अमेरिकेचे माजी अध्यक्ष बिल क्लिंटन यांच्यासोबत त्यांची सेक्रेटरी मोनिका लेविस्कीं हिचे नाव जोडले गेले होते. अमेरिकेच्या राजकारणात तेव्हा एकच खळबळ उडाली होती. बिल तेव्हा अमेरिकेच्या अध्यक्षपदावर होते. अशामुळे अमेरिकेचे अध्यक्षपद बदनाम झाल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला. या प्रकरणानंतर बिल यांना अमेरिकेच्या अध्यक्षपदावरुन पायउतार व्हावे लागले होते. आता असेच काही प्रकरण अमेरिकेमध्ये गाजत आहे. फक्त हे अमेरिकेचे माजी अध्यक्ष आहेत आणि त्यांना पुढची अध्यक्षपदाची निवडणूक लढवायची आहेत. अर्थात अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी एका पोर्न स्टारला धमकवल्याचे प्रकरण सध्या जगभरात चर्चेचा विषय ठरले आहे. एका कथिक प्रकरणात पोर्न स्टार स्टॉर्मी डॅनियल्सला पैसे देऊन गप्प बसण्याचा सल्ला वजा धमकी ट्रम्प यांनी दिली होती. त्यानंतर ट्रम्प निवडणूक लढले आणि अमेरिकेचे अध्यक्ष झाले. मात्र आता ट्रम्प (Donald Trump) यांनी आपल्याला धमकवल्याचे पोर्न स्टार स्टॉर्मी डॅनियल्स हिने उघड केले असून हा अमेरिकेच्या कायद्याप्रमाणे गुन्हा आहे. याप्रकरणी 76 वर्षाच्या ट्रम्पवर आरोप ठेवण्यासाठी ज्युरींनी मतदान करुन आपला होकार दिला आहे. त्यातून अमेरिकेच्या अध्यक्षांवर खटला चालवण्याची नामुष्की आली आहे. अमेरिकेच्या इतिहासातील अशी पहिलीच घटना आहे. डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी हे सर्व आरोप फेटाळले असून पुढच्या निवडणुकीसाठी अडचण निर्माण करण्यासाठी हा विरोधकांचा डाव असल्याचे म्हटले आहे.

अमेरिकेच्या इतिहासात प्रथमच माजी राष्ट्राध्यक्षांवर फौजदारी खटला दाखल होणार आहे. ट्रम्प (Donald Trump) यांच्यावर 2016 च्या अध्यक्षीय प्रचारादरम्यान आपले लैंगिक संबंध लपवण्यासाठी पॉर्न अभिनेत्री स्टॉर्मी डॅनियल्सला पैसे दिल्याचा आरोप आहे. त्यासाठी त्यांनी निवडणूक खर्चात हेराफेरी केली. अमेरिकेच्या कायद्याप्रमाणे ही फसवणूक असून यासाठी तुरुंगवासही होऊ शकतो. स्टॉर्मी डॅनियल्सने निवडणूक प्रचारादरम्यान आपल्यासोबतच्या लैंगिक संबंधाचे रहस्य उघड करू नये, अशी ट्रम्प यांची इच्छा होती. त्यासाठी ट्रम्प यांनी स्टॉर्मीला धमकावलेही. तसेच तिला मोठी रक्कम दिली. या रक्कमेसाठी निवडणूक खर्चात हेरफेर केली. या सर्वांसंबंधात न्यूयॉर्क ग्रँड ज्युरीने ट्रम्प यांच्यावर खटला चालवण्याची परवानगी दिली आहे. यानंतर ट्रम्प (Donald Trump) यांच्यावर अटकेचा धोका वाढला आहे. एका अहवालानुसार ट्रम्प यांच्यावर 30 हून अधिक आरोप आहेत. या निर्णयामुळे 2024 मध्ये पुन्हा राष्ट्रपती होण्याच्या ट्रम्प यांच्या आशेला धक्का बसल्याचे सांगण्यात येते. ट्रम्प यांच्यावर फौजदारी खटला दाखल झाल्यानंतर काय होईल…अमेरिकेच्या कायद्यानुसार अटकेदरम्यान त्यांना हातकडी लावली जाईल का? ते पुढील राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढवू शकतात का? या प्रश्नांवर आता चर्चा होऊ लगाली आहे. मुळात यासाठी हे सर्व प्रकरण कधी झाले हे जाणून घेऊया. डोनाल्ड ट्रम्प अमेरिकन अध्यक्षपदाची निवडणूक लढवत असतांना त्यांची आणि स्टॉर्मीची ओळख झाली. 