पाणी गरम करण्याच हिटर, तवा या आपल्या रोजच्या वापरातील गोष्टी. पण याच गोष्टीने त्याने असं काम केलं ज्याने काही दिवसांपूर्वी संपूर्ण तेलंगणा हादरलं होतं. ही घटना जिथे घडली होती, तेथील शेजारच्यांना सुद्धा याची कल्पना नव्हती की, त्यांना जो वास मटनाचा वाटत होता, तो एका महिलेच्या शरीराचा होता. एक पतीने आपल्या पत्नीसोबत जे केलं ते ऐकून तुम्हीसुद्धा थक्क व्हाल. काही दिवसांपूर्वी हैद्राबादमध्ये घडलेली ही घटना काय आहे? जाणून घ्या. (Hyderabad Murder Case)
गुरमूर्ती आणि त्याची पत्नी माधवी यांचं २०१२ साली लग्न झालं होतं. गुरमूर्ती हा २००३ ते २०२० सालापर्यंत इंडियन आर्मीमध्ये सुबेदार होता. आर्मी मध्ये १७ वर्ष नोकरी केल्यानंतर गुरुमूर्ती २०२० मध्ये रिटायर होऊन आपली पत्नी आणि दोन मुलांसह हैदराबादमधील लालागुडा जिल्ह्यात एका कॉलनीत शिफ्ट झाला. इथे तो डीआरडीओ डिफेंस रिसर्च एंड डेवलपमेंट ऑर्गेनाइजेशन मध्ये सिक्योरिटी गार्ड म्हणून नोकरीला लागला. ही झाली बॅकस्टोरी, आता डायरेक्ट प्रकरणावर येऊया. (Crime News)
तर गुरमूर्तीची पत्नी माधवी ही तिच्या माहेरी रोज फोन करायची. १६ जानेवारीला तिने घरी फोन केलाच नाही. संक्रांतीचे दिवस होते, त्यामुळे तिच्या आई वडिलांना वाटलं की ती घरकामात व्यस्त असेल म्हणून तिने कॉल केला नाही किंवा उचलला नाही. दुसऱ्या दिवशी सुद्धा ते माधवीला कॉल करण्याचा प्रयत्न करतात. पण माधवी कॉल उचलत नाही. आता त्यांना चिंता वाटू लागली, रोज दिवसातून एकदा तरी कॉल करणारी मुलगी २ दिवस झाले कॉल उचलत सुद्धा नाहीये. म्हणून त्यांनी जावई गुरुमूर्तीला कॉल केला. गुरुमूर्तीने त्यांना जे सांगितलं, त्यामुळे त्यांची चिंता आणखीच वाढली. ते लगेचच नंदयालहून आपल्या मुलीच्या घरी लालागुडाला निघाले. गुरुमूर्तीने माधवीच्या वडिलांना सांगितलं होतं की, माधवी त्याच्याशी भांडून घर सोडून निघून गेली आहे. आणि त्याला असं वाटतं होतं की, ती तिच्या माहेरी गेली आहे. (Hyderabad Murder Case)
माधवी घरातून बाहेर पडल्याला दोन दिवस झाले होते, आणि ना ती आपल्या माहेरी पोहोचली होती, ना फोनवर तिने कुणाशी संपर्क साधला होता. माधवीचे वडील लालागुडाला पोहचल्यानंतर लगेचच आपल्या जावयासोबत त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये माधवीची मिसिंग कंप्लेंट नोंदवली. आता शेवटचं माधवीला गुरुमूर्तीनेच पाहिलं होतं, म्हणून पोलिस त्याची चौकशी करतात. गुरुमूर्ती पोलिसांना सांगतो की, माधवी दोन दिवसांपासून माहेरी जाण्याचा हट्ट करत होती, पण त्याला संक्रांत एकत्र त्याच्या बहिणीच्या घरी साजरी करायची होती, कारण त्याची मुलगी आणि मुलगा हे दोघंही तिच्याच घरी होते. यावरून त्यांच्यात वाद झाले. गुरुमूर्तीने माधवीला माहेरी जाण्यापासून आडवलं, म्हणून ती रागात घर सोडून निघून गेली. (Crime News)
