Home » महाराष्ट्राचा कोहिनूर हिरा कसा हिरावला गेला?

महाराष्ट्राचा कोहिनूर हिरा कसा हिरावला गेला?

by Team Gajawaja
0 comment
Kohinoor Diamond
Share

भारतात सर्वात महाग आणि दुर्मिळ म्हणून कोहिनूर हिऱ्याची गणना होते. पण महाराष्ट्रात त्याच ताकदीचा हिरा होता. पण तो ब्रिटिशांच्या हातात गेला आणि तो परत आलाच नाही. काय नाव होतं त्या हिऱ्याचं, तो महाराष्ट्रात कसा आला, आणि ब्रिटिशांच्या हाती गेला तरी कसा, जाणून घेऊयात. द ग्रेट डायमंड ऑफ द वर्ल्ड हे १८८३ साली प्रकाशित झालेले पुस्तक. आणि डायमंड एण्ड प्रिशियस स्टोन्स हे १८७३ साली प्रकाशित झालेले पुस्तक. यात जगातल्या अनेक हिऱ्यांचा इतिहास देण्यात आला आहे. त्यात नासक डायमंड म्हणजे नासक हिऱ्याबद्लही विस्तृत वर्णन आहे. (Kohinoor Diamond)

नासक हिरा हा नाशिकमधल्या त्र्यंबकेश्वर मंदिरात होता. एका मराठा कुटुंबाने हा हिरा या मंदिराला दान केला होता. हा हिरा नेमका कोणी दान केला याची माहिती नाही. पण हा हिरा गोवळकोंड्याच्या खाणीतून काढला गेला होता. जेव्हा हा हिरा काढला गेला तेव्हा जगातल्या सर्वात मोठ्या हिऱ्यांपैकी एक होते. हा हिरा मिळवण्यासाठी त्र्यंबकेश्वर मंदिरावर अनेक हल्ले झाले. पण मराठ्यांनी त्याचे योग्य संरक्षण केले. १८१७ पर्यंत हा हिरा याच मंदिरात होता. पण दुसऱ्या बाजीरावाने आदेश दिला आणि हा हिरा पेशव्यांकडे जमा केला गेला. त्यानंतर मराठा आणि ब्रिटिशांमध्ये तिसरे युद्ध झाले. यात बाजीरावाचा पराभव झाला आणि १८१८ साली शनिवारवाड्यावर युनियन जॅक फडकला. तेव्हा दुसऱ्या बाजीरावाने हा हिरा ब्रिटिशांना दिला. (Kohinoor Diamond)

तेव्हा हा हिरा इंग्लंडला गेला. आणि अवघ्या तीन हजार पाऊंडला रँडेल एन्ड ब्रिज नावाच्या एका हिरे व्यापाऱ्याने हा विकत घेतला. त्यानंतर या हिऱ्याला पैलू पाडण्यात आले. त्यात या हिऱ्याचे आणखीन १० टक्क्यांनी वजन कमी झाले. पुढे १८३१ साली हा हिरा सात हजार २०० पाऊंड्सना इम्यॅन्युअल बंधुंना विकण्यात आला. सहा वर्षानंतर १८३७ साली हा हिरा मार्क्युसचे पहिले वेस्टमिनिस्टर रॉबर्ट ग्रोसवनर यांना विकण्यात आला. ग्रोसवनर यांच्या तलवारीत हा हिरा लावण्यात आला होता. १८८६ साली या हिऱ्याची किंमत ३० ते ४० हजार पौंड असल्याचे सांगितले जात होते. (Kohinoor Diamond)

======

हे देखील वाचा : हि-यांचा ग्रह !

======

1927 साली हा हिरा अमेरिकेला पाठवण्यात आला. १९३० साली या हिऱ्याची गणना सर्वोत्तम अशा २४ हिऱ्यांमध्ये झाली होती. १९४० साली ज्वेलर हॅरी विन्स्टन यांनी हा हिरा विकत घेतला. १९७० साली हा हिरा न्यु यॉर्क मधल्या एडवर्ड हॅण्ड यांना विकण्यात आला. आता हा हिरा लेबननमधल्या एका खासगी वास्तूसंग्रहालयात ठेवण्यात आला आहे. लेबननचे श्रीमंत गृहस्थ रॉबर्ट मौवाड यांच्याकडे या हिऱ्याची मालकी आहे. हा हिरा त्र्यंबकेश्वरच्या ज्या मुकुटात होता तो आजही त्याच मंदिरात आहे. दर सोमवारी संध्याकाळी चार ते पाच वाजण्याच्या दरम्यान त्याचे दर्शन दिले जाते. हा हिरा भारताचा आहे म्हणून तो परत भारताला मिळाला पाहिजे अशी मागणी सध्या होत आहे. तुम्हाला काय वाटतं हा हिरा भारतात आला पाहिजे का? आम्हाल कमेंट करून नक्की सांगा. (Kohinoor Diamond)


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.