2011 मध्ये ‘इन टच’ मासिकाला दिलेल्या मुलाखतीत स्टॉर्मीने या गोष्टी उघड केल्या. मात्र ट्रम्प यांचे वकील मायकल कोहेन यांनी ही मुलाखत प्रसिद्ध होऊ दिली नाही. यानंतर धमकवण्यात आल्याचे स्टॉर्मीचे म्हणणे आहे. दरम्यान 2016 च्या अध्यक्षीय निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प रिपब्लिकन पक्षाकडून अध्यक्षपदाचे उमेदवार बनले. त्यावेळी स्टॉर्मीला सुमारे 1 कोटी रुपये पाठवण्यात आले, आणि गप्प रहाण्याचा सल्ला देण्यात आला. पुढे स्टॉर्मीची मुलाखत एका न्यूज चॅनलाला झाली आणि तिने या प्रकरणाचा जाहीर खुलासा केला. तेव्हाही हे सर्व आरोप ट्रम्प यांनी फेटाळले होते. मुख्य म्हणजे या सर्वप्रकरणात वापरलेला पैसा हा निवडणूक खर्चाचा भाग असल्याचे दाखवण्यात आले होते. अमेरिकेच्या कायद्यानुसार हा गंभीर गुन्हा आहे. आणि आता त्याच गुन्ह्यात ट्रम्प यांच्यावर अटकेची तलवार टांगली गेली आहे. डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांना अटक झाल्यास प्रथम त्यांच्या बोटांचे ठसे घेतले जातील. गुन्हेगारांप्रमाणे त्यांचा फोटोही काढण्यात येईल.
=======
हे देखील वाचा : एडल्ट स्टार स्टॉर्मी डेनियलन्सने डोनाल्ड ट्रंप यांच्याबद्दल केले ‘हे’ खुलासे
=======
अमेरिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेणारी व्यक्ती या प्रक्रियेतून जाणार आहे. ट्रम्प यांना हातकडीही लावली जाऊ शकते. अमेरिकेत, अशा प्रकरणांमध्ये, बहुतेक दोषींना त्यांच्या पाठीमागे हातकड्या लावल्या जातात. ट्रम्प तुरुंगात गेल्यास त्यांच्यासाठी वेगळा सेल बनवला जाऊ शकतो. कायदेशीर प्रक्रियेदरम्यान, त्यांच्या संरक्षणाखाली तैनात असलेले यूएस सीक्रेट सर्व्हिसचे कर्मचारी प्रत्येक टप्प्यावर ट्रम्प यांच्यासोबत असतील. ट्रम्प (Donald Trump) यांच्यावर न्यूयॉर्क ग्रँड ज्युरीने खटला चालवण्यास परवानगी दिली आहे. अशा परिस्थितीत ट्रम्प यांच्यासमोर आत्मसमर्पण करण्याचा पर्याय आहे. तसे न केल्यास त्यांना अटक होऊ शकते. स्वतः ट्रम्प हे मंगळवारी न्यायालयात पोहचणार आहेत. न्यायालयात 10 ते 15 मिनिटांच्या दीर्घ सुनावणीत त्यांच्यावर असलेल्या आरोपांची माहिती दिली जाईल. या प्रकरणात ट्रम्प दोषी आढळल्यास त्यांना 4 वर्षांपर्यंत तुरुंगवास होऊ शकतो. अर्थात या प्रकरणात मुख्य चर्चा होत आहे ती ट्रम्प 2024 मध्ये अध्यक्षपदाची निवडणूक लढवू शकतात का…तर अमेरिकेच्या घटनेनुसार या प्रकरणी ट्रम्प यांना शिक्षा किंवा दंड झाला तरी त्यांच्या अध्यक्षपदाची निवडणूक लढविण्यावर कोणताही परिणाम होणार नाही. अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष होणारी व्यक्ती तुरुंगात असतानाही अध्यक्षपदाची जबाबदारी पार पाडू शकते, अशी अमेरिकन कायद्यात तरतूद आहे. आता मंगळवारी अमेरिकन न्यायालयात काय होत आहे याकडे सर्व जगाचे लक्ष लागले आहे. डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी आपल्या समर्थकांना मोठ्या संख्येनं जमण्याचे आवाहन केले आहे. आता ट्रम्प येथे कुठला ड्रामा करतात हे पाहण्यासारखे असले.