जेव्हा तुम्ही एखादी गाडी घेता तेव्हा त्याचा इंजिन क्रमांक आणि चेसिस क्रमांक हा त्याची खास ओळख असते. तो बदलला जाऊ शकत नाही. त्याचप्रमाणे मोबाईल फोनसाठी सुद्धा एक असा क्रमांक असते जो त्याला अन्य फोनच्या तुलनेत वेगळता बनवला जातो. यामुळे कोणत्याही फोनची ओळख करता येणे सोप्पे होते. जेव्हा एखाद्याचा फोन चोरी होतो तेव्हा पोलीस आयएमआय क्रमांक मागतात. त्यामुळे फोनची ओळखण पटवता येते. तर IMEI क्रमांक म्हणजे काय? केवळ एका क्रमांकावरुन पोलिस चोरांचा शोध कसा घेतात याबद्दल अधिक जाणून घेऊयात.(IMEI Number)
IMEI नंबर म्हणजे काय?
आयएमईआय हा एक युनिक क्रमांक आहे. जो प्रत्येक फोनसाठी दिला जातो. जेणेकरुन मोबाईल हा अधिकृतरित्या विक्री केला जाईल. इंटरनॅशनल मोबाईल एक्विपमेंट आयडेंटीटी हा एक युनिक क्रमांक आहे. ज्याचा वापर मोबाईल नेटवर्कवर डिवाइसची ओळख पटवण्यासाठी केला जातो. यामध्ये १५ नंबर्स असतात आणि ते तुमच्या फोनच्या विशिष्ट ओळखीच्या आधारावर असतात. जर तुमचा फोन चोरी झाल्यास तुम्ही पोलिसात एफआयआर दाखल केल्यानंतर तुम्हाला आयएमईआय क्रमांक विचारला जातो. किंवा स्थानीय कायद्यानुसार तुमचा फोनचे नेटवर्क वापरणे किंवा त्यावरुन कॉल करण्यासाठी बंदी घातली जाऊ शकते. आयएमईआयला ब्लॅकलिस्ट केल्यानंतर हे शक्य होते. जर तुमच्याकडे डुअल सिम फोन असेल तर तुमच्याकडे दोन आयएमआय क्रमांक असणार. म्हणजेच दोन्ही सिमकार्डसाठी दोन आयएमईआय असणार.
‘या’ पद्धतीने तपासून पाहता येतो आयएमईआय क्रमांक
जेव्हा फोनचा आयएमईआय क्रमांक हा फोनच्या बॅटरीच्या येथे लिहिलेला असतो. या व्यतिरिक्त जेव्हा तुम्ही फोन खरेदी करता त्यासोबत ही तुम्हाला तो दिला जातो. परंतु आयएमआय क्रमांक तपासून पहायचा असेल तर तुम्ही *#06# क्रमांक डायल केल्यानंतर तुमच्या स्क्रिनवर लगेच तुमच्याकडे असलेल्या डिवाइसचा आयएमईआय क्रमांक दाखवला जाईल.(IMEI Number)
हे देखील वाचा- तुम्हाला पॅन कार्डच्या आधारावर ही मिळते पर्सनल लोन, जाणून घ्या कसा कराल अर्ज

पोलीस कशाप्रकारे मदत करतात?
कोणताही फोन हरवल्यास आयएमईआय क्रमांकावरुन तो ट्रेस करता येतो. जर तुमच्या फोनमधील सिमकार्ड बदलल्यास तरीही तुमचा आयएमईआय क्रमांक तोच राहतो. अशातच पोलीस सेल्युलर सेवा देणाऱ्या कंपनीची मदत घेत फोनचा शोध घेऊ शकतात. जर तुमच्या फोनचा आयएमईआय क्रमांक बदलण्याचा प्रयत्न केल्यास तर तो काम करणे बंद करेल. या क्रमांकाशिवाय कोणताही फोन करता येत नाही किंवा येणे सुद्धा बंद होऊ शकते. पोलिसांच्या मते चोरीच्या प्रकरणात फोनचा आयएमईआय क्रमांक ब्लॉक केला जातो. काही वेळा फोन ट्रॅक करुन पोलीस चोरांना पकडतात.
काय असतात आव्हाने?
पोलिसांसाठी एक आव्हान सुद्धा आहे की, चोरांनी जर फोन फॉर्मेट करण्यास सुरुवात केली असेल तर किंवा चोर त्याची ऑपरेटिंग सिस्टिम बदलतात. काही सॉफ्टवेअर असे असतात जे फोनचा आयएमईआय क्रमांक बदलतात. अशातच पोलिसांना काही समस्यांचा सामना करावा लागतो.