Home » Ice Bath : आइस बाथ आरोग्यासाठी फायदेशीर आहे का? वाचा सविस्तर

Ice Bath : आइस बाथ आरोग्यासाठी फायदेशीर आहे का? वाचा सविस्तर

by Team Gajawaja
0 comment
Ice Bath
Share

Ice Bath : आइस बाथ म्हणजे बर्फाच्या थंड पाण्यात शरीराला काही काळ बुडवून ठेवणे. खरंतर, आइस बाथ ही एक अशी थेरपी आहे जी अलीकडे खेळाडू, फिटनेस प्रेमी आणि सेलिब्रिटींमध्ये खूपच लोकप्रिय झाली आहे. आइस बाथचा मुख्य उद्देश म्हणजे शरीरातील सूज कमी करणे, स्नायूंना आराम देणे, थकवा दूर करणे आणि पुनर्प्रक्रियेला गती देणे. अनेक खेळाडू आणि व्यायाम करणारे लोक तीव्र वर्कआउटनंतर लगेचच आइस बाथ घेतात, जेणेकरून स्नायूंवर ताण कमी होईल आणि वेदना नियंत्रणात राहतील. मात्र, आइस बाथ सुरक्षित आहे का असा प्रश्न प्रत्येकालाच पडतो. पण आइस बाथ हे प्रत्येक व्यक्तीच्या आरोग्यस्थितीवर आणि योग्य पद्धतीने घेतल्या जाणाऱ्या काळजीवर अवलंबून असते.

थंड पाण्यात शरीर बुडवणे ही गोष्ट सहज वाटली तरी ती योग्य काळजी घेतल्याशिवाय धोकादायक ठरू शकते. शरीराचं तापमान झपाट्याने कमी झाल्यास हायपोथर्मिया होण्याची शक्यता असते, विशेषतः जर बर्फाचे पाणी खूप थंड असेल किंवा त्यात खूप वेळ राहिलं गेलं तर. सामान्यतः 10 ते 15 मिनिटे हा कालावधी आइस बाथसाठी योग्य मानला जातो. त्यापेक्षा जास्त वेळ पाण्यात बसल्यास शरीराचे स्नायू गोठण्याची, रक्तदाब अनियमित होण्याची किंवा श्वासोच्छवासात अडचण येण्याची शक्यता असते. हृदयविकार, मधुमेह, रक्तदाबाचे त्रास असलेल्या व्यक्तींनी आइस बाथ घेण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे अत्यावश्यक आहे.(Health Care Tips)

Ice Bath

Ice Bath

सुरक्षिततेच्या दृष्टीने, आइस बाथ घेण्याआधी आणि नंतर काही विशेष काळजी घेणे महत्त्वाचे ठरते. उदाहरणार्थ, पाण्याचे तापमान 10-15 अंश सेल्सिअसच्या दरम्यान असावे. शरीराला अचानक थंड पाण्यात न घालता, हळूहळू पायांपासून सुरुवात करून पूर्ण शरीर पाण्यात घालावे. चेहरा आणि डोके शक्यतो पाण्याबाहेर ठेवावं. बाथ दरम्यान शरीरात कंप होणं सामान्य असलं तरी श्वास घेण्यात अडचण जाणवली, चक्कर आली, किंवा अत्यधिक थंडी वाटली तर बाथ त्वरित थांबवायला हवा.(Ice Bath)

============

हे ही वाचा : 

Corona : कोरोनाच्या वाढणाऱ्या संसर्गापासून बचावासाठी उपाय

Post Workout Tips : वर्कआउटनंतर मसल्स पेन होत असल्यास काय करावे?

============

थोडक्यात सांगायचं झालं, तर आइस बाथ एक प्रभावी आणि फायदेशीर थेरपी ठरू शकते, परंतु ती योग्य पद्धतीने आणि वैद्यकीय सल्ल्यानुसारच घ्यावी. यामुळे स्नायूंची थकवा कमी होतो, सूज उतरतं आणि शारीरिक पुनर्प्रक्रिया वेगाने होते, पण कोणत्याही थेरपीप्रमाणेच ती योग्य काळजी आणि मर्यादांमध्येच प्रभावी ठरते.(Latest Marathi News)


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.