Home » जाणून घ्या मंगळसूत्राबद्दलची खास माहिती

जाणून घ्या मंगळसूत्राबद्दलची खास माहिती

by Jyotsna Kulkarni
0 comment
Information of Mangalsutra
Share

आपली भारतीय पर्यायाने हिंदू संस्कृती खूपच प्रगल्भ आणि समृद्ध आहे. या संस्कृतीमध्ये कोणतीच अशी गोष्ट नाही जी विनाकारण आहे. प्रत्येक गोष्टीला एक धार्मिक, अध्यात्मिक आणि वैज्ञानिक अर्थ लाभला आहे. यामुळेच आपला देश, आपला धर्म जगात वेगळा ठसा उमटवताना दिसतो. आता हेच बघ आपल्या धर्मात लग्नाला अनन्यसाधारण महत्व आहे.

लग्न, त्यातले प्रत्येक विधी याला एक वेगळा अर्थ आहे. त्यामुळेच बहुतकरून लोकं कोर्ट मॅरेज करण्यापेक्षा वैदिक लग्न करण्यासाठी प्राधान्य देतात. याच लग्नात प्रत्येक नववधू घालण्यात येणारा महत्वाचा दागिना म्हणजे ‘मंगळसूत्र’. सौभाग्याचा लेणं असलेले मंगळसूत्र म्हणजे सर्वच विवाहित स्त्रियांचा आवडता आणि महत्वाचा दागिना आहे. आता अनेक लोकं हे मंगळसूत्र फक्त एक फॅशन म्हणून किंवा दागिना म्हणून देखील घालताना दिसतात.

मात्र मंगळसूत्र हा फक्त एक दागिना नाही तर ती एक भावना आहे. जिला धार्मिक आणि वैज्ञानिक असे विशेष महत्व आहे. मंगळसुत्रा शिवाय कोणतेही लग्न मान्य होत नाही. देवा-ब्राम्हणाच्या, वडीलधाऱ्यांच्या साक्षीने हे मंगळसूत्र लग्नात वर आपल्या वधूला सगळ्यांसमोर घालतो. ज्यानंतर महिला ते आपल्या गळ्यातच ठेवतात. हे मंगळसूत्रच प्रत्येक विवाहित महिलेची ही खून मानली जाते. मंगळसूत्र घालण्याचा संबंध थेट आपल्या पतीच्या दीर्घायुष्याशी जोडला जातो. त्यामुळे ते नीट टिकावे याकडे प्रत्येक स्त्री कटाक्षाने लक्ष देते.

Information of Mangalsutra

अगदी जुन्या प्राचीन काळापासून स्त्रियांच्या मंगळसूत्र या दागिन्याला विशेष महत्त्व आहे. मंगळसूत्र पतीचे आयुष्य वाढवते. सोबतच ते धारण केल्याने पती-पत्नीमध्ये प्रेम आणि बांधिलकी टिकून राहते. मंगळसूत्र म्हणजे काय तर दोन पदरी दो-यामध्ये काळे मणी गुंफलेले असतात. यात मध्यभागी 4 छोटे मणी आणि 2 लहान वाट्या असतात. या वाट्यांचा देखील एक अर्थ आहे. एक पती अथवा सासरची आणि दुसरी पत्नीची म्हणजेच माहेरची. तर दोन दोरे म्हणजे पती-पत्नीचे बंधन आणि 4 काळे मणी म्हणजे धर्म, अर्थ, काम, मोक्ष हे चार पुरुषार्थ.

मंगळसूत्राला संस्कृतमध्ये ‘मांगल्यतंतू’ असेही म्हणतात. आपल्या इतिहासकारांच्या मते मंगळसूत्र घालण्याची सुरुवात ही ६ व्या शतकात झाली. मोहेंजोदारोच्या उत्खननात या मंगळसूत्राचे अवशेष सापडले सापडल्याची माहिती आहे. मंगळसूत्र घालण्याची सुरुवात भारतात सर्वात प्रथम दक्षिण भारतात झाली असे सांगितले जाते. तामिळनाडू आणि केरळ या प्रदेशात ‘ताळी’ नावाचा एक सौभाग्य अलंकार वधूच्या गळ्यात बांधण्याची प्रथा आहे. त्यावरूनच ‘मंगळसूत्र’ बांधण्याची प्रथा सुरू झाली असावी. पुढे काळ जसा बदलत गेला तशी भारतासह इतर देशांमध्ये ही परंपरा सुरू झाली.

आता या मंगळसूत्र घालण्याचे नक्की काय फायदे आहे ते पाहू.

विवाहित स्त्रीने मंगळसूत्र घातल्यास तिच्या वैवाहिक जीवनात सकारात्मक आणि शुभ परिणाम दिसून येतात. शिवाय या मंगळसूत्र घालण्याचे आरोग्यादायी फायदे देखील बरेच आहे.

  • मंगळसूत्र हे भगवान शिव आणि देवी पार्वती यांचे प्रतीक मानले जाते. त्यामुळे ते धारण केल्याने भगवान शिव आणि माता पार्वतीचा आशीर्वाद मिळतो असा समज आहे.
  • मंगळसूत्र हे ९ मण्यांनी बनवलेले आहे, जे देवीच्या ९ रूपांचे प्रतीक मानले जाते. विवाहित महिला मंगळसूत्र घातल्यानंतर नेहमी उत्साही राहतात. याशिवाय मंगळसुत्र वाईट नजरेपासूनही संरक्षण करते.
  • मंगळसूत्र धारण केल्याने विवाहित महिलांचे शरीर शुद्ध होते.

====================

हे देखील वाचा :  एक डान्सिंग आजार, जो नाचवतो आणि जीव घेतो…

====================

  • दोन सोन्याच्या वाट्या आणि काळ्या मण्यांनी बनवलेल्या मंगळसूत्राचे अनेक महत्त्व आहे. सोन्याचे दोन वाट्या सत्वगुणांशी संबंधित आहेत.
  • हृदययाच्या संबंधित समस्या दूर ठेवण्यासाठी देखील मंगळसूत्र घालणे लाभदायक मानले जाते.  मंगळसूत्रांमुळे रक्ताभिसरण सुधारते आणि शरीरातील रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासही मदत होते. याच कारणामुळे ते छातीजवळ येईल या लांबीचे घातले जाते.
  • यासोबतच मंगळसूत्रातील तीन गाठी वैवाहिक जीवनातील तीन मुख्य गोष्टी दर्शवतात. पहिली गाठ ही एकमेकांबद्दल आदर, दुसरी गाठ ही आपल्या पालकांबद्दलचे प्रेम आणि तिसरी गाठ देवाबद्दल आदर ठेवण्याची आठवण करून देते.

Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.