हिवाळ्याचे दिवस सुरू झाले आहेत. यामुळे वेगवेगळे आजार या दिवसात मागे लागतात. अशातच आजारांचा सामना करण्यासाठी आपली रोगप्रतिकारक शक्ती मजबूत असणे अत्यंत गरजेचे असते. आजीच्या बटव्यातील काही गोष्टींच्या मदतीने आपण हिवाळ्यातील काही आजारांवर रामबाण उपाय करू शकतो. यामुळे रोगप्रतिकारक शक्ती देखील मजबूत होते. याचबद्दल जाणून घेऊया अधिक…. (Immune System Boost Remedies)
होममेड कफ सीरप
थंडीच्या दिवसात वातावरणात गारवा असल्याने सर्दी-खोकल्याची समस्या उद्भवते. अशातच घरच्या घरी होममेड कफ सीरप तुम्ही तयार करू शकता. यासाठी लिंबाचा रस, मध, दालचिनी आणि कोमट पाण्याचा वापर करावा लागेल. हे कफ सीरम तुम्हाला कफची समस्याच नव्हे तर रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यासही मदत करेल.
होममेड कफ सीरपमध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी, फॉस्फोरस, कॅल्शिअम आणि मॅग्नेशिअम असते. जे रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करते. हिवाळ्यात जर तुम्हाला रोगप्रतिकारक शक्ती वाढवायची असल्यास या कफ सीरपचा वापर करू शकता.
जिऱ्याचे पाणी
जिऱ्याचे पाणी तयार करण्यासाठी कोमट पाण्यात जिरं, गुळ, काळी मिरी मिक्स करावी. यामुळे सर्दीची समस्या दूर होऊ शकते. याशिवाय जिऱ्याच्या पाण्यामुळे शरीरातील पांढऱ्या पेशी वाढून रोगप्रतिकारक शक्तीही वाढली जाते.
गुळात लोह, सेलेनिअम, मॅग्नेशिअम आणि झिंक याचे प्रमाण अधिक असते. जे रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करतात. याशिवाय काळी मिरी आणि जिऱ्यामध्ये व्हिटॅमिन सी आणि ए असते जे शरीरातील रक्ताचा पुरवठा सुरळीत करण्यात मदत करते. (Immune System Boost Remedies)
तूप आणि लसूण
तूपाचे सेवन केल्याने रोगप्रतिकारक शक्ती सुधारली जाते. तूप हे एक ब्यूटायरेट संपृक्त सोर्स असून याचे नियमित सेवन केल्याने रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते. याशिवाय लसूणच्या सेवनाने शरीरातील टी सेल्स वाढण्यास मदत होते. यामुळे तुम्ही कमी आजारी पडता. लसूण आणि तूप मिक्स करून खाल्ल्याने पचनक्रिया सुधारली जाते. याशिवाय सांधेदुखीची समस्याही कमी होते.
टीप : या लेखात माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. ‘gajawaja.in’ याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी डॉक्टर, वैद्य किंवा तज्ञांशी संपर्क साधावा.
आणखी वाचा : वीगन मिल्क की गाईचे दूध, आरोग्यासाठी काय फायदेशीर?