Home » फेरफटका चक्क अंतराळातला असला तर…

फेरफटका चक्क अंतराळातला असला तर…

by Team Gajawaja
0 comment
space travel
Share

फिरायला कोणाला आवडत नाही,आणि हा फेरफटका चक्क अंतराळातला असला तर…अंतराळात जाऊन चंद्र ता-यांना बघण्याचं स्वप्न अनेकांच असलं तरी हे स्वप्न प्रत्यक्षात साकारणं कठीण आहे.  मात्र आता काही मोजक्या तंत्रज्ञानकंपन्यांनी ही अंतराळातली सफर(space travel) चालू केली आहे.  पण ही सफर वाटते तशी सोप्पी नाही.  यासाठी करोडो रुपये मोजावे लागतात.  मात्र भारतातील प्रवाशांसाठी खूशखबर आहे,  भारतातही एक कंपनी अंतराळ सफर (space travel)सुरु करण्याच्या प्रयत्नात आहे.  2025 मध्ये चालू होणा-या या अंतराळ सफरीसाठी कोट्यावधी नाही, पण काही लाखांचे तिकीट घ्यावे लागणार आहे. भारताच्या स्पेस ऑरा एरोस्पेस टेक्नॉलॉजी कंपनीचा हा महत्त्वकांक्षी प्रकल्प असून यासाठी मध्यप्रदेश राज्याला प्राधान्य देण्यात आले आहे.  तीन वर्षानंतर या अंतराळ सफरी भारतातून सुरु झाल्यास त्याला जगभरातून मोठा पाठिंबा मिळण्याची शक्यता आहे.  

अंतराळ सफरी (space travel)या परदेशात सध्या स्टेटस सिम्बॉल झाल्या आहेत.  त्यासाठी इलॉन मस्कची कंपनी स्पेसेक्स, जेफ बेझोज आणि ब्लू ओरीजीन या कंपन्यांमध्ये चढाओढ आहे.  मात्र या कंपन्यांमध्ये लवकरच एका भारतीय कंपनीचीही भर पडणार आहे.  अवकाश पर्यटनाच्या तयारीत असलेली ही कंपनी म्हणजे,  स्पेस ऑरा एरोस्पेस टेक्नॉलॉजी.  नुकत्याच डेहराडून येथे झालेल्या विज्ञान प्रदर्शनात या कंपनीनं अंतराळ प्रवासासंदर्भातील आपले मॉडेल सादर केले होते.  त्यानुसार फुगे आणि कॅप्सूलच्या माध्यमातून  अंतराळात प्रवास करता येणार आहे.  अंतराळ प्रवासाचे स्वप्न 2025 पर्यंत प्रत्यक्षात येणार असून यासाठी तब्बल 50 लाख तिकीट असणार आहे.  मुंबईस्थित स्पेस ऑरा एरोस्पेस टेक्नॉलॉजी या कंपनीला या महत्त्वकांक्षी योजनेसाठी इस्त्रोही मदत करत आहे.  

या स्वदेशी अवकाश पर्यटन प्रकल्पाचे नाव SKAP-1 आहे.  प्रकल्पासाठी इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन म्हणजेच इस्रो आणि टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च म्हणजे, टीआयएफआर यांची मदत होणार आहे.  स्पेस ऑरा एरोस्पेस टेक्नॉलॉजी कंपनी SKAP-1 नावाची स्पेस कॅप्सूल बनवत आहे. कॅप्सूल 10 फूट लांब आणि 8 फूट रुंद असेल. त्याला फुग्याच्या साहाय्याने उडवण्यात येईल.   ही कॅप्सूल 35 किमी पर्यंत जाणार आहे.  यातून पर्यटक अवकाशात पूर्णपणे जाणार नाहीत.   पण अवकाशातून पृथ्वीचे दृश्य दिसेल अशा जागी नक्की जाईल.  ही कॅप्सूल खाली आणण्यासाठी पॅराशूटचा वापर करण्यात येणार आहे.

