Home » ‘या’ टिप्स वापरा आणि टिकवा परफ्युमचा सुगंध जास्त काळ

‘या’ टिप्स वापरा आणि टिकवा परफ्युमचा सुगंध जास्त काळ

by Jyotsna Kulkarni
0 comment
Perfume Hacks
Share

आजच्या काळात परफ्युम, सेंट, डियो या चैनीच्या वस्तू बनल्या आहेत. आपल्या रोजच्या वापरायच्या अविभाज्य वस्तूंपैकी एक म्हणून यांना आता ओळखले जाते. पूर्वी फक्त कार्यक्रमासाठी, लग्न समारंभ, ऑफिस साठी वापरला जाणारा हा परफ्युम कधी आपल्या रोजच्या आयुष्याचा भाग बनला आपल्यालाच समजले नाही. आता तर आपण अगदी सहज बाहेर पडताना आणि अगदी घरात वावरतानाही परफ्यूम लावतो.

घामाचा दुर्गंध येऊ नये, फ्रेश वाटवे म्हणून परफ्यूम लावला जातो. अनेकांना तर परफ्युम लावण्याचे जणू व्यसनच जडलेले असते. परफ्युम हा अनेकांचा जिव्हाळ्याचा विषय असतो. वेगवेगळ्या देशातील महागड्या, मोठमोठ्या ब्रांडच्या परफ्यूमचे चांगलेच कलेक्शन अनेकांकडे आपल्याला पाहायला मिळते. मात्र असे असूनही बऱ्याच लोकांची तक्रार असते की, आमचा परफ्युम जास्त काळ टाकतच नाही. परफ्यूमचा सुगंध जास्त वेळ राहावा म्हणून आपण तो कपड्यावर लावतो. पण तरीही काही तासानंतर परफ्युमचा वास येणे बंद होते. त्यामुळे बरेच लोकं बाहेर पडताना परफ्युम सोबत बाळगतात. आज आम्ही तुम्हाला हाच परफ्युम जास्त काळ टिकाव म्हणून करता येतील असे सोपे उपाय सांगणार आहोत.

सर्वप्रथम तुम्ही कोणत्या कार्यक्रमासाठी आणि कुठे, कधी जाणार आहात याकडे लक्ष द्या. अर्थात रात्री बाहेर जाताय, दिवसा जाताय, डेटवर जाताय, जेवायला जाताय आदी गोष्टी लक्षात घेऊन परफ्युमची निवड करावी. बाहेर छोट्या कामासाठी, कामावर जात असाल तर दिवसभर चालणारा परफ्यूम निवडा. दिवसाचे परफ्यूम अधिक स्ट्रॉंग असतात. रात्रीसाठी हलका परफ्यूम निवडा. परफ्युम खरेदी करताना त्यावर डे किंवा नाईट असे लिहिले असते. ते पाहून तुम्ही खरेदी करू शकता. रात्रीचा आणि दिवसाचा कोणता परफ्युम आहे हे पॅकेजच्या रंगावरून देखील ओळखता येते. जर परफ्यूमवर चमकदार पिवळा किंवा केशरी रंग असेल तर समजा की ते दिवसासाठी आहे आणि जर तो रंग काळा किंवा लाल असेल तर समजा की ते रात्रीसाठी आहे.

  • परफ्यूमची बॉटल नेहमी व्यवस्थित बंद करावी लागते. बॉटल उघडल्यानंतर ऑक्सिजनचा त्यावर परिणाम होऊ लागतो. आणि त्यामुळे बाटलीतील परफ्यूम कमी होतो, त्यासोबत वासही निघून जातो.
  • परफ्यूम कधीही अति किंवा लख्ख प्रकाशात ठेऊ नये. किंवा परफ्यूम सूर्यप्रकाशात, सूर्यप्रकाश येईल सजा जागी ठेवू नका. तो कपाटात ठेवा. जेणेकरुन त्याच्यावर अंधार असेल आणि तो दीर्घकाळ टिकेल.
  • आपण परफ्यूम घेतला की, त्याचा ओरिजिनल बॉक्स काढून टाकतो आणि तो बॉक्स फेकून देतो. पण हे योग्य नाहीये. हे बॉक्स खास परफ्यूमच्या चांगल्यासाठी बनवले जातात. त्यामुळे ओरिजनल बॉक्समध्ये परफ्युम ठेवल्यास तो जास्त काळ टिकतो.
  • परफ्यूम लावताना बॉटल अनेकदा हलवली जाते. पण हे जास्त प्रमाणात करणे योग्य नाही. असे केल्याने ते जास्त काळ टिकत नाही आणि त्यातील वास देखील निघून जातो.
  • अंघोळीनंतर लगेच परफ्युम आणि डिओड्रंटचा वापर करणे योग्य असते. कधीही घाम आलेल्या जागांवर परफ्युम किंवा डिओ स्प्रे करू नये.
  • परफ्युम लावताना एक काळजी घ्या तुम्ही जिथे तो लावणार आहात तिथे आधी मॉश्च्युरायझर लावा आणि त्याचा ओलावा आहे तोपर्यंत परफ्युम स्प्रे करा. आता शरीराच्या कोणत्या भागात परफ्युम लावू शकतो ते पाहू.

मनगट
या ठिकाणी परफ्यूम लावल्याने सुगंध बराच काळ टिकतो. मनगटावर स्प्रे केल्यानंतर दोन्ही हाताचे मनगट एकमेकांवर हलके घासा.

कोपर
शरीराच्या या भागावर हलकेच परफ्यूम स्प्रे करा. इथे परफ्युम लावल्याने देखील तो चांगला टिकतो.

======

हे देखील वाचा :  हेअर ड्रायरचा दररोज केसांसाठी वापर करत असाल तर होईल नुकसान

======

केसांमध्ये
हो, शॅम्पू आणि कंडिशनरमध्ये देखील परफ्यूम असतो. केसांमध्ये परफ्युम जास्त काळ टिकतो. तो लावताना कंगवा किंवा ब्रशवर परफ्यूम लावून केसांना ब्रश करू शकता.

कानाच्या मागे
कानामागे परफ्यूम लावल्याने लगेच परिणाम दिसतो आणि रात्रीच्या वेळेसाठी हा पर्याय बेस्ट समजला जातो.


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.