तेलंगणामध्ये संक्रांतीचा सण जल्लोषात साजरा केला जातो, त्यामुळे सणाच्या वातावरणात माधवीच्या अचानक घर सोडण्याने गुरुमूर्तीला सुद्धा राग आला आणि त्याने तिला पुन्हा तिला आडवलं नाही. त्याला वाटलं की माधवी कुठेही गेली तरी मुलांचा विचार करून ती घर परत येईल, त्यामुळे त्याने माधवीबद्दल कुठेच चौकशी केली नाही. हे ऐकल्यानंतर पोलिसांनी माधवीचा तपास सुरू केला. तपास करत असताना त्यांनी गुरुमूर्तीच्या शेजारी राहणार्या लोकांकडे चौकशी केली. तिथून त्यांना कळालं की त्या भागातील कोणालाही माधवी दिसलेली नव्हती. खरंतर, त्यांना माधवी गायब असल्याचंही माहित नव्हतं, कारण संक्रांतीमुळे काही लोक त्यांच्या गावी गेले होते. आणि जे लोक कॉलोनीत होते, त्यांना गुरुमूर्तीच्या कुटुंबाबद्दल काही माहिती नव्हती, कारण ५ वर्षे तिथे राहूनही गुरुमूर्तीच्या कुटुंबाने कोणाशीही संबंध ठेवले नव्हते. त्यांची मुलं कॉलोनीतील मुलांबरोबर खेळतही नव्हते. दरम्यान पोलिस गुरुमूर्तीची सुद्धा चौकशी करत होते. तरी माधवीचा काही पत्ता लागत नव्हता. (Hyderabad Murder Case)
अशातच या तपासाला एक वळण आलं, जेव्हा माधवीच्या मामांनी पोलिसांना एक माहिती दिली. ती म्हणजे, तुम्हाला माधवी कधीच सापडणार नाही कारण माधवीचा खून स्वत: गुरुमूर्तीनेच केला आहे. हे कळाल्यानंतर पोलिसांनी तपास गुरुमूर्तीला संशयच्या पिंजऱ्यात ठेऊन सुरू केला. त्यांनी त्याच्या घराजवळील सीसीटीव्ही कॅमेरे चेक केले. या तपासात आता खरं समोर आलं. १५ जानेवारीच्या रात्री गुरुमूर्ती आणि माधवी एकत्र घरात शिरले होते. पण आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे, पुढील दिवसांच्या कोणत्याही फुटेजमध्ये माधवी घरातून बाहेर जाताना दिसली नाही. माधवी घरात तर गेली होती, पण कधीच बाहेर आली नाही. पोलिसांनी लगेचच गुरुमूर्तीला जाब विचारण्यास सुरुवात केली. तो पोलिसांना जुनीच कहाणी पुन्हा पुन्हा सांगत होता. पण जेव्हा पोलिसांनी त्याला फुटेज दाखवले, तेव्हा गुरुमूर्ती बोलता झाला. त्याने पोलिसांना जे सांगितलं ते खूपच धक्कादायक होतं. गुरुमूर्तीने पोलिसांना आधी सांगितलेली गोष्ट खरी होती की त्याची माधवी सोबत ती माहेरी जाण्यावरुन भांडणं झाली होती. पण ही गोष्ट इथपर्यंतच खरी होती. माधवी रागवून घराबाहेर पडली नव्हती. (Crime News)
