Hyderabad Tourist Places : पर्यटनाच्या दृष्टीने हैदराबाद येथे काही ऐतिहासिक इमारती आणि ठिकाणे आहेत, ज्या पाहण्यासाठी परदेशातून नागरिक येतात. येथील महाल आणि इमारतींचे सौंदर्य पर्यटकांना आपल्याकडे आकर्षित करते. भारतात बॉलिवूडनंतर सर्वाधिक मनोरजंनात्मक व्यवसाय म्हणजे टॉलिवूडला मानले जाते. हैदराबाद येथे काही अशी ठिकाणे आहेत जे हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतीक असल्याचे मानले जाते. आज आपण हैदराबादमधील अशाच काही ठिकाणांबद्दल जाणून घेणार आहोत.
चारमीनार
हैदराबादमधील चारमीनार पर्यटकांसाठी प्रसिद्ध ठिकाणांपैकी एक आहे. चारमीनार म्हणजे येथे चार मीनार आहेत. पण फार कमी जणांना माहितेय की, चारमीनारच्या संरचनेमागे खासियत आहे. ही इमारत जगभरात प्रसिद्ध आहे. हैदराबाद येथे फिरण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांकडून नेहमीच गर्दी केली जाते.
हयात बख्शी मस्जिद
हैदराबादमधील हयात बख्शी मस्जिद सर्वाधिक खास आहे कारण ती पाचवे सुल्तान अब्दुल्ला कुतुब शाह यांनी उभारली आहे. ही मस्जिद 1672 मध्ये गोवळकुंडावर शासन करणाऱ्या सुल्तान अब्दुल्ला यांनी तयार केली होती. अब्दुल्ल कुतुब शाह यांच्या आईचे नाव हयात बख्शी बेगम होते. यामुळेत या क्षेत्राचे नाव हयातनंगर ठेवण्यात आले. ही मस्जिद विजयवाडा रोडवर आहे. येथे पोहोचण्यासाठी बसचा पर्याय उपलब्ध आहे. (Hyderabad Tourist Places)
तारामती बारादरी
गोवळकुंडाजवळील ऐतिहासिक इमारत पाहण्यासाठी पर्यटकांची गर्द होते. तारामती बारादरीचे बांधकाम वर्ष 1880 च्या दशकात कुली कुतुब शाह यांच्या काळात झाले होते. या महलाचे नाव एका नर्तकीच्या नावावरुन ठेवण्यात आले आहे. तारामती एक नर्तकी होती, जी राजाला फार पसंत होती. या इमारतीचे बांधकाम फारसी वास्तुकला शैलीत करण्यात आले आहे. या इमारतीच्या येथे प्री-वेडिंग शूटिंग देखील केली जाते.