Home » बाळाच्या पोषणासाठी सायन रुग्णालयाचा स्तुत्य उपक्रम

बाळाच्या पोषणासाठी सायन रुग्णालयाचा स्तुत्य उपक्रम

by Team Gajawaja
0 comment
Human Milk Bank
Share

मुंबईतील प्रतिष्ठित सायन हॉस्पिटलमध्ये नवजात बालकांसाठी एक उपक्रम चालू असून त्यामुळे अनेक नवजात बालकांना जिवदान मिळालं आहे. हा उपक्रम म्हणजे, ब्रेस्ट मिल्क. भारतातील पहिली मानवी दूध बँक १९८९ मध्ये सायन हॉस्पिटलमध्ये स्थापन झाली आहे. यामुळे दरवर्षी ५००० बालकांना  या मिल्क बँकेच्या सेवेचा लाभ होतो. हे दूध नवजात आणि अतिदक्षता विभागातील आजारी आणि दुर्बल बालकांना दिले जाते. ब्रेस्ट मिल्क बँकेत आत्तापर्यंत ४३,००० मातांनी ४,००० लिटर दूध जमा केले आहे. यातून अनेक नवजात बालकांचे प्राण वाचले आहेत. (Human Milk Bank)

मुंबईतील सायन रुग्णालयात भारतातील पहिली मानवी दूध बँक सुरु झाली आणि हजारो नवजात बालकांच्या पोषणाचा प्रश्न दूर झाला. या अनोख्या बॅंकेच्या माध्यमातून आत्तापर्यंत १०,५२३ नवजात बालकांना फायदा झाला आहे. २०१९ ते २०२४ या वर्षात बँकेत ४,१८४ लिटर दुधाचे संकलन झाले. हे दूध जन्माला येतांना कमी वजन आणि अपुरी वाढ असलेल्या बालकांना लाभदायक ठरले आहेत. याशिवाय ज्या माता प्रसूतीनंतर मुलांना स्तनपान करु शकत नाहीत, त्यांच्या मुलांनाही हे दूध देण्यात येते. त्यांच्या आरोग्यातही यामुळे सुधारणा झाल्या आहेत.

सायन रुग्णालयात दरवर्षी सरासरी १०,००० ते १२,००० मुलांचा जन्म होतो. यातील २,००० नवजात बालकांना या माता दूध बँकेचा फायदा होत आहे. आईचे दूध हे लहान बाळांसाठी सर्वोत्तम आहार असते. त्यांच्यातील रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याचे कार्य करते. पण ज्या माता मुलांना दूध देऊ शकत नाहीत, त्यांच्या मुलांसाठी ही बॅंक एक वरदान ठरली आहे. यासाठी रुग्णालयानं एक आधुनिक विभाग स्थापन केला आहे. सायन रुग्णालयातर्फे जसं या दूधाचा पुरवठा कऱण्यात येतो, तसेच मातांनाही दूध या बॅंकेत देण्याचे आवाहन करण्यात येते. त्यासाठी ऑनलाइन फॉर्मही उपलब्ध कऱण्यात आला आहे. आईचे दूध हे साठवण्यासाठी विशेष उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत. (Human Milk Bank)

हे दूध साधारण वातावरणात ३ ते ४ तास किंवा रेफ्रिजरेटरमध्ये ४ ते ८ डिग्री सेल्सियस तापमानात २४ तासांपर्यंत साठवले जाऊ शकते. -२० अंश सेल्सिअस तापमानात डीप फ्रीजरमध्ये ठेवल्यास ते तीन महिने साठवता येते. यासंबंधीत सर्व सूचना सायन रुग्णालयाच्या स्तनदा माता कक्षातर्फे संबंधितांना देण्यात येतात. दूध किती वेळा मुलांना द्यावे याचीही माहिती देण्यात येते. तसेच या दुधाचे निर्जंतुकीकरण महत्त्वाचे असते. त्याची कशी काळजी घ्यावी याचीही माहिती देण्यात येत आहे. मानवी दूधाचे संकलन करण्यासाठी विशेष पिशव्यांचा वापर करण्यात येतो. याशिवाय स्टेनलेस स्टील किंवा बीपीए फ्री पॉलीप्रॉपिलीन कंटेनर्स स्वच्छ आणि निर्जंतुक करुन त्यात दूध साठवण्यात येते.

==================

हे देखील वाचा : हेअर ड्रायरचा दररोज केसांसाठी वापर करत असाल तर होईल नुकसान

================

मानवी दूध काढण्यासाठीच्या सूचनाही सायन रुग्णालयातील विभागातर्फे देण्यात येतात. यावेळी कुठली काळजी घ्यावी, याची माहिती दूध दान देणा-या आईला आवर्जून देण्यात येते. आईचे दूध घेऊन अन्य ठिकाणी जाणा-यांनाही वाहतुकीच्या वेळी, दुधाची पाकिटे कसे न्यावे याचे मार्गदर्शन केले जाते.
सायन रुग्णालयाच्या या माता दूध केंद्राचे अनेक मान्यवरांनी कौतुक केले आहे. भारतातील पहिली मानवी दूध बॅंक सुरु करण्याचा मान जसा या रुग्णालयला मिळाला आहे, तशीच येथील भारतातील पहिली स्किन बँकही महत्त्वपूर्ण आहे. (Human Milk Bank)

मनुष्याच्या स्किनचे या बॅंकेत ठेवा आहे. भाजलेल्या जखमा अंगावर असतील त्यांना ही बॅंक वरदान ठरत आहेत. याशिवाय या रुग्णालयात असलेल्या इन्फर्टिलिटी क्लिनिक मुळे गरीब जोडप्यांनाही टेस्ट ट्युब बेबीची सुविधा घेता येत आहे. या विशेष वंध्यत्व चिकित्सालयाची ओपीडी मंगळवार आणि शुक्रवारी असते. सायन रुग्णालयात पहिली आपत्कालीन कोरोनरी स्टेंटिंग सेवा सुरू करण्यात आली आहे. ३० नोव्हेंबर १९६४ रोजी ६० विद्यार्थ्यांच्या पहिल्या तुकडीसह लोकमान्य टिळक वैद्यकीय महाविद्यालयाची स्थापना झाली. सध्या येथे २०० विद्यार्थी असून १९० पोस्ट ग्रॅज्युएट विद्यार्थ्यां शिक्षण घेत आहेत. या रुग्णालयात रोज हजारो रुग्ण उपचारासाठी येतात. महाराष्ट्राच्या कानाकोप-यातून रुग्ण या रुग्णालयात येत आहेत. (Human Milk Bank)

सई बने


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.