Home » आयडॉलचे नवे संचालक डॉ. प्रकाश महानवर

आयडॉलचे नवे संचालक डॉ. प्रकाश महानवर

by Correspondent
0 comment
Share

मुंबई विद्यापीठाच्या दूर व मुक्त अध्ययन संस्थेच्या संचालक पदासाठी नुकत्याच ऑनलाईन मुलाखती घेण्यात आल्या होत्या. यामध्ये मुंबईच्या रसायन तंत्रज्ञान संस्थेचे प्राध्यापक डॉ. प्रकाश महानवर यांची आयडॉलच्या पूर्णवेळ संचालकपदी निवड करण्यात आली. डॉ. प्रकाश महानवर यांनी आयडॉलचा पदभार स्वीकारला आहे. ते पॉलिमर तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात तज्ज्ञ म्हणून ओळखले जातात.

डॉ. प्रकाश महानवर हे  शिक्षण क्षेत्रात २८ वर्षांपासून कार्यरत असून मुंबईतील रसायन तंत्रज्ञान संस्थेतील पॉलिमर आणि सरफेस इंजिनिअरिंग या विभागात प्राध्यापक म्हणून कार्यरत होते. तसेच तेथे ते मानव संसाधन आणि विकास विभागाचे अधिष्ठाता म्हणूनही कार्यरत होते. डॉ.प्रकाश महानवर यांनी केमिकल व प्लास्टिक टेक्नॉलॉजी मधून बीएससी व एमएस्सी केले असून पॉलिमर क्षेत्रात पीएचडी केली आहे. 



त्यांच्या नावे पॉलिमर क्षेत्रात  संशोधनपर ५ राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पेटंट्स असून २ पेटंट्ससाठी अर्ज केलेला आहे. त्यांनी आजपर्यंत ११२ संशोधनपर शोधनिबंध लिहिले असून यातील अनेक शोधनिबंध आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्ध झालेले आहेत. त्यांनी आजपर्यंत ३२ संशोधनपर प्रकल्प पूर्ण केले आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली २१ विद्यार्थ्यांनी पीएचडी पूर्ण केली असून ९ विद्यार्थी पीएचडी  करीत आहेत.

 पेंट, कोटिंग, पॉलिमर प्रोसेसिंग, इमल्शन, पिगमेंट व इतर क्षेत्रात जर्मनीची स्टॅनवाक, चीनची बीची केम. या आंतरराष्ट्रीय व  एशियन पेंट्स, कान्साई नेरोलॅक पेंट्स, फिनोलेक्स, क्लॅरियांट, रोसारी बायोटेक, आरसीएफ, बीएसएनएल यासारख्या अशा अनेक राष्ट्रीय मोठ्या, मध्यम व लहान उद्योगासाठी त्यांनी सल्लागार म्हणूनही कार्य केले आहे. त्यांनी अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये सहभाग घेतला आहे. तसेच ते या क्षेत्रातील अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संस्थांचे सदस्य आहेत. महाराष्ट्र अकॅडेमी ऑफ सायन्स व द कलर सोसायटीचे ते फेलो आहेत. प्लास्टिक रिसायकल व प्लास्टिक डिस्पोजल जाणीव जागृती अशा अनेक सामाजिक उपक्रमांमध्ये ते सहभागी असतात.
तसेच आयडॉलच्या उपसंचालकपदी डॉ. मधुरा कुलकर्णी यांची निवड करण्यात आली. त्या पूर्वी आयडॉलमध्येच सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत होत्या. त्या आयडॉलच्या वाणिज्य व व्यवस्थापन शाखेच्या प्रभारी म्हणून कार्य करीत होत्या. 

आयडॉलमध्ये विविध उपक्रम राबविणार
कोविड १९ च्या कालावधीत दूर व मुक्त शिक्षणाचे महत्व वाढले आहे. या पार्श्वभूमीवर आयडॉलमध्ये संचालक व उपसंचालक पदाच्या विद्यापीठाने नियुक्त्या केल्या आलेत. नवनियुक्त संचालक डॉ. प्रकाश महानवर यांनी आयडॉलमध्ये विविध उपक्रम राबविण्याचा मानस व्यक्त केला आहे. यामध्ये कौशल्यावर आधारित नविन पदविका व प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरु करणे, विद्यार्थ्यांसाठी विविध ऑनलाईन सुविधा उपलब्ध करणे. आयडॉलचे ऑटोमेशन करणे, विविध महाविद्यालयात आयडॉलची केंद्रे सुरू करणे, शैक्षणिक मार्गदर्शनासाठी आभासी वर्ग सुरू करणे असे अनेक शैक्षणिक व विद्यार्थ्यांसाठी उपक्रम राबविण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला आहे.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.