तर माहेरी न जावून दिल्यामुळे माधवीने रागात मंगळसूत्र काढून गुरुमूर्तीच्या अंगावर फेकलं. गुरुमूर्ती जो आधीच खूप रागात होता, त्याने माधवीला पकडून तिचं डोकं इतक्या जोरात भिंतीवर आदळलं की ती जागेवरच बेशुद्ध झाली. गुरुमूर्तीने नंतर माधवीचा गळा जोरात दाबला आणि तो पर्यंत सोडला नाही, जोपर्यंत माधवीने जीव सोडला नाही. जेव्हा गुरुमूर्तीचं डोकं ठिकाण्यावर आलं. तेव्हा त्याला कळालं की त्याच्याकडून चूक झाली आहे. पण त्याला त्याचा पश्चाताप अजिबात नव्हता. त्याला एवढीचं भीती होती की, आपल्या आत्याकडे गेलेली मुलं परत यायच्या आधी मृतदेहाची विल्हेवाट लावली पाहिजे. (Hyderabad Murder Case)
=============
हे देखील वाचा : DryFruits व्हिटॅमिन्सची कमतरता भरून काढतील ‘हे’ ड्रायफ्रुटसचे प्रकार
=============
मग त्याला एका मलयालम चित्रपट “सूक्ष्म दर्शनी” चा एक सीन आठवला, ज्यात एक भाऊ त्याच्या बहिणीला मारून केमिकलचा वापर करून तिच्या मृतदेहाला पूर्णपणे वितळवतो आणि नंतर त्याला शौचालयमध्ये फ्लश करतो. या चित्रपटातून गुरुमूर्तीला माधवीचा मृतदेह नष्ट करण्याची आयडिया आली. बराच वेळ इंटरनेटवर सर्च केल्यानंतर त्याने माधवीच्या स्वत;च्या पत्नीच्या मृतदेहाचे तुकडे केले. एका मोठ्या बादलीत पाणी ओतून ते गरम करण्यासाठी हिटर त्यात लावलं. मग त्याने तिच्या शरीराचे काही तुकडे त्या बादलीत टाकले काही तव्यावर भाजले. यामुळे जो घरात वास येऊ लागला त्यामुळे त्याला सुद्धा श्वास घ्यायला त्रास होऊ लागला. त्याने घराच्या खिडक्या उघडल्या. हा विचित्र वास घराबाहेर गेला शेजारी त्याच्या घराजवळ जमा होऊन चौकशी करु लागले, तेव्हा त्याने त्यांना मी मटन बनवतोय, ते भाजल्यामुळे हा वास सुटलाय, असं सांगितलं. या उत्तरामुळे तो तेव्हा वाचला, नंतर त्याने माधवीची मांस आणि हाड वेगळे करून त्या हाडांची पॉवडर बनवली. असं करत तो हळू हळू माधवीच्या संपूर्ण शरीराची विल्हेवाट लावतो. (Crime News)
माधवीला पूर्णपणे संपवल्यानंतर त्याने संपूर्ण घर स्वच्छ केलं. वास येऊ नये म्हणून घरात रूम फ्रेशनर मारलं. आणि जाऊन आपल्या मुलगी आणि मुलाला घरी घेऊन मुलांनी आईबद्दल जेव्हा विचारलं तेव्हा तो त्यांना म्हणाला की, ती तिच्या मैत्रिणीकडे गेली आहे. पण खरंतर त्याने त्याचं घरात त्यांच्या आईला संपवलं होतं. पोलिसांनी गुरुमूर्तीच्या घरातून चाकू, स्टोव्ह, बकेट अशा १६ पुरावे गोळा केले. या प्रकरणाची प्रत्येक अॅंगलंने तपासणी केल्यानंतर त्यांचा असा विश्वास आहे की, गुरुमूर्तीने रागाच्याभरात आपल्या पत्नीचा खून केला नाही, तर हा प्री प्लॅन मर्डर आहे. गुरुमूर्तीने आपली केस स्वतः लढण्याची मागणी केली आहे, कदाचित त्याला विश्वास आहे की कायदेशीर कचाट्यातून तो वाचू शकतो, पण खरंतर गुरुमूर्तीने केलेल्या गुन्ह्यांची शिक्षा त्याच्या दोन मुलांनाच भोगावी लागेल. कारण, त्यांची आई आता या जगात नाही जिची हत्या त्यांच्याच वडिलांनी केली आहे. (Hyderabad Murder Case)