Home » भारताला मिळणार पहिली हायड्रोजन ट्रेन, जाणून घ्या खासियत

भारताला मिळणार पहिली हायड्रोजन ट्रेन, जाणून घ्या खासियत

by Team Gajawaja
0 comment
Hydrogen Train
Share

अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी यंदाच्या वर्षाच्या अर्थसंकल्पात रेल्वेसाठी २.४१ कोटींची तरतूद केली आहे. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी रेल्वेसाठी जाहीर करण्यात आलेल्या तरतुदीवर आनंद व्यक्त करत हायड्रोजन ट्रेनची (Hydrogen Train) घोषणा केली आहे. त्यांनी असे म्हटले की, एक हायड्रोजन ट्रेन तयार असून ती येत्या डिसेंबर पर्यंत त्याची सेव सुरु होईल.

हायड्रोजनवर चालणाऱ्या सर्व ट्रेन मेक इन इंडिया योजनेअंतर्गत भारतात तयार करण्यात येणार आहेत. हायड्रोजन ट्रेनची सुविधा सुरु झाल्यास देशात हजारो नोकऱ्यांची संधी उपलब्ध होणार आहे. हायड्रोजन ट्रेन हायइड्रोजन इंधनावर चालणार आहे. ही ट्रेन कार्बन डायऑक्साइडचे उत्सर्जन अजिबात करणार नाही. येणाऱ्या पुढील हायड्रोजन संचलित ट्रेन्सला वंदे मेट्रो ट्रेनच्या नावाने ओळखले जाणार आहे.

हायड्रोजन ट्रेन म्हणजे काय?
हायड्रोजनच्या माध्यमातून चालणाऱ्या ट्रेन्सला हायड्रेल असे म्हटले जाते. सोप्प्या भाषेत बोलायचे झाल्यास हायड्रोजन ट्रेन म्हणजे जी हायड्रोजनचा वापर इंधनाच्या रुपात करते. म्हणजेच या ट्रेनमध्ये हायड्रोजनचे इंधन वापरले जाणार आहे. हायड्रोजन ट्रेन कार्बन डायऑक्साइड, नाइट्रोजन ऑक्साइड किंवा पार्टिकुलेट मॅटर सारखे घातक गॅसचे उत्सर्जन करणार नाही. म्हणजेच हायड्रोजन ट्रेन जुन्या ट्रेडिशनल ट्रेनच्या तुलनेत इंवॉरमेंट फ्रेंडली असतात. त्याचसोबत हायड्रोजन गॅस हा नैसर्गिक पद्धतीने तयार केला जातो. त्यामुळे स्पष्ट आहे की, हायड्रोजन ट्रेन भारतीय रेल्वेला ग्रीन इंडिया बनवणार आहेत. मात्र यासाठी लागणारा खर्च हा खुप आहे.

डिझेल इंजिनच्या तुलनेत अधिक महागडी ही ट्रेन
रिसर्च आणि रेटिंग एजेंसी आयसीआरएच्या मते, भारतात ग्रीन हायड्रोजनची किंमत जवळजवळ ४९२ रुपये प्रति किलोग्रॅम आहे. याच कारणामुळे इंधन सेल बेस्ड हायड्रोजन इंजिनाच्या संचलनासाठीचा खर्च डिझेलच्या तुलनेत जवळजवळ २७ टक्के अधिक असणार आहे.

अश्विनी वैष्णव यांनी या प्रकरणी माहिती देत असे म्हटले की, भारतीय रेल्वे उत्तर रेल्वे कार्यशाळेत हायड्रोजन इंधन आधारित ट्रेनचे प्रोटोटाइप बनवत आहे. ज्याचे परिक्षण हरियाणात सोनीपत-जींद खंडावर केले जाणार आहे. वंदे भारत ट्रेनच्या डेवलपमेंटसह जवळजवळ १२७५ स्थानक पुन्हा उभारली जाणार आहेत. जेणेकरुन या ट्रेनला कोणत्याही प्रकारचे नुकसान होणार नाही.

रेल्वेसाठी सरकारचे बजेट मदतशीर
गौतम सोलारचे प्रबंध निर्देशक गौतम मोहनका यांनी ग्रीन इंडियासाठी बजेट द्यावे यासाठी मागणी केली होती. त्यांनी असे म्हटले होते की, पेट्रोलियम आणि नैसर्गिक गॅस मंत्रालय ग्रीन इंडिया ट्रेनसाठी ३५००० कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यास मान्य झाले आहेत. मोहनका यांनी असे ही म्हटले होते की, अर्थ मंत्र्यांनी २०२३० पर्यंत ५ एमएमटीच्या वार्षिक उत्पादन लक्ष्याला प्राप्त करण्यासाठी मदत करण्यासाठी १९००० कोटी रुपयांवर सहमती दर्शवली होती. जी यंदाच्या वर्षातील भारताची पहिली हायड्रोजन ट्रेन सुरु करण्यासाठी भारतीय रेल्वेसाठी उचलण्यात आलेले पहिले पाऊल आहे.

भारताच्या कोणत्या राज्यात चालणार या ट्रेन
हायड्रोजनच्या माध्यमातून चालणारी वंदे मेट्रो ट्रेनची सुरुवात दार्जिलिंग हिमालयन रेल्वे, नीलगिरी माउंटेन रेल्वे, कालका शिमला रेल्वे वाई, माथेरान हिल रेल्वे, कांगडा घाट, बिलमोरा वाघई आणि मारवाड-देवगढ मडरिया सारख्या ठिकाणी चालणार आहे. रेल्वे मंत्र्यांनी असे म्हटले की, नंतर या ट्रेनचा विस्तार देशातील विविध राज्यात ही केला जाणार आहे. (Hydrogen Train)

हायट्रोजन किंवा ग्रीन ट्रेनची खासियत
हायड्रोजन संचलित ट्रेनचा आवाज कमी येतो. त्याचसोबत दुसऱ्या ट्रेनच्या माध्यमातून निघणारे डिझेलच्या धुरामुळे नुकसान आणि दुषित हवा सुद्धा पसरणार नाही. यामधून निघणारा धुर नाइट्रोजन ऑक्साइड उत्सर्जित करत नाही. नाइट्रोजन ऑक्साइड आरोग्यासाठी अत्यंत धोकादायक गॅस मानला जातो.

हे देखील वाचा- सरकार महिन्याला देणार ३ हजार रुपयांची पेंन्शन, केवळ जमा करावे लागणार ५५ रुपये

जर्मनीत आधीपासूनच या ट्रेनची सुविधा
जर्मन सरकार एजेंसीने देशात हायड्रोजन ट्रेन चालवण्यासाठी काही योजना सुरु केल्या होत्या. या योजनांवर आता पर्यंत ९२ मिलियन खर्च केला गेला आहे. जर्मनीत २०१८ मध्ये क्षेत्रीय रेल्वे लाइनवर हायड्रोजन संचलित ट्रेनचे परिक्षण सुरु करण्यात आले होते. त्यानंतर जर्मनीने डिझेलवर चालणाऱ्या आपल्या सर्व १२६ ट्रेन टप्प्याटप्प्याने सुरु करण्याची योजना तयार केली आहे. सध्या मोठ्या शहरासाठी जर्मन सरकारने २७ ट्रेन चालवणार आहे.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.