Home » जगातील सर्वात श्रीमंत राजघराण्यात हि-यांवरुन लढाई !

जगातील सर्वात श्रीमंत राजघराण्यात हि-यांवरुन लढाई !

by Team Gajawaja
0 comment
Idol's Eye Diamond
Share

अमीर शेख तमीम बिन हमाद अल थानी यांच्या नेतृत्वाखाली, कतार हे जगातील सर्वात श्रीमंत राजघराणे म्हणून ओळखले जाते. या राजघराण्याची संपत्ती किती आहे, याची मोजमाप सुरु केली तर त्यासाठी अनेक वर्ष लागतील. सुमारे 8,000 सदस्य असलेल्या या राजघराण्याच्या प्रत्येक सदस्याकडे अलिशान सुविधा असणारे भव्य महल आहेत. ऑलिम्पिक व्हिलेज, हॅरॉड्स डिपार्टमेंट स्टोअर आणि न्यूयॉर्कची एम्पायर स्टेट बिल्डिंग, सोन्याचा मुलामा दिलेल्या गाड्या, विमानं, बोटी, हॉटेल, सोनं, चांदी, हिरे, मोती अशी अगणित संपत्ती या कतारच्या राजघराण्याकडे आहे. एवढी संपत्ती असूनही या राजघराण्यातील वारसांचे समाधान मात्र झालेले नाही. कारण आता हे राजघराणे त्यांच्याकडे असलेल्या हि-यांची मालकी नेमकी कुणाकडे असावी यासाठी भांडत आहे. कोटय़वधी रुपयांच्या हिऱ्यांवरून सुरु झालेला हा वाद चक्क लंडनच्या कोर्टापर्यंत गेला आहे. श्रीमंतीसाठी प्रसिद्ध असलेल्या कतारच्या राजघराण्यातील दोन सदस्यांमधील मौल्यवान हिऱ्यावरून सुरू असलेले युद्ध न्यायालयात पोहोचल्यानं सामान्यांनी मात्र त्यातून मजा घ्यायला सुरुवात केली आहे. (Idol’s Eye Diamond)

ज्या राजघराण्याचे महल, सुवर्णांनं सजलेले आहेत, त्या राजघराण्यातील हि-यांच्या मालकीचा हा वाद पाहून त्यांच्यावर चोहोबाजुंनी टिकाही होत आहे. एवढी संपत्ती असूनही समाधान न झालेल्या या राजघराण्यातील सदस्यांची मालमत्ता कशी, कुठे आणि किती आहे, याचीच मोजदाद त्यानिमित्त नेटकरी करु लागले आहेत. ज्या हि-यांच्या मालकीवरुन कतारच्या अमीर शेख तमीम बिन हमाद अल थानी यांच्या नेतृत्वाखालील कुटुंबियांमध्ये वाद सुरु आहे, ते हिरे लाखो डॉलर्सच्या किंमतीचे आहेत. कतारचे शासक शेख तमीम बिन हमाद अल थानी यांचे चुलत भाऊ शेख हमद बिन अब्दुल्ला आणि माजी सांस्कृतिक मंत्री शेख सौद बिन मोहम्मद अल थानी यांच्यात हा वाद उफाळून आला आहे. शेख हमद बिन अब्दुल्ला अल थानी यांनी माजी सांस्कृतिक मंत्री शेख सौद बिन मोहम्मद अल थानी यांच्या नातेवाईकांविरोधात हि-यांच्या मालकीवरुन गुन्हा दाखल केला आहे. हमाद बिन अब्दुल्ला यांच्या मालकीची कंपनी 70 कॅरेटचे हिरे खरेदी करण्याचा अधिकार मागत आहे. कारण शेख हमद बिन अब्दुल्ला अल थानी हे एक प्रसिद्ध कला संग्राहक आहेत. (International News)

त्याच्या संग्रहात जगातील अनेक मौल्यवान आणि दुर्मिळ वस्तूंचा समावेश आहे. यातीलच हि-यांच्या खरेदी-विक्रीवरुन राजघराण्यात फूट पडली आहे, आणि हे सर्व प्रकरण लंडनच्या उच्च न्यायालयात गेले आहे. शेख हमद बिन अब्दुल्ला अल थानी यांची कंपनी QIPCO कडे ‘आयडॉल्स आय’ नावाचा हिरा आहे. या हिऱ्याची किंमत लाखो डॉलर्समध्ये आहे. 1997 ते 2005 दरम्यान कतारचे सांस्कृतिक मंत्री असलेले शेख सौद यांनी हा हिरा त्यांना दिला होता. शेख सौदही प्रख्यात कला संग्राहक म्हणून ओळखले जात होते. त्यांनी 2000 च्या दशकाच्या सुरुवातीला आयडॉल आय नावाचा हिरा खरेदी केला होता. त्याचवेळी त्यांनी एक करारही केला की, त्यांच्या कुटुंबाची इच्छा असल्यास शेख हमद बिन अब्दुल्ला अल थानी यांची कंपनी QIPCO हा हिरा खरेदी करू शकते. शेख सौद यांचे 2014 मध्ये निधन झाल्यावर या लाखो डॉलर्समध्ये किंमत असलेल्या हि-याच्या मालकीवरुन राजघराण्यात वाद सुरु झाला. (Idol’s Eye Diamond)

=====

हे देखील वाचा :  युद्ध झालं होतं एका फळासाठी !

========

आता QIPCO ला हा हिरा 10 दशलक्ष डॉलर्समध्ये विकत घ्यायचा आहे आणि या मुद्द्यावर, QIPCO च्या वकिलांचे म्हणणे आहे की अल थानी फाउंडेशनच्या वकिलांनी 2020 च्या पत्रात आयडॉल आय हिरा 10 दशलक्ष डॉलर्समध्ये आता या हि-याची किंमत दुप्पटीनं वाढली आहे. त्यामुळे QIPCO ला हिरा विकण्यास शेक सौद यांच्या वारसदारांचा विरोध आहे. तसेच त्यांनी पाठवलेल्या पत्राबाबतही एक खुलासा समोर आला आहे. हे पत्रच चुकून पाठवल्याचे हि-याच्या वारसदारांचे म्हणणे आहे. त्यामुळे या हि-यावरुन कतारच्या राजघराण्यात फूट पडली आहे. शेवटी हे प्रकरण लंडनच्या उच्च न्यायालयात गेले आहे. हा वाद सुरु असतांना कतारच्या राजघराण्याकडे किती संपत्ती आहे, याचा आलेखच समोर येत आहे. एवढी सगळी संपत्ती असलेले हे राजघराणे हि-याच्या मालकीवरुन भांडत आहे, अशी उपरोधक टिका करण्यात येत आहे. कतारचे शाही कुटुंब सोन्याने मढवलेल्या दोहा रॉयल पॅलेसमध्ये राहते. यात 15 विविध राजवाडे आणि 500 हून अधिक कारसाठी एक कार पार्क आहे. त्यांचा फ्लोटिंग पॅलेसही प्रसिद्ध आहे. यात हेलिकॉप्टर पॅडसह अन्य अत्याधुनिक सुविधा आहेत. (International News)

सई बने


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.