स्पेस ऑरा एरोस्पेस टेक्नॉलॉजी कंपनीचे संस्थापक आकाश पोरवाल यांनी डेहराडून येथे झालेल्या विज्ञान प्रदर्शनात SKAP-1 चे मॉडेल सादर केले.  अनेक भारतीयांनी या प्रदर्शनाला भेट दिली आणि प्रकल्पाबाबत कंपनीचे कौतुक केले.  या कॅप्सूलमधून 6 प्रवासी प्रवास करतील.  कॅप्सूलमध्ये जीवरक्षक आणि प्रवाशांना आवश्यक माहिती देणारी व्यवस्थाही असेल. अवकाशात सोडणारा फुगा हेलियम किंवा हायड्रोजन वायूने ​​भरलेला असेल.   अर्थात हा सगळा प्रकल्प अत्यंत खर्चिक आहे.  त्यामुळे, या अंतराळ प्रवासाचे तिकीट काही लाखांत असणार आहे.  स्पेस ऑरा एरोस्पेस टेक्नॉलॉजी कंपनीने अद्याप या तिकीटाची किंमत निश्चित केली नाही.  एक तासाच्या अंतराळ दौऱ्याच्या तिकिटासाठी सुमारे 50 लाख रुपये मोजावे लागतील, असा अंदाज आहे.  2025 पर्यंत अंतराळ पर्यटन सुरू होईल असा अंदाज आहे.  यासाठी मध्य प्रदेश किंवा कर्नाटकमधून कॅप्सूल लॉन्च करण्याचा कंपनीचा विचार आहे.  त्यातही मध्यप्रदेशच्या इंदौरमधील वातावरण या प्रकल्पासाठी योग्य असल्याचा कंपनीचा मानस आहे, त्यामुळे इंदौरचा या प्रकल्पासाठी जास्त विचार करण्यात येत आहे.(space travel)

=========

हे देखील वाचा : आपल्या मुलाला रस्त्यावर झोपण्यासाठी एकटे सोडते आई, कारण ऐकून व्हाल हैराण

=========

अंतराळ सफर (space travel)करण्यासाठी जगभरात अवघ्या तीन कंपन्या कार्यरत आहेत.   यापैकी पहिली रिचर्ड ब्रॅन्सनची कंपनी व्हर्जिन गॅलेक्टिक आहे. या कंपनीनं पहिले अवकाश उड्डाण 11 जुलै 2021 रोजी केले.  व्हर्जिन गॅलेक्टिकच्या तिकिटाची किंमत $450,000 म्हणजेच 3 कोटी 67 लाख रुपये आहे. जेफ बेझोसची कंपनी ब्लू ओरिजिन ही सुद्धा अंतराळाची सफर घडवते.   या कंपनीने पहिले अवकाश उड्डाण 20 जुलै 2021 रोजी झाले होते.  ब्लू ओरिजिनच्या तिकिटाची किंमत $1.25 मिलियन म्हणजेच 10 कोटी आहे. अर्थात तिसरी व्यक्ती आहे, इलॉन मस्क.  इलॉन मस्क यांची स्पेसएक्स आहे.  स्पेसएक्सद्वारे 15 सप्टेंबर 2021 रोजी प्रथम अंतराळ सफर घडवण्यात आली. यातील तिकीटाची किंमत $55 दशलक्ष म्हणजेच 450 कोटी होती.   आता चीनही अशा अंतराळ सफरींची योजना आखत असून पुढच्या वर्षात चीनतर्फेही अंतराळ सफर चालू होईल असा अंदाज आहे. स्पेस ऑरा एरोस्पेस टेक्नॉलॉजी ही कंपनी आता इस्त्रोच्या सहकार्यानं भारतीयांना अंतराळ सफर घडवण्यासाठी तयारी करत आहे.  यासाठी आधी तीन चाचण्याही घेण्यात येणार आहेत.

सई बने…


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.