इंडियन कौन्सिल फॉर कल्चर रिलेशन (ICCR) आणि फेल्म युनिव्हर्सिटीकडून ३ आणि ४ मे रोजी ‘चित्रपट आणि सॉफ्ट पॉवर’ या विषयांवर दोन दिवसीय सेमिनारचे आयोजन करण्यात आले आहे. या संदर्भात माहिती देताना, आईसीसीआरचे (ICCR) अध्यक्ष आणि राज्यसभा सदस्य असलेल्या डॉ. विनय सहस्रबुद्धे यांनी पत्रकारांना सांगितले की, “या परिसंवादाच्या आयोजनाचा उद्देश भारतीय चित्रपट आणि आंतरराष्ट्रीय संबंधातील व्यावसायिक आणि अभ्यासकांना एकत्र आणून आजच्या काळातील अत्यंत महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणे हा या सेमिनारचा किंवा परिसंवादाचा मुख्य उद्देश आहे.”
चित्रपट आणि सॉफ्ट पॉवर यांच्याकडून आयोजित होणाऱ्या या परिसंवादाचे उद्घाटन महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि चित्रपट निर्माता शेखर कपूर यांच्या हस्ते होणार आहे. तर या परिसंवादाच्या समारोपाचे अध्यक्षपद सूचना आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर भूषवणार आहे, या परिसंवादाला प्रसिद्ध गीतकार प्रसून जोशी देखील उपस्थित असणार आहे. (ICCR)
तत्पूर्वी ‘चित्रपट आणि सॉफ्ट पॉवर’ यांच्यासंदर्भात आलेल्या निवेदनात सांगण्यात आले की, ‘भारतीय चित्रपटांची पोहोच आजच्या घडीला अतिशय व्यापक आणि मोठी असून, भारतामध्ये भारतीय चित्रपटांमध्ये सांस्कृतिक संवेदनशीलता विकसित करण्याची क्षमता आहे. भारतीय समुदायाचा वाढत जाणारा विस्तार, माहिती आणि तंत्रज्ञानाचा मोठ्या अप्रमाणावर होणार वापर हे दर्शवते की, परदेशातील लोकांकडे भारतीय चित्रपटांना समजून घेण्याची क्षमता आहे. बर्याच देशांतील लोकांच्या आणि सरकारच्या विचारांवर प्रभाव टाकण्यासाठी आणि अभौतिक भांडवल निर्माण करण्यासाठी चित्रपट आता एक महत्त्वाचे माध्यम बनत चालले आहे.’ (ICCR)
=====
हे देखील वाचा – अबब! ‘लाल सिंग चड्ढा’ सिनेमासाठी आमिरला देण्यात आली तब्बल ‘इतक्या’ कोटींची फी, आकडा ऐकून नक्कीच डोळे होतील पांढरे
=====
‘चित्रपट आणि सॉफ्ट पॉवर’ यांच्याकडून आयोजित होणाऱ्या या परिसंवादामध्ये ‘सिनेमॅटिक वसाहतवाद: वेस्टर्न लेन्सद्वारे जागतिक आणि भारतीय सिनेमा’, ‘परदेशात भारताच्या कल्पनेबद्दल जागरूकता पसरवण्याचे माध्यम म्हणून भारतीय चित्रपट’, ‘भारतीय चित्रपट संगीताचा जागतिक प्रभाव’, ‘प्रादेशिक सिनेमा आणि त्याचा जागतिक प्रभाव’, ‘परदेशी प्रेक्षक आणि प्रगत तंत्रज्ञानासह भारतीय सिनेमाची कनेक्टिव्हिटी’ आदी विषयांवर चर्चासत्रे घेतली जाणार आहेत.(ICCR)