासाठी
मंगळवारी आणि शनिवारी हनुमानाची पूजा करायला विशेष महत्व आहे. या पूजेमध्ये हनुमानाला कुंकू वाहिल्यास जीवनातील सर्व अडथळे दूर होतात आणि सुख समृद्धी मिळते. यामागे एक मान्यता देखील आहे. असे सांगितले जाते की, एकदा हनुमानाने सीता मातेला कुंकू लावताना पाहिले आणि हे कुंकू लावण्याचे कारण विचारले असता, त्यांनी सांगितले की, त्या श्रीरामाच्या दीर्घायुष्यासाठी हे कुंकू लावत आहे. मग हनुमानजींनी विचार केला की चिमूटभर कुंकू लावल्याने, अर्पण केल्याने भगवान श्री रामाचे वय वाढते, तर मग त्यांनी त्यांच्या संपूर्ण शरीरावर कुंकू लावले. तेव्हापासून हनुमानांना कुंकू अर्पण केले जाऊ लागले.(Marathi Latest News)

Sindoor

सिंदूर लावण्याचे फायदे
* सिंदूर लावल्याने रक्तदाब नियंत्रणात राहतो. त्याचबरोबर मन शांत राहते.
* सिंदूर लावल्याने रक्ताभिसरण वाढते.
* सिंदूरमध्ये पारा धातू असतो, ज्यामुळे चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होतात.

=======

हे देखील वाचा : Operation Sindoor : ऑपरेशन सिंदूरने पाकिस्तानला धडकी!

Operation Sindoor : अटलजी यांच्या उत्तराने पाकिस्तानची चांगलीच तंतरली होती

=======

घरी कुंकू कसे बनवावे?
हळद, चुना आणि पाणी यांचा वापर करून सिंदूर घरी बनवता येतो. या तिन्ही गोष्टी समान प्रमाणात घेऊन त्या एकत्र करा. हे मिश्रण उन्हात वाळवण्यासाठी ठेवा आणि मिश्रण सुकल्यावर त्याची मिक्सरमध्ये वाटून बारीक पावडर बनवा. झाले की कुंकू तयार.


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.