Home » उन्हाळ्यात टॅनिंगपासून हवी असेल सुटका, तर मसूरच्या डाळीने करा चेहरा स्वच्छ

उन्हाळ्यात टॅनिंगपासून हवी असेल सुटका, तर मसूरच्या डाळीने करा चेहरा स्वच्छ

by Team Gajawaja
0 comment
Masoor dal face pack
Share

उन्हाळ्यातील सर्वात मोठी समस्या म्हणजे घाम येणे. घामामुळे धूळ- माती आणि घाण चेहऱ्याला चिकटते. त्याच वेळी, सूर्यप्रकाशामुळे त्वचेवर टॅनिंग होते. त्यामुळे चेहरा निस्तेज दिसू लागतो. त्याचबरोबर त्वचाही कोरडी होते. उन्हाळ्यात चेहऱ्यावरील टॅनिंगपासून सुटका हवी असेल आणि त्वचेवर ग्लो हवा असेल, तर मसूर डाळीचा फेस पॅक लावा. हा फेस पॅक केवळ चेहऱ्याचे टॅनिंग दूर करणार नाही, तर त्याने त्वचेला अनेक फायदेही होतील. चला तर मग जाणून घेऊया की, चेहऱ्यावर मसूर डाळीचा वापर कसा करावा.(Masoor dal face pack)

मसूर डाळ आणि दूध एकत्र करून बनवा फेस पॅक

मसूर डाळ चेहऱ्यावर लावल्याने, चेहऱ्याचा रंग उजळतो. त्यामुळे मसूर कच्च्या दुधात भिजवून ठेवा. नंतर ती बारीक करून पेस्ट बनवा. कच्चे दूध आणि मसूरचा हा फेस पॅक चेहऱ्यावर लावून ठेवा. चेहरा सुकायला लागल्यावर त्यावर हलक्या हातांनी चोळा आणि पाण्याने धुवा. काही आठवड्यांच्या सतत वापरानंतर, चेहऱ्याचा रंग उजळेल.(Masoor dal face pack)

=====

हे देखील वाचा – घरातच बनवा याप्रकारे नाईट क्रीम, सकाळी मिळेल चमकदार चेहरा

=====

सूर्यप्रकाशामुळे होणारे टॅनिंग करा दूर

जर सूर्यप्रकाशामुळे चेहऱ्यावर टॅनिंग झाले असेल, तर एक चमचा मसूर पावडर घ्या आणि त्यात अंड्याचा पांढरा भाग मिसळून पेस्ट बनवा. तसेच त्यात लिंबाचा रस घाला. हा पॅक बनवून चेहऱ्यावर लावा. चेहरा सुकल्यावर थंड पाण्याने धुवा. चेहऱ्याचे टॅनिंग दूर होईल.(Masoor dal face pack)

जर तुम्हाला सतत पार्लरला जाणे आवडत नसेल, तर मसूर डाळ तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकते. मसूरपासून बनवलेला फेस पॅक सहज चेहरा उजळवू शकतो. फक्त तो फेस पॅक आठवड्यातून दोन ते तीन वेळा वापरणे आवश्यक आहे.(Masoor dal face pack)

नैसर्गिक स्क्रब

तुम्ही मसूरचे स्क्रबही तयार करू शकता. हे स्क्रब बनवण्यासाठी एक चमचा मसूर पावडर मधात मिसळा. सोबत थोडी हळदही घाला. आता ते व्यवस्थित मिक्स करा आणि स्क्रब म्हणून चेहऱ्यावर वापरा. यात गुलाबजल मिसळून लावल्याने डेड स्किन सहज निघून जाईल आणि चेहरा नैसर्गिकरीत्या चमकदार दिसेल.(Masoor dal face pack)


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.