जगातील प्रसिद्ध टेक कंपनी Hewlett-Packard म्हणजेच एचपी ही येणाऱ्या वर्षांमध्ये आपल्या ६ हजार कर्मचाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवणार आहे. खरंतर पर्सनल कंप्युटरची कमी झालेली मागणी आणि सातत्याने घट होणारी कमाई पाहता हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे एचपी कंपनी पुढील तीन वर्षात ६ हजार कर्मचाऱ्यांना आपल्या कंपनीतून काढून टाकणार आहे. कंपनीचे सीईओ एनरिक लोरेंन्स यांच्यानुसार, एचपी आपल्या रियल इस्टेट फुटप्रिंटला कमी करणार आहे. तसेच उत्पन्नाचा खर्च नियंत्रित करण्यासाठी पुढील तीन वर्षात ६१ हजार ग्लोबल एप्लॉइज मधील १० टक्के कपात करणार आहे. (HP Layoff Plan)
कंपनीसाठी रिस्टक्चरिंग कॉस्ट एकूण १ बिलियन डॉलर असण्याची अपेक्षा आहे. ज्यामध्ये जवळजवळ ६० टक्के कॉस्ट नव्या आर्थिक नव्या वर्षात म्हणजेच २०२३ मध्ये कमी होण्यास सुरु होईल. एचपीच्या विधानानुसार आर्थिक वर्ष २०२५ पर्यंत वर्षाला १.४ बिलियन डॉलरची बचत करण्याची योजना आहे.
ग्लोबल पीसी शिपमेंट मध्ये जवळजवळ २० टक्के घट
लोरेंन्स यांच्या अनुमानानुसार सध्याच्या आर्थिक वर्षादरम्यान कंप्युटरच्या विक्रीत १० टक्क्यांनी घट झाल्याचे दिसू शकते. तिसऱ्या तिमाहित ग्लोबल पीसी शिपमेंटमध्ये जवळजवळ २० टक्क्यांची घट झाल्याचे दिसून आले आहे. जी गार्टनर इंक द्वारे १९९० च्या दशकाच्या मध्यात डेटावर नजर ठेवण्यास सुरु केल्यानंतर सर्वाधिक मोठी घट आहे. डेल टेक्नॉलॉजीज इंक जी आपल्या रेवेन्यूचा ५५ टक्के पीसीची विक्री उत्पन्नातून करतात. (HP Layoff Plan)
हे देखील वाचा- लोकांचा खासगी डेटा कंपन्यांना वापरणे पडणार महागात, ५०० कोटींचा लावला जाईल दंड
नुकत्याच या कंपन्यांनी लेऑफची केलीय घोषणा
गेल्या काही आठवड्यांपूर्वी काही आयटी बिझनेसने आपल्या वर्कफोर्सला कमी करण्यास सुरुवात करण्याची घोषणा केली आहे. मेटा प्लॅटफॉर्म इंक आणि अॅमेझोॉन डॉट कॉम इंक यांनी जवळजवळ १० हजार कर्मचाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवण्यास सुरुवात केली आहे. ट्विटरने ७५०० कर्मचाऱ्यांपैकी अर्ध्याअधिक जणांना काढून टाकले आहे. तर सिस्को सिस्टम्स यांनी गेल्याच आठवड्यात नोकऱ्या आणि कार्यालये कमी करण्याची घोषणा केली आहे. हाय ड्राइव निर्माते सीगेट टेक्नॉलॉजी होल्डिंग्स पीएलसीने सु्द्धा जवळजवळ ३ हजार नोकऱ्या कमी करण्याची घोषणा केली आहे.
दरम्यान, त्याचसोबत गुगलची पॅरेंट कंपनी अल्फाबेट कडून आता उत्तम काम न करणाऱ्या कर्मचाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवणार आहे. कंपनीने १० हजार कर्मचाऱ्यांची लिस्ट बनवली आहे. हे गुगलमध्ये काम करणारे फक्त ६ टक्के कर्मचारी आहेत.